विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमीनगड - ( मुंबई इलाखा. ) विजापूर जिल्हा. हुनगुंद तालुक्यांतील एक गांव. १६० ३’ उत्तर अक्षांश ७६० पूर्व रेखांश यांवर, हुनगुंद च्या पश्चिमेस सुमारें ९ मैलांवर हा ७७३४ ( इ. स. १९०१ ) लोकवस्तीचा गांव आहे. येथें गुरांचा मोठा बाजार भरतो. तसें व कोंकणचे नारळ व तांदूळ यांचा मोठा व्यापार आहे.