विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य — हा घटित शत सुदर्शनाचार्य यांचा मुलगा असून कानेईचा वैष्णव आचार्य होता. हा १७ व्या शतकाच्या उत्तरार्धांत अथवा १८ व्या शतकाच्या आरंभीं झाला असावा यानें रामानुजाचीं तत्वें व त्याचा दिग्विजय यांसंबंधीं सहा अंकीं न्योक्तिपर असें यतिराजविजय अथवा वेदांत विलास नांवाचें नाटक लिहिलें. तसेंच चोलभाण, वसंत-तिलकाभाण अशीं नाटकें लिहिलीं.