विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृतचंद्रसूरि — कुंदकुंदाचार्याच्या समयसार ग्रंथावर यानें टीका लिहिली आहे. या टीकेचें नांव आत्मख्याति असें आहे. अमरचंद्रसूरि संवत, ९६२ त हयात होता व त्यानें खालील ग्रंथ लिहिले :-
(१)समयसार टीका,(२)प्रवचनसारटीका,(३)पंचास्तिकाय टीका(४) तत्त्वार्थसार,(५)पुरुषार्थ सिद्धयुपाय आणि (६)तत्त्वदीपिका.