विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमीनभावी - ( मुंबई इलाखा. ) धारवाड जिल्हा. धारवाडच्या ईशान्येस सुमारें सात मैलांवर अजमासें साडे तीन हजार लोकवसातीचें गांव. पेशव्यांच्या वेळीं हें आठ गांवांच्या समतेचे ( समत ) मुख्य ठिकाण होतें. गांवाच्या उत्तरेस नेमिनाथाचें जैन देवालय आहे. कलमेश्वर व मल्लिकार्जुन अशीं आणखीं दोन लहान देवळें आहेत. येथें एकंदर सहा शिलालेख सापडले आहेत. ( फ्लीट्स कॅनरीज डिनॅस्टीज )