विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अम्मपत्तम् — (मद्रास इलाखा).तंजावर जिल्ह्याच्या पत्तुक्कोत्ताइ तालुक्यांतील बंदर. १०°१' उत्तर अक्षांश व ७९°१५' पूर्व रेखांश यांवर. लोकसंख्या सुमारें चार हजार. याचा सिलोनशीं मोठा व्यापार चालतो, येथून तांदूळ व गुरें तिकडे पाठविलीं जातात. सिलोन येथील चहाच्या मळयांवर काम करणारे मजूर या बंदरांतून दर आठवडयांतून दोनदां जातात.