प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अम्लशास्त्र — अम्लांसंबंधीं सर्वसामान्य उपपत्ति, अम्लांची उत्पत्तिा त्यांचे गुणधर्म वगैरे रसायन शास्त्रांतर्गत जे सिद्धान्त त्यासंबंधीं व इतर गोष्टींच्या विवेचनास अम्लशास्त्र असें नांव देतां येईल. प्रस्तुत लेखामध्यें अम्लें, अनाम्लें, अल्क व  क्षार यांच्या संबंधीं विवेचन केलें आहे.

अ म्लें.—प्राचीन भारतीयांस '' अम्ल '' हा पदार्थ माहीत होता एवढेंच नव्हे तर याचे सेंन्द्रिय अम्लें व खनिज-अम्लें असे दोन भेद केलेले आढळतात. सेंद्रिय अम्लांत उत्ताम कोणतें हेहि स्पष्ट केलेलें आहे असें '' चाणकाम्लश्च सर्वेषां एक एव प्रशस्यते—अम्लवेतसमेकं वा सर्वेषामुत्ता-मोत्तमम् '' या रसरत्‍नसमुच्चयांतील उतार्‍यावरूच दिसून येईल ( विज्ञानोतिहास पृ. ४५८ पहा ).

सेंद्रिय अम्लांशिवाय खनिज अम्लेंहि प्राचीन भारतीय लोकांस माहीत होती. सांप्रत ज्यास ऍक्वारेजिया म्हणतात तें  जलराज अम्ल तयार करण्याकरितां मुख्यत्वें '' विड '' या मिश्रणाचा उपयोग केलेला दिसतो. तसेंच गंधकाम्ल, नत्राम्ल, व उद्हराम्ल सुध्दां तयार करण्याचें त्यांस माहीत होतें. (विज्ञानेतिहास पृ. ४५९ पहा.)

'' अम्ल '' या संज्ञेनें ज्या पदार्थाचा बोध होतो त्या पदार्थांत '' अम्लत्व = आंबटपणा '' हा गुण प्राधान्यें करून असल्यानें त्या आंबट पदार्थास '' अम्ल ही यथायोग्य संज्ञा देण्यांत आली. पाश्चात्यांत '' अ‍ॅसिड '' हा भारतीय अम्ल शब्दाच्या ऐवजीं वापरण्यांत येतो. त्याचाहि धात्वर्थ अम्ल पदार्थ असाच आहे. व व्यवहारांत '' अम्ल '' व '' अ‍ॅसिड '' या शब्दांनीं भारतीयांत व पाश्चात्यांत कोणताहि अंबट पदार्थ असाच अर्थ घेतला जातो. यामुळें नेहमींच्या व्यावहारिक भाषेंत '' अम्ल '' हा शब्द कोणत्याहि आंबट पदार्थास लावण्यांत येतो. प्राचीनांस-पौरस्त्य व पाश्चात्य या दोघासहि- यासंबंधानें जास्त ज्ञान असल्याचें दिसून येत नाहीं.

पदार्थास अम्लत्व आणण्यासं कोणता घटक कारणीभूत आहे. याची उपपत्तिा प्रथम लाव्हाझिए यानें पुढें आणिली. वातावरणांतील प्राणवायु (ऑक्सिजन ) हा घटक ज्वलनक्रियेस आवश्यक आहे हें आज सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीं. लाव्हॉझिए यानें गंधक हा पदार्थ हवेंत जाळून '' गंधक '' व हवेंतील '' प्राण '' यांच्या संयोगीकरणानें जो पदार्थ '' गंधक प्राणिद '' तयार होतो त्या पदार्थाच्या अंगीं '' अम्लत्व '' असतें असें सिद्ध केलें. त्याचप्रमाणें गंधकासारखीं जीं मूलद्रव्यें '' स्फुर '' ( फॉस्फरस ) व  '' कर्ब '' हींहि हवेंत जाळळीं असतां त्यांच्यापासून जे प्राणसंयुक्त पदार्थ '' स्फुर प्राणिद '', '' कर्ब प्राणिद'' तयार होतात त्यांच्याहि अंगीं हें '' अम्लत्व '' असतें असें त्यानें सिद्ध केलें व यावरून '' अम्लत्व '' आणण्यास '' प्राण '' वायु हा अवश्यक घटक आहे असें त्यानें प्रति-पादिलें व यावरून ' प्राण ' वायूस '' ऑक्सिजन '' म्हणजे '' अम्लजन '' असें नांव दिलें ; व हे '' अम्ल '' पदार्थ  अधातुमूलद्रव्यें म्हणजे '' प्राण '' वायूशीं संयोग होऊन जे त्या अधातूंचे '' प्राणिद '' तयार होतात तेच होत, असेंहि प्रतिपादण्यांत आलें. कारण या अधातुमूलद्रव्यांच्या प्राणिदांचें पाण्यावर कार्य झालें म्हणजे अम्ल तयार होतें. जसें:-गंधक व प्राण यांच्या संयोगानें गप्र२ हा गंधकाचा प्राणिद तयार होतो; जसें ग+प्र= गप्र या गंधक प्राणिदावर पाण्याचें कार्य केले म्हणजे अम्ल तयार होतें जसें:—

 गंधक प्राणिद  +  पाणी  =  गंधकसाम्ल
 ग प्र२  उ२प्र   उ२गप्र३

अम्लजननास प्राण हा आवश्यक घटक असला पाहिजे ही कल्पना बरेच दिवस प्रचलित होती. परंतु पुढें '' डेव्हि '', '' गेलुझाक '' आणि ' थेनॉर्ड '' यांनीं संशोधन करून असें सिद्ध केलें कीं, अधातुरूप मूलद्रव्यांचा संयोग '' उज्ज '' वायूशीं ( हायड्रोजन ) झाला तरीहि त्यांच्या संयोगीकरणापासून होणारे पदार्थ '' अम्ल '' असतात व यावरून '' अम्ल '' चा आवश्यक घटक '' प्राण '' हाच असला पाहिजे असें नाहीं. याच्या सिद्धयर्थ '' उज्ज '' व '' हर ''
यांच्या संयोगीकरणापासून झालेला जो पदार्थ '' उदहराम्ल '' ( हायड्रोक्लोरिक ऍसिड ) याचें उदाहरण पुढें मांडलें. पुढें '' गेलुझाक '' यानें '' उज्ज '' व '' कन '' ( कर्बनत्र )-( सायनोजन ) यांच्या संयोगापासून '' उद्कनाम्ल '' ( हायड्रो सायनिक ऍसिड ) होतें हें सिद्ध केल्यावर '' अम्लत्वास ''प्राणघटक आवश्यक असला पाहिजे ही समजूत नाहिशीं झाली; व अम्लत्वास आवश्यक घटक उज्जच असला पाहिजे ही समजूत ठाम झाली. याचीं आज अनेक उदाहरणें आहेत जसे :- '' उज्ज '' व '' अद '' यांपासून तयार होणारें '' उद्अदाम्ल '' ; '' उज्ज '' व '' स्तंभ '' यांपासून '' उत् स्तंभाम्ल '' वगैरे असून एखादा पदार्थ '' अम्ल '' आहे किंवा नाहीं हें ठरविण्याकरितां त्यावर धातुरूप मूलद्रव्याचें कार्य करण्यांत येतें आणि त्यांतून '' उज्ज '' वायु असं- युक्त होऊन निघाला तर तो पदार्थ '' अम्ल '' आहे असें निश्चित समजावें.

यावरून '' उज्ज '' वायु ' अम्लत्वा ' चा आवश्यक घटक आहे व तोच अम्लत्वजनक असल्यानें '' प्राण '' वायूस पाश्चात्तय नांव '' ऑक्सिजन '' म्हणजे '' अम्ल जन '' जें आहे तें अन्वर्थक नाहीं असें पाश्चात्तय रसायन-पंडितांस वाटूं लागलें आहे व त्याप्रमाणें त्यास ( ऑक्सि-जनास ) अन्वर्थक नामाभिधान देण्याची त्यांची योजना चालू आहे. यावरून भारतीय नांव '' प्राण '' हें अधिक अन्वर्थक असून निदान सांप्रत तरी त्याचें नवीन नामाभिधान करण्याचा प्रसंग येणार नाहीं.

अम्लांचे धर्म :—'' अम्ल '' पदार्थ रुचीला आंबट असतात, परंतु '' अम्ल '' समजले जाणारे सर्वच पदार्थ आंबट असतात असें नाहीं. यामुळें आंबटपणा हा ' अम्ला ' चा लाक्षणिक धर्म समजण्यांत येत नाहीं. याशिवाय '' अम्लांच्या '' अंगीं सेंद्रिय रंगांस विवक्षित रंग आणण्याचा धर्म आहे. सेंद्रिय निळे रंग अम्लांच्या संसर्गानें लाल होतात. याकरितां रसायनशाळेंत अम्लत्वाची परीक्षा करण्याकरितां '' ब्ल्यू लिटमस पेपर '' वापरण्यांत येतात. ते वनस्पतिजन्य '' लिटमस '' नांवाच्या निळया रंगाचेच असतात. अम्लाच्या संसर्गानें वनस्पतिजन्य पिवळा रंग ( उदाहरणार्थ हळद ) विवर्ण होत नाहीं; तो पिवळाच राहतो.

बहुतेक अम्लें पाण्यांत विद्राव्य असतात. सर्व अम्लांत '' उज्ज '' हा आवश्यक घटक असतो. हा '' उज्ज '' अधिक ऋण मूलद्रव्यांशीं किंवा संयुक्त मूलकां ( रॅडिकल्स ) शीं संयुक्त असतो, व बहुधा '' प्राण '' यांशीं संयुक्त असतो. '' अम्लें '' धातूंशीं किंवा धातूंच्या प्राणिदांशीं संयोग पावतात व त्यापासून '' क्षार '' हा पदार्थ तयार होतो. धातूंशीं संयोग पावतांना अम्लांतील उज्ज नि:सृत होतो हें खालील समीकरणानें ध्यानीं येईल:—

  जशद  +   गंधकाम्ल  =  जशदगंधकित  +  उज्ज
  ज   उगप्र   जग प्र४   उ

अम्लाशीं धांतूचा प्राणिद संयुक्त होतानां अम्लांतील उज्जप्राणिदांतील प्राण याशीं संयुक्त होऊन पाणी तयार होतें ते असें:—

 सिंधुप्राणिद  +  उद् हराम्ल  =  सिंधुहरिद ( मीठ )  +  पाणी
  धु२प्र  २उह  २धुह  उप्र

धातूचा उद्—प्राणिद ( हायड्रॉक्साइड ) किंवा उज्जित ( हायड्रेट ) अम्लाशीं संयुक्त झाला म्हणजेहि पाणी तयार होतें जसें:—

 सिंधु उत्प्राणिद  +  उद्—हराम्ल   =   सिंधुहरिद    +  पाणी
 किंवा सिंधु उज्जित  (हायड्रोक्लोरिक ऍ.)  मीठ
  धु प्र उ  उह  धुह  उप्र

अ म्लां चे भे द.— अम्लांत प्राणवायु हा जरी आवश्यक घटक नसतो तरी प्राण हा बहुतेक अम्लांत असतो. अशा प्राणयुक्त अम्लांस प्राणाम्लें (ऑक्सिअ‍ॅसिड्स ) असें म्हणतात. ज्या अम्लांत प्राणवायु नसतो त्यांस उद्+अम्ले = उदम्लें ( हॉयड्र ऍसिड्स ) असें म्हणतात. उद्-हराम्ल, उद्-अदाम्ल वगैरे अम्लें उदम्लांचीं उदाहरणें आहेत. यांचे आणखी निरुद अम्लें व सोद ( हायड्रेटेड अ‍ॅसिड ) अम्लें असे भेद आहेत. निरुदअम्लें हीं  जलविरहित अम्लें होत; व सोद अम्लें ही जलयुक्त अम्लें होत. उदम्लें म्हणजे उज्जयुक्त अम्लें व सोद अम्लें म्हणजे जलयुक्त अम्लें हे लक्षांत ठेवावें. सांप्रतच्या प्रचलित असलेल्या उपपत्ताीनें पाहतां सर्व अम्लें उदम्लें आहेत. शिवाय खनिज अम्लें व सेंद्रिय ( उद्भिज्ज ) अम्लें असेहि भेद आहेत. खनिज (मिनरल ) अम्लें खनिज पदार्थापासून झालेलीं असतात; सेंद्रियअम्लें ( ऑरगॅनिक अम्लें ) किंवा उद्भिज्ज अम्लें सेंद्रिय पदार्थांपासून झालेलीं असतात.

प्राणाम्लें ( ऑक्सि अ‍ॅसिड्स् ) म्हणून जीं अम्लें समजण्यांत येतात त्यांतील धातुनि:सार्य उज्ज ( ज्याची जागा धातू घेतात असा हायड्रोजन ) हा '' प्राणाशीं '' संयुक्त असून प्रउ या उत्प्राणिल रूपांत असतो. अम्लांतील उत्प्राणिल रूपांत असलेला उज्ज हा धातु नि:सार्य असतो. परंतु प्राणाशीं संयुक्त नसलेला उज्ज हा धातु नि:सार्य नसतो. यावरून प्राणाम्लें हीं अधातुरूपमूलद्रव्याचीं उज्जितें किंवा उत्प्राणिदें समजलीं जातात. अधातुरूप मूलद्रव्याच्या ऐवजीं अधातुरूप मूल द्रव्यांचा संघ किंवा ज्या संघामध्यें अधातुरूपमूलद्रव्यांचें प्राधान्य आहे त्यांच्या उत्प्राणिदांस किंवा उज्जितांस प्राणाम्लेंच समजण्यांत येतें.

सें द्रि य अ म्लें.—सेंद्रिय अम्लांचें विशिष्ट लक्षण हें आहे कीं त्यांच्या घटकांत—कप्र.प्रउ हा संघ असतो. हा संघ एकमूल्य ( मोनोव्हॅलंट ) असून त्यास कर्बप्राणिल असें नांव आहे. या कर्बप्राणिल एकमूल्य संघांतील उज्ज हा धातु नि:सार्य आहे, व उज्ज नि:सृत झाला म्हणजे क्षार होतो. हा कर्बप्राणिल उज्ज त्याचप्रमाणें व उज्ज उत्कार्बिल ( आल्किल ) मूलकाच्या योगानेंहि नि:सार्य होतो व त्याच्या पासून संयुक्त इथ्रें होतात. सेंद्रिय अम्लांची अनाम्लता ( बेसिसिटि ) हीं त्यांत असलेल्या कर्बप्राणिल संघाच्या संख्येवरून ठरविली जाते. प्राणाम्लें हीं कर्बप्राणिलाम्लें ( कॅबाक्झिलीक अ‍ॅसिड ) आहेत. यांत सुध्दां उत्प्राणिल संघ असतो. त्याचप्रमाणें प्रायोज्जिद अम्लें, कितनअम्लें इत्यादि असतात.

सं ज्ञा —अम्लांस नांवें खालील नियमान्वयें दिलीं आहेत. अम्लांतील जो मुख्य घटक, म्हणजे ज्या मुख्य पदार्थापासून अम्लें झालेलीं आहेत त्या मुख्य घटकाचें किंवा पदार्थाचें नांव त्या अम्लास दिलें आहे. हे नांव विशेषण करून '' अम्ल '' शब्दास लाविलें आहे. मुख्य अम्लाचा बोध होण्याकरितां मुख्य घटकावरून जें विशेषण ''अम्ल'' शब्दापाठिमागें लाविलें आहे. त्यास इंग्रजीप्रमाणें (''इक = आयसी'वगैरे) कांहीं प्रत्यय लाविलेला नाहीं. मुख्य घटकाचेंच नांव प्रत्यय लाविल्याशिवाय मुख्य अम्लाचा बोध होण्याकरितां कायम ठेविलें आहे. याच्या स्पष्टीकरणार्थ गंधकाम्लाचें ( सल्फ्युरिक ऍसिड ) उदाहरण घेतलें आहे. ' गंधक'' यापासून निघालेल्या अम्लांपैकीं जें मुख्य अम्ल त्यास ''गंधकाम्ल'' उ2गप्र4 हे नांव योजिलें आहे. '' नत्र '' ( नायट्रोजन ) पासून झालेल्या मुख्य अम्लास ' नत्राम्ल ' (उनप्र३) कर्बपासून निघालेलें अम्ल ''कर्बाम्ल'' उ२कप्र३ इ. अशी नांवें दिलीं आहेत.

अम्लांतील मुख्य घटकापासून एकापेक्षां अधिक अम्लें झालीं असल्यास त्यांत ''प्राण'' वायूचें प्रमाण ज्यांत जास्त असेल त्यांचीं नांवें वरील प्रमाणें दिलीं आहेत. यापेक्षां कमी प्रमाणानें '' प्राणाचे '' प्रमाण ज्या अम्लांत असेल त्या अम्लाचें नांव—मुख्य अम्लाच्या मुख्य घटकनांवाच्या पुढें '' स '' हा प्रत्यय लावून त्यास ''अम्ल'' हा शब्द लावला आहे. एखाद्या द्रव्यापासून अनेक अम्लें झालीं असल्यास त्यांच्या नांवांसहि हेंच धोरण लागू करावे जसें:—गंध-काचे मुख्य अम्ल उ२गप्र४ याचे नांव गंधकाम्ल होय. गंधकापासून दुसरें अम्ल उ२गप्र३ या घटनेचें होतें त्यांत उ२गप्र४ यांतील प्राणाच्या प्रमाणापेक्षां कमी ''प्राणाचे'' प्रमाण आहे. ह्मणून यास ( उ२गप्र३ )'' गंधक  साम्ल '' हें नांव दिलें आहे. त्याचप्रमाणें उनप्र३ हें ''नत्राम्ल'' व ''उन प्र२'' हें ''नत्रसाम्ल'' होय.

गंधकापासून निघालेलें तिसरें एक अम्ल उ२गप्र२ या घटनेचें आहे. यांत प्राणाचें प्रमाण ''गंधकसाम्ला ''— उगप्र— पेक्षांहि कमी आहे. यास ''उपगंधकसाम्ल'' हें नांव दिलें आहे. यावरून हें ध्यानांत येईल कीं ''स'' प्रत्यय ज्या अम्लाच्या नांवाचा दर्शक आहे. त्यापेक्षां प्राणाचें प्रमाण कमी असलेले अम्लाचें नांव ''उप'' या उपसर्गानें व ''स'' या प्रत्ययानें संबोधिलें आहे.

मुख्य अम्लामध्यें जें प्राणाचें आहे त्यापेक्षांहि जास्त प्राणाचें प्रमाण असलेलीं अशीं कांहीं अम्लें आहेत. या अम्लांचीं नांवें ''परि'' या उपसर्गानें व पुढें कांहीं प्रत्यय न लावतां दिलीं आहेत. उदाहरणार्थ ''हर'' (क्लोरिन ) चें एक अम्ल आहे त्यांत 'हराम्ल' उहप्र३ यांत जें प्राणाचें प्रमाण आहे त्यापेक्षां जास्त प्राणाचें प्रमाण आहे ह्मणून त्यास '' परिहाराम्ल '' (परक्लोरिक ऍसिड) हें नांव दिलें आहे. याचें जास्त स्पष्टीकरण '' हर '' ( क्लोरीन ) चीं
चार अम्लें आहेत त्यांतील प्राणाच्या प्रमाणावरून वरील नियमानें नांवें दिलीं आहेत त्यांवरून होईल:—

( १ ) मुख्य अम्ल—हरम्ल = उ ह प्र ३ ( क्लोरिक अ‍ॅसिड )
( २ ) याहून कमी प्राणाचे प्रमाण असलेलें अम्ल-हरसाम्ल = उहप्र2 ( क्लोरस अ‍ॅसिड ).
( ३ ) याहूनहि कमी प्राणाचें प्रमाण असलेलें अम्ल - - उप  ह रसाम्ल = उहप्र ( हायपो क्लोरस अ‍ॅसिड ).
( ४ ) मुख्य अम्लापेक्षां जास्त प्राणाचे प्रमाण असलेलें  अम्ल परिहराम्ल = उ ह प्र४ ( परक्लोरिक अ‍ॅसिड ).

हे जे वर नियम दिले आहेत ते प्राणाम्लांच्या ( ऑक्सि ऍसिड्स ) नांवा संबंधानें मुख्यत: आहेत. परंतु यांशिवाय मुख्य मूलद्रव्याशीं ''उज्ज'' साक्षात् संयुक्त होऊन झालेलीं अशीं अम्लें आहेत. त्यांस '' उद-अम्ल '' ( हायड्र अ‍ॅसिड्स् ) असें ह्मणतात. यांचीं नांवें दर्शविण्याकरितां ''उद'' हा उपसर्ग लाविला असून पुढें प्रत्यय लाविलेला नाहीं. या जातीचीं कांहीं अम्लें उदाहरणाकरितां दिलीं आहेत.

''उद्-हराम्ल'' ''उह'' ( हायड्रोक्लोरिक ऍसिड ).
''उद् स्तंभाम्ल'' ''उस्त'' ( हायड्रो ब्रोमिक ऍसिड ).
''उद् गंधकाम्ल'' उ२ ग ( हायड्रो सल्फ्युरिक ऍसिड ).
''उद् अदाम्ल'' ''उद'' ( हायड्र आयोडि ऍसिड ).
''उद् प्लवास्ल'' ''उप्ल'' ( हायड्रोपल्युओरिक ऍसिड ).

या नांवें देण्याच्या नियमाखालीं बहुतेक सर्व अम्लें येतील. परंतु अशीं कांहीं अम्लें आहेत कीं, त्यांचा समावेश या नियमाखालीं होऊं शकणार नाहीं. यांचे विवक्षित व खास धर्म असल्यानें त्यांस प्रसंगानुरूप नावें देण्यांत येतील.

अम्लांच्या नांवांचीं उदाहरणें वर बरींच येऊन गेलीं आहेत. त्यांवरून अम्लांस नांवें देण्याचे नियम चांगलें ध्यानांत येतील. परंतु ही मराठी रासायनिक परिभाषा सांप्रत महाराष्ट्रीयांस विशेष परिचयाची नसल्यानें आणखी कांहीं अम्लांच्या नांवाचीं उदाहरणें खालीं दिलीं आहेत:—

'' आदाम्ल '' '' उद '' ( हायड्र आयोडिक अ‍ॅसिड ).
'' उप अदसाम्ल '' '' उदप्र '' ( हायपो आयोडस अ‍ॅसिड ).
'' अदाम्ल '' उद प्र ( आयोडिक अ‍ॅसिड )
'' परि अदाम्ल '' उद प्र ( पर आयोडिक अ‍ॅसिड )
'' उद स्तंभाम्ल '' = उस्त = ( हायड्रो ब्रोमिक अ‍ॅसिड ).
''उप स्तंभसाम्ल'' = उस्त प्र = (हायपो ब्रोमस अ‍ॅसिड)
''स्तंभसाम्ल'' = उस्तप्र = ब्रोमस अ‍ॅसिड. ''स्तंभाम्ल''
' उस्तप्र ' = ब्रोमिक अ‍ॅसिड. ''उद कर्ब नत्राम्ल'' उकन = हायड्रो सायनिक अ‍ॅसिड. ''कर्बनत्राम्ल'' = उप्रकन = सायनिक अ‍ॅसिड. उदलोहस कर्बनत्राम्ल = उ४ लो ( कन ) = हायड्रो  फेरि सायनाइड.कर्बनत्र मूत्रकाम्ल = उ प्र = सायन् यूरिक अ‍ॅसिड.

द्राक्षाम्ल = टार्टरिक ऍसिड = हें अम्ल मुख्यत्वें द्राक्षापासून निघतें म्हणून द्राक्षावरून त्या अम्लास हें नांव दिलें आहे.

जंबीराम्ल = सायट्रिक अ‍ॅसिड = लिंबापैकीं जंबीर हें मुख्य असल्यानें लिंबांतून निघणार्‍या अम्लास ''जंबीराम्ल'' हें नांव दिलें आहे.

दार्वाम्ल = असेटिक अ‍ॅसिड = हें अम्ल लांकडाच्या निर्जल ऊर्ध्वपातनापासून मुख्यत्वें तयार होतें व लांकूड यास संस्कृत नांव ''दारु'' असल्यानें असेटिक अ‍ॅसिड यास दार्वाम्ल हें नांव दिलें आहे.  

काष्ठाम्ल = ऑक्झॅलिक ऍसिड = हें अम्ल पुष्कळ रीतीनें तयार होतें त्यांत लांकडाचा भुसा हें मुख्य द्रव्य असल्यानें व लांकूड यास काष्ठ हें संस्कृत नांव असल्यानें ऑक्झॅलिक ऍसिड यास काष्ठाम्ल असें नांव दिलें आहे.  

अ ना म्लें.−अम्लांत उज्ज हा अवश्यक घटक असून तो धातुनि:सार्य असतो हें वर आलेलेंच आहे. धातूच्या योगानें अम्लांतील उज्ज हा सर्वस्वीं नि:सार्य झाला व अम्ल पूर्ण निर्गुण (न्यूट्रल) झालें म्हणजे जो पदार्थ तयार होतो त्यास क्षार म्हणतात. उलटपक्षीं अम्लास निर्गुणत्व आणणारा जो पदार्थ त्यास अल्क ( अल्कली ) किवा अनाम्ल ( बेस ) असें म्हणतात. पण अल्क किंवा अनाम्ल याची क्रिया अम्लां वर केल्यास अम्लांतून उज्ज नि:सार्य होऊन पाणी बनतें असें:−

 खट प्राणिद   +  उदहराम्ल   =  खटहरिद   +  पाणी
 खप्र  उह  खह  उप्र
 जशद प्राणिद   +  गंधकाम्ल  =  जशदगंधकित   +  पाणी
 जप्र  उगप्र  जग प्र  उप्र
 सिंधुउत्प्राणिद  मीठ
 ( सोडि.हायड्रॉक्साइड )   +  उदहराम्ल  =  सिंधुहरिद   +  पाणी
 धुप्रउ  उह  धुह   उप्र

अधातुरूपमूलद्रव्यांचें प्राणिद किंवा उत्प्राणिद यांचे पाण्याच्य संयोगानें अम्ल होतें हें अम्लाची उपपत्ति सांगतांना वर आलेलेंच आहे. परंतु धातुरूपमूलद्रव्यांचे प्राणिद किंवा उत्प्राणिद यांवर पाण्याचें कार्य झालें म्हणजे अल्क किंवा अनाम्ल तयार होतात. या पदार्थांचे धर्म अम्लाच्या विरुद्ध असतात. हा धातूंचा धर्म इतका महत्वाचा आहे कीं, यांस धातु हें नांव योजण्याऐवजीं कधीं कधीं अनाम्लजनक ( बेस फॉर्मिग ) मूलद्रव्यें असें नांव देण्यांत येतें. रासायनिकदृष्टया अनाम्लाचें धर्म अम्लाच्या विरुद्ध असतात. व त्यांचा विशिष्ट धर्म म्हटला म्हणजे अनाम्लाचें कार्य अम्लावर झालें म्हणजे अनाम्लें अम्लाशीं संयोग पावन क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात.

सर्व अनाम्लामध्यें ( बेसेस ) सिंधु उत्प्राणिद, किंवा सिंधु उज्जित = धुप्रउ, पालाश उत्प्राणिद. किंवा पालाश उज्जित पाप्रउ; खट उत्प्राणिद, किंवा खट उज्जित ख ( प्रउ ) आणि खटप्राणिद ( चुनकळी ). ख प्र, हे फार प्रचारांतले आहेत. जे अनाम्ल पाण्यांत विरघळतात त्यांस अल्क हें नांव दिलें आहे. अल्क वर्गांतील मुख्य अलक सिंधु व पालाश धातूंचे उत्प्राणिद किंवा उज्जित हे होत. अम्न ( नउ३ ) वायूचा प्रवाह पाण्यांत सोडला म्हणजे नउ प्रउ या घटनेचा संयुक्त पदार्थ बहुत करून तयार होतो ( अमोनि या पहा ). हा पदार्थ सिंधु व पालाश यांच्या उज्जिताप्रमाणेंच सर्व दृष्टीनें कार्यकारी आहे म्हणून यास अमोनि उज्जित असें म्हणतात. यांत न = उ हा जो संघ आहे त्याची धातुप्रमाणेंच रसायन क्रिया घडते. अल्क वर्गांतील हे सर्व साधारण व अत्युपयोगी अल्क आहेत.

या वरील विवेचनावरून हें ध्यानांत येईल कीं अनाम्ल शब्दाच्या अर्थाची व्याप्ति अल्क शब्दाच्या अर्थव्याप्तीपेक्षां अधिक आहे. धातूचे प्राणिद किंवा उत्प्राणिद हे अनाम्ल आहेत कारण ते अम्लास अनाम्ल करितात. व त्यापासून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात. परंतु या धातूंचे कांहीं प्राणिद व उत्प्राणिद असे आहेत कीं, ते पाण्यांत विरघळत नाहींत. उदाहरणार्थ, जशद प्राणिद, जप्र; सीस प्राणिद, सप्र इ० यांचें अम्लावर कार्य होऊन क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात. परंतु हे सिंधु उत्प्राणिद, पालाश उत्प्राणिद या प्रमाणें पाण्यांत विरघळत नाहींत. यामुळें यांचा समावेश अल्क वर्गांत होत नाहीं; परंतु अनाम्ल या वर्गांत यांचा समावेश होतो, तात्पर्य इंग्रजींत ' बेस ' या शब्दानें जो बोध होतो तोच बोध होण्यासाठीं अनाम्ल हा शब्द या परिभाषेंत योजला आहे.

संज्ञा.−इंग्रजी रासायनिक परिभाषेंतील बेस व अल्क यांस मराठी रासायनिक अन्वर्थक नांव काय द्यावें याविषयीं तज्ज्ञांत एकमत असल्याचें दिसून येत नाहीं. तज्ज्ञांत एकमत असल्याचें दिसून येत नाहीं.

प्रो. रानडे ''अल्कली'' शब्दासंबंधानें म्हणतात :- ' व्युप्तत्तीनें ह्याचा अर्थ कलिभस्म ( अ‍ॅशेस ऑफ कली ) असा होतो, कित्येक लोक '' अल्कली '' याला ''कल्याब'' हा मराठी शब्द सुचवितात. परंतु याचा अर्थ विद्यार्थ्यांना सुलभ होणार नाहीं. म्हणून आम्ही कांहीं स्थळीं अल्कली
हाच शब्द कायम ठेविला आहे' (कोश पृ. ५१). आम्हासहि कल्याब हा शब्द अल्कली या अर्थी पसंत नाहीं.

याच्याच पुढें पृ. ५२ वर एन.बी. या लक्षवेधक टीपेंत म्हटले आहे. ' बडोद्यांतील कलाभुवन पाठशाळेंत अल्कलीला कल्याब (ऑन दि अनॉलजी ऑफ तेजाब)'बेस' = 'भस्म' वापरतात' असें लिहिलें आहे. तेजाब हा पदार्थ पाण्यासारखा पातळ असतो. परंतु अल्कलीज जसें सिंधु उत्प्राणिद ( सोडियम हायड्र ऑक्साइड ) पालाश उज्जित ( पोटयाशिअम हायडे्रट ), खट प्राणिद ( कॅलशिअम ऑक्साइड ) इ०. हे पदार्थ पातळ
पाण्यासारखे नसतात, ते घन असतात, हें सर्वांस माहीत आहे. तेव्हां 'ऑन दि ऍनालजी आफ तेजाब' या सादृश्यावर 'कल्याब' शब्द अन्वर्थक नाहीं हें सहज दिसून येईल.

प्रो. रॉय यांनीं अल्कली यास क्षार शब्द वापरला आहे. व प्रो. गज्जर यांनीं यास 'क्षार' व 'कल्याब' वापरून बेस यास ' भस्म ' शब्द वापरला आहे असें म्हटलें आहे. कल्याब शब्द कसा अन्वर्थक नाहीं हें वर सांगितलेंच आहे.

' अल्कली ' यास ' क्षार ' हा शब्द बरोबर नाहीं असे प्रो. मोडकांचें मत आहे (सेंद्रिय रसायनशास्त्र, पूर्वार्ध भा २ रा, परिशिष्ट पृ. ५६२ पहा). तसेंच 'बेस' यास भस्म शोभेल परंतु त्या शब्दानें अडचणी येतात. याकरितां ' बेस ' हाच शब्द ठेवावा असें वाटतें, असें प्रोफेसर मोडक यांचें मत आहे. हिंदी वैज्ञानिककोश व सयाजीवैज्ञानिकशब्दसंग्रह यांत ' बेस ' यास भस्म शब्द दिला आहे. व अल्कली यास क्षार व खार हे शब्द ( हिं. वै. को. ) दिले आहेत. अल्कली हा शब्द सयाजी वैज्ञानिक कोशांत मुळीं दिलाच नाहीं.

अल्कली यास क्षार व बेस यास भस्म हे प्रो. मोडकांच्या मतांप्रमाणें आम्हांसहि पसंत नसून अन्वर्थक दिसत नाहीं. आम्ही '' अल्कली '' यास '' अल्क '' व '' बेस '' यास '' अनाम्ल '' हे शब्द योजिले आहेत. याचें समर्थन खालीं केलें आहे:−

'' अल्क '' या संस्कृत शब्दाचा अर्थ एक प्रकारचें झाड असा आहे. ( आपटे डिक्शनरी पान १५७ ) व झाडाच्या राखेपासून निघणारा क्षार यास अल्क हें नांव देऊन त्यावरून '' अल्क '' हा शब्द इंग्रजी '' अल्कली '' या शब्दाच्या अर्थी वर्गवाचक योजण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. यावरून '' अल्क '' शब्दाची व्युत्पत्ति संस्कृत शब्दापासून ठरते.

'' अल्क '':−प्रो. रानडे कोश. पृ. ३१८ नियम ७ यांत '' इंग्रजी '' नांवांच्या लॅटिन किंवा ग्रीक धातूंनां संस्कृत वर्णोच्चार रूप देऊन तेच धातुशब्द कायम करून क्रुम, कर्ब आणि रद '' हे शब्द ज्या तत्वावर योजण्यांत आले आहेत त्याच तत्वावर '' अल्कली '' शब्दावरून '' अल्क '' हा शब्द योजला आहे.

त्याचप्रमाणें इंग्रजी शब्दांस मराठी शब्द योजण्यासंबंधानें प्रो. मोडकांचें असें मत आहे:−'' हे शब्द इंग्रजी शब्दांशीं सदृश असे मराठी भाषेस शोभणारे व मराठी पेहराव दिलेले असे आहेत ही गोष्ट जरी शब्द व्युत्पत्तिशास्त्रास संमत नसली तरी असे शब्द योजणें फार सोईचें व  संयुक्तिक आहे व तसे केल्यावांचून चालण्याजोगें नाहीं '' ( सेन्द्रि० र. पू. भा. २ _प्रस्तावना पृ. ९ पहा ). पाश्चात्य रसायन शास्त्राच्या वाढीबरोबर असंख्य रासायनिक नवे नवे शब्द फारच सूक्ष्म अर्थाचे प्रचारांत आलेले आहेत. या सर्वांस अन्वर्थक असे संस्कृत शब्द सांपडणें कठिण आहे. या करितां '' इंग्रजी शब्दास सदृश असे मराठी भाषेस शोभणारे व मराठी पेहेराव दिलेले शब्द '' व्युत्पत्तिशास्त्रास संमत नसले तरी या मार्गाचें अवलंबन केल्याशिवाय चालण्याजोगें नसल्यानें प्रस्तुत रासायनिक परिभाषेंत या तत्तवावर पुष्कळ शब्द योजल्याचें आढळून येईल व याच आधारावर '' अल्कली शब्दावरून '' अल्क '' हा शब्द योजला आहे.

'' अनाम्ल '' :− '' बेस '' यास '' अनाम्ल '' हा शब्द आम्ही खालील आधारावर योजला आहे.

'' बेस '' या शब्दाची व्याख्या ( १ ) वेब्स्टर्स कॉलिजिएट डिक्शनरी, ( २ ) कनसाइज ऑक्सफोर्ड डिक्शनरी, ( ३ ) एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका आवृत्ति ११ वगैरे इंग्रजी कोशांतून पहांतां असे दिसून येईल कीं, ( १ ) नॉन अ‍ॅसिड कांपोनंट आफ् ए साल्ट, ( २ ) कोरिलेटिव्ह ऑफ ऍसिडस्, ( ३ ) अँटिथेटिकल टु अ‍ॅसिड्स वगैरे अम्लघ्न, अम्लहर, अनाम्ल वगैरे सूचक विशेषणात्मक वाक्पादानें '' बेस '' याच्या अर्थाची फोड केलेली आहे. परंतु ''अल्कली'' संबंधानें या अर्थाचीं विशेषणें योजलेलीं नाहींत. यावरून '' बेस '' यास '' नॉन अ‍ॅसिड कांपोनंट '' '' कोरिलोटिव्ह टु अ‍ॅसिड्स् '' '' अँटिथेटिकल टु अ‍ॅसिड्स् '' या अर्थाचाच मराठी शब्द वापरणें इष्ट दिसतें. '' अम्ल '' हा शब्द '' अ‍ॅसिड '' या अर्थी रूढच आहे तेव्हां यावरून वरील अर्थसूचक अम्लघ्न, अम्लहर, अनाम्ल, वगैरे शब्द होतात व यापैकीं '' अनाम्ल '' हा शब्द विशेष योग्य वाटल्यानें '' बेस '' यास '' अनाम्ल '' ( नाम व वि. ) शब्द योजिला आहे व यासंबंधीं या सर्वांचें मतैक्य होईल अशी आशा आहे.

'' अल्कली '' यास '' अल्क '' व '' बेस '' यास '' अनाम्ल '' हें शब्द याप्रमाणें निश्चित केल्यावर त्यांच्या व्याख्या देणें इष्ट आहे. करितां त्या खालीं दिल्या आहेत.

'' अल्क '':−रासायनिक मूळ द्रव्यांपैकीं धातुरूप मूळ द्रव्याचें प्राणिद ( ऑक्साइड्स् ), उत्प्राणिद ( हायड्रऑक्सा इड्स् ) वगैरे संयुक्त पदार्थ, दाहक सिंधु ( कॉस्टिक सोडा ),दाहक पालाश ( कॉस्टिक पोटॅश ), अम्न ( अमोनिया ) इ. यांच्या प्रमाणें पाण्यांत अति विद्राव्य आहेत. ज्यांचे जलद्रव दाहक असतात, जे तीव्र अम्लांस निर्गुण ( न्युट्रल ) करतात, व ज्यांच्या संसर्गानें उद्भिज्ज पिंवळे रंग लाल किंवा तांबूस होतात, उद्भिज्ज लाल रंग निळे होतात व उद्भिज्ज जांभळे रंग हिरवे होतात अशा पदार्थांस '' अल्क '' म्हणावें. अल्क हे '' अनाम्ल '' आहेत.

'' अनाम्ल '':−अनाम्लें हीं घनध्रुवीमूलद्रव्य, अधातुरूपमूलद्रव्य किंवा मूलक यांचे प्राणिद किंवा उत्प्राणिद ( हायड्रॉक्साईड्स ) असतात. तीं अम्लांस निर्गुण करून त्यांपासून क्षार व पाणी हे तयार होतात. अनाम्लें अम्लांस निर्गुण करतात. तीं अल्काप्रमाणें तीव्र व पाण्यांत द्राव्य नसतात. अल्काप्रमाणें अनाम्लें उद्भिज्ज रंगास विवर्ण क्वचितच करतात. अम्ल तीव्र असलें तर तें निर्बल अनाम्लांनीं पूर्ण निर्गण होत नाहीं.

निर्गुणीकरण :− उद्भिज्ज लिटमस नांवाचा रंग असतो त्याच्या निर्गुणद्रवाचा रंग निळा असतो. अम्लांच्या द्रवांच्या अंगीं या निळया रंगास लाल करण्याचा धर्म आहे, व अनाम्लांच्या पाण्यांत केलेल्या द्रवांच्या अंगीं या लाल रंगास पूर्ववत् निळा रंग आणण्याचा धर्म असतो. उदाहरणार्थ, लिटमसच्या निर्गुण द्रवांत उत्-हराम्लाचे एक दोन थेंब मिळविले तर द्रवास लाल रंग येईल. आतां या लाल द्रवांत सिंधु उत्प्राणिदाच्या ( सोडियम हायड्रेट ) पाण्यांत केलेल्या द्रवाचे थोडेसे थेंब मिळविले तर मूळचा निळा रंग त्या लाल द्रवास पुन: प्राप्त होईल. यांत पुन: अम्ल मिळविल्यास या द्रवास पुन: लाल रंग येतो. ज्यावेळीं द्रवास लाल रंग प्राप्त होतो त्यावेळीं त्यास अम्ल प्रतिक्रिया म्हणतात; व ज्यावेळीं द्रवास निळा रंग प्राप्त होतो त्यावेळीं त्यास अल्क प्रतिक्रिया म्हणतात. जर निळया रंगाच्या द्रवांत अम्ल विशेष काळजीपूर्वक मिळवीत राहिलें तर निळा रंग कमी कमी स्पष्ट होत जातो व अशी स्थिति येते कीं द्रवास निळसर रंग असून त्यांत थोडीशी तांबूस रंगाची छटा असते. या स्थितींतील द्रवास किंवा या स्थितीच्या अगदीं जवळ जवळ द्रवाची स्थिति आली म्हणजे द्रव निर्गुण असतो म्हणजे तो अम्लहि नसतो व अल्कहि नसतो. अम्ल आणि अल्क यांनीं एकमेकांचे धर्म निर्गुण किंवा नाहींसे केलेले असतात. अम्ल आणि अनाम्ल यांची एकमेकांवर प्रतिक्रिया करून अम्ल आणि अनाम्ल धर्म निर्गुण किंवा नाहींसे करण्याची जी रीत त्या रीतीला निर्गुणीकरण असें म्हणतात.

यापुढें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, अनाम्लाचें एक निश्चित प्रमाण घेतलें तर त्यास निर्गुण करण्यास अम्लाचेहि निश्चित प्रमाण लागतें काय? याचें सप्रमाण उत्तार प्रत्यक्ष प्रयोगानेंच मिळण्यासारखें आहे. याकरितां अम्लाचे व अनाम्लाचे द्रव उदाहरणार्थ, उद्धराम्ला ( हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड ) चा आणि सिंधु उत्प्राणिदाचा असे दोन द्रव तयार करावेत. एका कांचपात्रांत किंवा पेल्यांत अम्लद्रवाचें प्रमाण बरोबर मोजून घालावें व त्यांत '' लिटमसच्या '' द्रवाचे दोन तीन थेंब घालावेत. नंतर सिंधु उत्प्राणिदाचा द्रव एका शांकित ( ग्रॅज्वेटेड ) कांचनलिकेंत घालून तींतून सिंधु उत्प्राणिदाचा द्रव कांचपात्रांतील अम्ल द्रवांत थेंब थेंब घालीत रहावें

ही क्रिया द्रवास निर्गुण स्थिति ( निर्गुणत्व ) येई पर्यंत सुरू ठेवावी. द्रव निर्गुण झाला किंवा नाहीं हें अल्कच्या शेवटच्या थेंबानें द्रवास निळसर रंग येतांच दिसेल. अम्ल द्रव निर्गुण होण्यास अल्कचा किती द्रव लागला हे अंशांकित नलिकेंत काळजीपूर्वक पाहून टिपून ठेवावें. याच द्रवांचें निरनिराळें प्रमाण घेऊन हे प्रयोग बरेच वेळां केले तर असें आढळून येईल कीं, अम्लद्रवाच्या निश्चित प्रमाणास निर्गुण करण्यास अल्कच्या द्रवाचें तेंच प्रमाण प्रत्येक वेळीं लागेल. उलटपक्षीं अल्कच्या निश्चित प्रमाणास अम्लचें तेंच निश्चित प्रमाण लागेल. असले असंख्य प्रयोग करून असें सिद्ध झालें आहे कीं, सर्व अम्लें व सर्व अल्क यांस हाच नियम लागू आहे.

क्षा र.−वरील अम्लद्रव आणि अल्कद्रव निर्गुण करून तयार झालेला द्रव जर बाष्पक ( इव्हॅपोरेटिंग ) पात्रांत ओतला आणि त्यांतील पाणी बाष्परूपानें उडवून टाकलें तर बाष्पकांत एक पांढरा पदार्थ राहील; तो जिभेवर ठेवून त्याची रुचि घेतली तर तो ताबडतोब ओळखतां येईल. हा पदार्थ सिंधु हरिद (सोडियम क्लोराइड ) म्हणजे नेहमीच्या खाण्यांतले मीठ होय. यांत रासायनिकक्रिया प्रतिक्रियां काय झाल्या आहेत त्या खालील समीकरणानें दाखविल्या आहेत:−

 सिंधु उत्प्राणिद  +    उद्धराम्ल  =  सिंधुहरिद  +  पाणी
 (सोडि. हायड्रेट.)  (हायड्रोक्लो. अ‍ॅ. )  मीठ
 धुप्रउ   उह  धुह  उप्र

या पदार्थाचें लिटमस द्रवावर कोणतेंहि कार्य होत नाहीं, किंवा कोणत्याहि तर्‍हेनें त्यांत अम्ल किंवा अल्क धर्म असल्याचें दृष्टोत्पत्तीस येत नाहीं; दुसर्‍या शब्दांनीं सांगावयाचें ह्मणजे अम्लद्रव व अल्कद्रव एकत्र होऊन त्यांचे अम्ल व अल्क धर्म हे पूर्णपणें नाहींसे झालेले किंवा निर्गुण झालेले आहेत. मीठ हा पदार्थ क्षार वर्गाचा आदर्शरूप आहे. अम्लांतील नि:सार्य उज्जच्या ऐवजीं आनाम्लांतील धातुरूप घटक येऊन तयार झालेले जे पदार्थ त्यांस क्षार म्हणतात.

हे क्षार दोन प्रकारचे आहेत. एकांत '' प्राण '' हा घटक असतो व दुसर्‍यांत प्राण हा घटक नसतो. मीठ या क्षारांत प्राण हा घटक नाहीं. परंतु निर्गुणीकरणाच्या प्रयोगांत पालाश उत्प्राणिद् ( पोटयाशियम हायड्रेट ) व गंधकाम्ल यांच्या द्रवांचा उपयोग केला आणि निर्गुण झालेला द्रव आटविला तर बाष्पक पात्रांत एक पांढरा निर्गुण क्षार आढळेल. हा क्षार पालाश गंधकित ( पोटयाशिअम सल्फेट ) असून तो खालील समीकरणानें तयार झाला:−

गंधकाम्ल    पालाशउत्प्राणिंद        पालाशगंधकित        पाणी
(सल्फ्युरिक अ‍ॅ. )    ( पोटयाशियम हापड्रेट )    ( पोटयाशि. सल्फेट )
गप्र        +    पा प्र उ =पा    गप्र४        +    २ उ प्र

या बाबतींत वरील समीकरणावरून असें दिसून येईल कीं या क्षारांत−पालाश गंधकितांत−प्राण हा घटक आहे, व वरील मीठ या क्षारांत प्राण हा घटक नाहीं.

साधारणत: क्षारांचे निर्गुण धर्म असतात म्हणजे त्यांची प्रतिक्रिया अम्ल किंवा अल्कधर्मीय नसते. परंतु हा नियम सर्वव्यापी नाहीं. तीव्र ( स्ट्राँग ) अम्लाची क्रिया निर्बल अनाम्लावर ( बेस ) केली असतां तयार झालेला क्षार अम्ल धर्मी असूं शकेल. उदाहरणार्थ-पारद नत्रित-मरक्र्यु रिकनायट्रेट ); तसेंच निर्बल अम्लाची क्रिया तीव्र अनाम्लां ( बेस ) वर केली तर तयार झालेला क्षार अल्कधर्मीय असूं शकेल. उदाहरणार्थ सिंधुकर्बित ( सोडियम कार्बोनेट )  हा क्षार सिंधु उत्प्राणिद हें तीव्र अनाम्ल व कर्बाम्ल ( कॅरबॉनिक ऍसिड ) हे निर्बल अम्ल मिळून तयार झालेला क्षार आहे. हा अल्कधर्मी आहे कारण याची प्रतिक्रिया लिटमसावर अल्कीय असते. हें लक्षांत ठेवणे जरूर आहे कीं ज्या वेळीं अनाम्ल व अम्ल यांची एकमेकांवर रासायनिक क्रिया होते. त्यावेळीं क्षार व पाणी हे पदार्थ होतात, अनाम्लांऐवजी धातूरूप मूलद्रव्यें योजूनहि क्षार तयार होतात. परंतु या प्रसंगीं पाणी तयार न होतां उज्ज वायु तयार होतो जसें:−

जशद        गंधकाम्ल        जशदगंधकित        उज्ज
झिंक        सल्फ्युरिक ऍ.        झिंकसल्फेट        हायड्रोजन
ज    +    उ२गप्र४        =    जगप्र४        +    उ२

( यासंबंधीं जास्त माहिती '' क्षार '' शब्दाखालीं पहा )

अ म्ल अ मि दें ( ऍसिड् अमाइड्स ) :− अम्ल अमिदें हे रासायनिक संयुक्त पदार्थ आहेत. हे पदार्थ अम्ल ( अमोनिया नउ३ ) मधील उज्जनि:सारित होऊन त्या जागीं अम्लमूलकें जाऊन झालेले असतात. अम्ल मधील उज्जचा एक परमाणु, दोन परमाणु आणि तीन परमाणु नि:सारित होऊन जीं अम्ल अमिदें बनतात त्यांस अनुक्रमें आद्य, द्वितीयक आणि तृतीयक अमिदें म्हणतात. यापैकीं मू. क. प्र. मउ२ या घटनेचीं आद्य अमिदें फार महत्वाचीं आहेत. हीं आमिदें तयार करण्याच्या रीती खाली दिल्या आहेत.
( १ ) अम्लाचा ( अमोनि अमोनियम ) क्षार निर्जल करून त्याचे शुष्कपातन करावें.
( २ ) ( नत्रिलांची ( नायट्राइल्स ) आंशिक ( पार्शल ) उदकप्रक्रिया ( हायड्रॉलिसिस ) करावी.
( ३ ) अम्ल हरिदांवर ( ऍसिड क्लोराइड्स ) अम्नची किंवा अमोनि कर्बिताची क्रिया करावी;
( ४) अनुज्जिदांवर ( अन हायड्राइड्स ) अम्नची किंवाअमोनि कर्बिताची क्रिया करावी.
( ५ ) किंवा संयुक्त इंथ्रे ( ईस्टर्स ) अम्ल बरोबर उष्ण करावींत म्हणजे आद्य अमिदें तयार होतात.

अमिदें घन. स्फटिकरूप संयुक्त पदार्थ आहेत. ( पुत्तिकामिद = फार्म अमाइडचा अपवाद करून ) हीं अमिदें प्रथम पाण्यांत विद्राव्य असतात; ही
विद्राव्यता−अणूंमधील कर्बचें प्रमाण जसें वाढत जाईल त्या मानानें कमी होत जाते. यांची उदक- प्रक्रिया ( हायड्रालिसिस ) सहज होते; अल्कें किंवा अम्लें यांबरोबर अमिदें उकळिलीं असतां त्यांचे घटक असंयुक्त होतात. अमिदांचा इथ्रांमध्यें द्रव करून त्या इथ्रद्रवांत उद्धराम्ल वायु घातला असतां उद्धराम्लाशीं अमिदें संयुक्त होतात; परंतु हें संयुक्तपदार्थ अति अस्थिर असतात, कारण पाण्याच्या योगानें त्यांचें त्वरित पृथक्करण होतें.

दुसर्‍यापक्षीं अमिदें किंचित् अम्लधर्मी असतात कारण अमिल मूलकांतील ( अ‍ॅमिडो ग्रुप ) उज्ज हा धातु नि:सारणीय असतो व त्यापासून पारद दारिल अमिद ( कउ कप्रनउ ) रा, या घटनेचे पदार्थ बनतात. नत्रसाम्नाची क्रिया अमिदांवर केली म्हणजे ते पृथग्भूत होतात.
त्यांतून नत्र असंयुक्त होतो व अनुरूप ( कारेस्पॉन्डिंग ) अम्ल तयार होतें तें असें:−

अमिद        नत्रसास्ल        अनुरूपअम्ल        नत्र पाणी
मू.कप्र.नउ  +    प्रनप्रउ        =    ( मू.कप्रप्रउ )    +    न + उप्र

स्फुर अनुज्जिदांबरोबर त्यांचें पातन केलें ह्मणजे त्यांच्यापासून नत्रिलें तयार होतात. अमिदांवर, स्तंभ व अल्कहल द्रवित दाहक पालाश क्रिया केली म्हणजे अमिनें तयार होतात. परंतु त्यांत मूळ अमिदांपेक्षां एक कर्ब परमाणु कमी असतो. ही प्रतिक्रिया उपपत्तिदृष्टया फार महत्वाची आहे. ही प्रतिक्रिया खालीं दाखविली आहे.
मू. क प्र न उ२    --    मू.कप्रउस्त    --
--    मू.नउ२    +    पा२कप्र३    +    पास्त    +    उ२प्र

पुत्तिकामिद, उ.कप्रनउ२, रसरूप असून सहज जल विद्राव्य आहे. याचा उत्क्कथनांक १९५° श असून त्याचें अंशमात्र पृथक्करण होतें. दार्वमिद कउ३ कप्रनउ२, निर्वर्ण स्फटिक रूप आर्द्र्रता शोषक घन पदार्थ आहे. याचा रसांक ८२°−८३° श असून उत्क्कथनांक २२२° श असतो. अमोनि दारिताचें शुष्क पातन करून हा अमिद बहुधां तयार करितात. दार्वमिद पाण्यांत व अल्कहलांत सहज विद्राव्य असतो. परंतु इथ्रांत अविद्राव्य असतो.

उदामिद, क६उ५ कप्रनउ,२ याचे पर्णाकार स्फटिक होतात व ते १३०° श वर वितळतात. अमोनि कर्बिताची क्रिया उदायिल हरिदांवर क६उ५ कप्रह केली म्हणजे उदामिद तयार होतो. याचा रजत क्षार इथिल अदिदाशी संयुक्त केला म्हणजे उदइमिद इथिल इथ्र. क६उ५क: ( नउ ). प्रक२उ५ ( बेन्झ इमिडो एथिल इथर ) तयार होतो.
यावरून हा रजतक्षार पाशविपर्यस्त इमिद उदाम्लां क6उ5क: ( नउ ). प्रउपासून निघाला असावा असें सिद्ध होतें.

( मूकप्र )२ नउ आणि ( मूक प्र )३ न या घटनेची द्वितीयक आणि तृतयिक अमिदें, आद्य अमिदें किंवा नत्रिलें यापासून २००° श उष्णमानावर अम्लें किंवा अनुज्जिदें ( अनहायड्राइड्स ) यांबरोबर उष्ण केली म्हणजे तयार होतात.

मू. कग नउ२ या घटनेची गंधकिल अमिदें ( थिआमाइड्स ) हीं नत्रिलांवर उज्जगंधकिदाची ( सल्फ्युरेटेड हायड्रोजन ) क्रिया केली किंवा अम्ल अमिदांवर स्फुरपंच गंधकिदाची क्रिया केली ह्मणजे तयार होतात. उष्णतेनें त्यांचें सहज पृथक्करण होते आणि अल्कांच्या योगें त्यांजवर उदकप्रक्रिया ( हायड्रोलिसिस ) होते. अम्ल अदिदांपेक्षां या अमिदांच्या अंगीं अधिक अम्लधर्म आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .