विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमीना − अबदुल्लाची पत्नी व प्रख्यात मुसुलमान धर्मसंस्थापक महंमदाची माता. अबदुल मनाफचा पुत्र. वहाब याची ही कन्या होती. सौंदर्य, शहाणपण व सदवर्तन यांविषयीं तिची फार ख्याति असून अबदुल्लासारख्या असाधारण पुरूषाची पत्नी होण्यास ती सर्वस्वी लायक होती. महंमदाच्या जन्मानंतर सहा वर्षांनीं इ. स. ५७७ च्या सुमारास ती वारली. तिची कबर अबबा येथें आहे असें म्हणतात [ बील. ओरिएंटल बायॉग्राफिकल डिक्शनरी ].