प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अयोध्या प्रांत − संयुक्त प्रांतांतील एक ब्रिटिश भाग. क्षेत्रफळ २३,९६६ चौ. मैल. २५°३४' ते २८°४२' उत्तर अक्षांश आणि ७९°४१' ते ८३°८' पूर्वरेखांश. लोकसंख्या ( १९२१ सालीं ) १,२१,६६,६४२ होती.

म र्या दा :−उत्तरेस नेपाळ संस्थान व आग्रा प्रांत. पूर्वेस गोरखपूर व बनारस विभाग, पश्चिमेस बरेली व आग्रा विभाग, व दक्षिणेस अलाहाबाद विभाग.
भागीरथी नदी ह्या प्रान्ताच्या नैऋत्य सरहद्दीवरून वहात जाते. उत्तारेकडील तीन जिल्हे ( खेरी, बाहरैच व गोंडा ) हे हिमालयाच्या पायथ्याशीं असून उरलेला सर्व प्रान्त गंगेच्या सपाट प्रदेशांत आहे. तराईच्या भागांत जास्त पाऊस पडतो. त्यामुळें तेथील हवा सर्द असते. जिल्ह्याच्या उत्तार-भागांत बरेंच जंगल आहे. नद्यांच्या रेतींतून सुवर्णाचे कण सांपडतात. येथें मीठ तयार करीत पण सध्यां सरकारनें त्यास बंदी केली आहे. ह्या प्रदेशास वायव्य आग्नेय उतार आहे. या प्रदेशांतील मुख्य नद्या म्हटल्या म्हणजे गंगा, गोग्रा(शरयू,) राप्ती, गोमती, सई व शारदा या होत. शिवाय दाहर नांवाचा एक तलावहि या भागांत आहे.

इ ति हा स, प्राचीन : −अयोध्या हें शहर कोसल देशाच्या राजधानीचें शहर होतें. रामचंद्राचा पिता सूर्यवंशीय दशरथ  हा येथील राजा होता. अयोध्या प्रांतांतील बर्‍याच ठिकाणीं यात्रेकरू भाविक दृष्टीनें दर्शनास जातात. रामाच्या मृत्यूनंतर राज्याचे उत्तारकोसल व दक्षिणकोसल असे दोन विभाग त्याचे पुत्र लव व कुश या दोघांमध्यें झाले. रामायणाच्या कथानकाचा अजून बरोबर कालनिर्णय करतां येत नाहीं.

बुद्धकाल :−बौद्ध वाडमयांत गौतमबुद्ध हा बरींच वर्षे पर्यंत श्रावस्ती येथें राहिला होता असें लिहिलेलें आढळतें. श्रावस्तीच्या स्थलनिर्णयाविषयीं अजून वाद आहे. पण एवढें मात्र खरें कीं हें ज्या राज्याच्या राजधानीचें शहर होतें, त्यांत गोग्रा नदीच्या उत्तरेकडील अयोध्या प्रदेशाचा समावेश होत असे.

ह्या प्रान्तांत अद्यापहि बौद्धकालीन अवशेष सांपडतात. गोंडामधील साहेत माहेत येथें सांपडलेल्या १२ व्या व १३ व्या शतकांतील लेखावरून हें सिद्ध होतें.

गुप्तकाल :− नंतर मगधदेशच्या गुप्त राजांचा उदय होईपर्यंत ह्या देशाचा इतिहास अज्ञात आहे. गुप्त राजांनीं साकेत किंवा अयोध्या हें शहर घेतलें असें पुराणांतरीं लिहिलेलें आढळतें. बहुधा समुद्रगुप्ताच्या बापाच्या कारकीर्दीपासूनच तें व श्रावस्ती हीं दोनहि शहरें गुप्तांच्या राज्यांत मोडत असावींत. पांचव्या शतकांत पाटलिपुत्रापेक्षां अयोध्या हेंच गुप्ताच्या राज्यांतील अधिक महत्तवाचें शहर होतें असें मानण्यास जागा आहे. अयोध्या हें पाटलिपुत्रापेक्षां अधिक मध्यवर्ती होतें व तें समुद्रगुप्ताच्या व त्याच्या मुलाच्या कारकीर्दीत कांहीं कालपर्यंत त्या राजधानीचें ठिकाण झालें असावें. समुद्रगुप्ताच्या पुत्राची अयोध्येस तांब्याचीं नाणीं पाडण्याची एक टांकसाळ असावी असें वाटतें. दक्षिणेंतील चालुक्यांच्या उत्तारकालीन शिलालेखांत आपण अयोध्येच्या राजांचें वंशज आहोंत असें त्यांनीं म्हटलेलें आढळतें.

मुसुलमानांच्या स्वार्‍या.−या कालानंतर पुढील कित्येक शतकांचा अयोध्येचा इतिहास उपलब्ध नाहीं. तथापि इ. स. १०५० पर्यंत हा प्रांत पाटणा आणि कनोज येथील राजांच्या ताब्यांत होता असें स्थूलमानानें म्हटलें तरीचालेल. या समयास भार नामक लोकांनीं (त्यांचे वंशज अद्यापि फैजाबाद व सुलतानपूर जिल्ह्यांमध्यें आहेत. ) बंड करून कनोजची राज्यसत्ता झुगारून दिली. त्यांच्यापैकीं बाल व दाल या दोन पुरुषांच्या संयुक्त कारकीर्दीत त्यांच्या राज्यसत्तोचा चांगला अभ्युदय होऊन तिचा प्रसार माळवा प्रांतापर्यंत झाला. यांच्या ताब्यामध्यें कडा कलिंजर हे किल्ले होते.

अयोध्या प्रांतावर मुसुलमानांची पहिली स्वारी गझनीचा प्रसिद्ध सुलतान महमूद याचा भाचा सय्यद सालर मसाऊद गाझी यानें केली. खुद्द सुलतान महमूद कनोजपर्यंत स्वार्‍या करून आला होता. परंतु अयोध्या प्रांत त्याच्या ताब्यांत आला नाहीं. म्हणून त्यानें पुढें आपल्या मेहुण्याचा मुलगा सय्यद सालर यास अयोध्याप्रांत सर करण्यास पाठविलें. तेव्हां अयोध्याप्रांतांतील संस्थानिक व सय्यद सालर यांच्या दरम्यान अनेक लढाया झाल्या. अखेर साहेत माहेत येथील शेवटचा सोमवंशी राजा सोहलदेव यानें त्याशीं निकराचें युद्ध करून त्यास ता. २० रजब ४२४ हिजरी, म्हणजे ता. १४ जून इ. स. १०३३ रोजीं ठार केलें. व त्याच्या खाशा सैन्याचा फन्ना उडविला. या युद्धामध्यें अयोध्येच्या हिंदू राजास यश आल्यामुळें कांहीं कालपर्यंत हा प्रांत स्वतंत्र राहिला. परंतु पुढें शहाबुद्दीन घोरी यानें इ. स. ११९३ मध्यें अयोध्याप्रांत पादाक्रांत करून मुसुलमानी सत्तोखालीं आणला.

अफगाणांचा अंमल :− इ. स. १२२६ मध्यें मलीक नासिरुद्दीन हा अयोध्येचा अधिपति असून त्यानें भार लोकांचें वर्चस्व कमी करून त्यांना दाबांत ठेविलें होतें. इ. स. १२४३ मध्यें दिल्लीपति अल्लाउद्दीन यानें आपला चुलता नासिरुद्दीन यास अयोध्या प्रांतांतील बाहरैच येथील सुभेदार नेमिलें. त्याच्या कारकीर्दीत बाहरैच प्रांताचा चांगला उत्कर्ष झाला. हाच नासिरुद्दीन पुढें दिल्लीचा बादशहा झाला व त्यानें दाल व बाल या भार लोकांच्या अधिपतींचा इ. स. १२४६ मध्यें पराभव करून भार सत्तोचा समूळ नाश केला. तथापि इ. स. १३५० पर्यंत अयोध्येमध्यें मुसुलमानांचें विशेष प्राबल्य नव्हतें. यानंतर उत्तारेकडून येणार्‍या अविंधसत्तोच्या लाटांबरोबर मुसुलमानांची वस्ती वाढत जाऊन विशेषेंकरून हरदुई, लखनौ, बाराबंकी व फैजाबाद येथें त्यांचा भरणा विशेष झाला.

अयोध्या, बाहरैच, सांडिल व माणिकपूर येथें दिल्लीपतीचे राजप्रतिनिधी होते. १३९४ मध्यें रव्वाजाजहान हा कनोज, अयोध्या, कडा व जोनपूरचा अधिकारी नेमला गेला. पण लवकरच तो स्वतंत्र झाला.

सुमारें ८० वर्षे पर्यंत किंवा त्याहूनहि अधिक काल हा प्रान्त जानपुरच्या शरकी राज्यांत मोडत असे. जानपूरचें राज्य १४७८ मध्यें लयास गेलें. नैर्ऋत्येकडील भागांत ( बियास ) रजपुतांचा मुख्य तिलोकचंद हा बराच प्रसिध्दीस आला. ह्याच्या मालकीच्या प्रदेशास ' बेसवाडा ' म्हणत असत

मोंगलांची सत्ता :− १५२६ मध्यें पानिपतच्या युद्धानंतर बाबरला दिल्ली व आग्रा ह्या प्रदेशांचा ताबा मिळाला. पण लोदी घराण्यांतील राजांची मध्यदुआब, अयोध्या व संयुक्त प्रान्ताच्या पूर्वेकडील जिल्हे या भागांवर सत्ता होती. १५२७ मध्यें बाबरनें त्यांचा दक्षिणअयोध्येमध्यें कनोजनजीक पराभव केला व तेथून अयोध्येस जाऊन तेथें १५२८ मध्यें मशीद बांधिली. १५३१ मध्यें अफगाण लोकांचा हुमायूननें लखनौ नजीक पराभव केला पण अफगाण लोकांचा नूतन सेनापति शेरखान ह्यानें १५४० मध्यें हुमायूनचा पराभव करून त्यास हिंदुस्थानाबाहेर पळवून लाविलें. पुढें ५ वर्षे पर्यंत ह्या प्रदेशांत शांतता होती. पण १५४५ मध्यें शीरशहा वारल्यावर अफगाण सत्तोचा ऱ्हास होऊं लागला व १५५५ मध्यें हुमायूननें पुन्हां आपली सत्ता प्रस्थापित केली. यानंतर पुन्हां १५६५ त अयोध्येचा जहागिरदार इस्कंदरखान व जोनपूरचा खानजमान यांनीं बंड करून लखनौ घेतलें पण त्यांचा लवकरच पराजय करण्यांत आला.  

अकबराच्या कारकीर्दीत साम्राज्याचे प्रान्तवरी भाग पाडण्यांत आले. तेव्हां अयोध्या प्रान्ताचा एक वेगळा सुभा बनविण्यांत आला ( इ. स. १५९० ). ह्या सुभ्यांत ५ सरकारांचा व ३८ परगण्यांचा समावेश होत असे. ह्या सुभ्याकरितां ७६४० घोडे स्वार, १,६८,२५० पायदळ व ५९ हत्ती ठेवलेले होते. त्यावेळीं अयोध्या हें एक हिंदुस्थानांतील प्रमुख क्षेत्राचें स्थान असून लखनौ शहरहि उदयास येत चाललें होतें. राजा तोडरमल हा अयोध्या प्रान्तांतील रहिवासी होता.

पुढील मोंगल कारकीर्दीत १५० वर्षेपर्यंत महत्तवाचें असें कांहीं घडलें नाहीं. या राजांच्या अमदानींत या प्रांन्ताच्या वसुली उत्पन्नाचा आंकडा ५० लाखांवरून ८३ लाखांपर्यंत चढला. ह्यावरून हा प्रान्त मोठया भरभराटींत होता असें अनुमान काढतां येतें. या प्रान्ताचें क्षेत्रफळ सुमारें दुपटीनें वाढलें होतें. शहाजहान व अवरंजेबांच्या वेळीं गादीसंबंधीं जीं भांडणें झाली त्यांत अयोध्या प्रान्ताच्या बर्‍याचशा भागास उपसर्ग झाला नाहीं.
 
सादतखान ( १७२४−१७३९ ) : −अवरंगजेब बादशहा मृत्यु पावल्यानंतर दिल्लीची पातशाही कमजोर झाली तेव्हां, अयोध्याप्रांत स्वतंत्र झाला. १७२४ मध्यें महंमद अमीन उर्फ सादतखान यास अयोध्येचा सुभा नेमण्यांत आलें. फैजाबाद शहर ह्यानेंच वसविलें पण त्याचा बहुतेक काळ मराठयांशीं व नादिरशहाशीं झगडण्यांतच गेला. अयोध्येचा व अलाहाबादचा कारभार त्याचे प्रतिनिधी पहात असत ( सादतखान पहा ).

सफदरजंग ( १७३९−१७५४ ) : − त्याच्यानंतर १७३९ मध्यें त्याचा पुतण्या व जांवई सफदरजंग हा अयोध्या प्रांताचा कारभार पाहूं लागला. याच्या कारकीर्दीत प्रान्ताची भरभराट असून यानें बरींच लोकहिताचीं कामें केलीं. यानें फैजाबांद हें आपल्या राजधानीचे शहर केलें. याच्या कारकीर्दीतील महत्तवाच्या गोष्टी म्हटल्या म्हणजे रोहिल्यांचा उत्कर्ष व त्यांच्याशीं युध्दें, अहमदशह अबदालीं अथवा दुराणी याच्या उत्तरेकडील स्वार्‍या व फरूकाबादच्या पठाण नबाबांचे पुंडावे व त्यांशीं युद्ध या होत. सदर रोहले पठाणांशीं झालेल्या युध्दांत एकदां तर सफदरजंगाचा अयोध्या प्रांत त्याच्या ताब्यांतून गेला व त्यामुळें त्याला मराठयांची मदत घेऊन तो परत मिळवावा लागला. मराठयांचा रोहिलखंडांत प्रवेश होण्याचें हेंच कारण होय. सफदरजंगानें १७४८ पासून सुमारें सहा वर्षे दिल्लीच्या बादशहाच्या वजिरातीचें काम केलें [  सफदरजंग पहा ].

सुजाउद्दौला(१७५४-१७७५) : − इ. स. १७५४ सालीं सफदरजंग मरण पावला व त्याचा पुत्र सुजाउद्दौला हा गादीवर आला. ह्यानें आपली राजधानी लखनौ येथें आणली. त्यानें-नवीन वजीर गाजीउद्दीन यानें मराठयांस मदतीस बोलाविलें होतें त्यांस रोहिल्यांच्या मदतीनें हांकून लावलें. वजीर गाजीउद्दीन याच्या छळामुळें जेव्हां राजपुत्र अल्ली गोहर (हाच पुढें शहाअलम दुसरा झाला.) हा इ. स. १७५८  मध्यें दिल्लीहून सुजाउद्दौल्याकडे पळून आला तेव्हां त्यास सुजाउद्दौल्यानें बंगालवर स्वारी करण्याची सल्ला दिली. १७६१ मधील पानिपतच्या लढाईंत सुजाउद्दौला हा मुसुलमानांच्या वतीनें लढला. शहाअलम बंगाल घेण्याचा प्रयत्‍न सोडून लवकरच सुजाउद्दौल्याकडे परत आला. ह्याचवेळीं दिल्ली पतीच्या वजिरातीचें काम सुजाउद्दौल्यास वंशपरंपरा मिळाले. १७६३ मधील पाटणाच्या कत्तलीनंतर मीरकासीम व त्याचा सेनापति सुमरू हे अयोध्येस पळून आले तेव्हां तेथें त्यास सुजाउद्दौल्याची व पादशहाची मदत मिळाली. पण या सर्वांचा ब्रिटिशांनीं १७६४ मध्यें बक्सार येथें पराभव केला. तथापि शहाअलम ह्यानें या लढाईंत कांहींहि अंग ठेवलें नसल्यामुळें या पराभवानंतर तो ब्रिटिशांस जाऊन मिळाला. इकडे सुजाउद्दौला हा बरेलीस पळून गेला, व त्यानें पुन्हां पठाणांच्या व मराठयांच्या मदतीनें १७६५ मध्यें जाजमऊ येथें ब्रिटिशांशीं टक्कर दिली. पण तेथेंहि त्याचा पराजयच झाला. या मुळें सुजाउद्दौला व इंग्रज यांच्या दरम्यान तह होऊन सुजाउद्दौल्यानें इंग्रजांस लढाईच्या खर्चाबद्दल ५० लाख रुपये देण्याचें कबूल केलें.

ह्याच समयीं सुजाउद्दौल्यानें आपली राजधानी फैजाबादेस आणून तेथें किल्ला बांधिला. १७७१ मध्यें मराठयांनीं उत्तार हिंदुस्थानांत बरेच विजय मिळवून पानपतच्या पराभवामुळें नष्ट झालेली सत्ता पुन्हां प्रस्थापित केली. दिल्लीचा बादशहा त्यांस जाऊन मिळाला. यामुळें अयोध्येस व ब्रिटिशांस जबर धोका आहे हें उघड उघड दिसत होतें. ही संधि साधून इंग्रजांनीं सुजाउद्दौल्याशीं तह घडवून आणला. या तहान्वयें सुजाउद्दौल्यानें इंग्रजांस दरसाल सर-हद्दरक्षण करण्याकरितां २५ लाख रुपये देण्याचें कबूल केलें, ताबडतोब ५० लाख दिले व आपल्या दरबारीं ब्रिटिश रेसिडेंट ठेवून घेतला.

१७७२ सालीं मराठयांविरुद्ध सुजाउद्दौल्यानें रोहिल्यांस मदत केली होती. तिजबद्दल रोहिल्यांनीं देऊं केलेली रक्कम त्यांनीं आतां देण्याचें नाकारल्यावरून सुजाउद्दौल्यानें त्यांस शिक्षा लावण्याचा विचार कायम केला व इंग्रजांच्या मदतीनें १७७४ मध्यें रामपूर संस्थान  खेरीज सर्व रोहिलखंड आपल्या घशांत उतरविला. इ. स. १७७५ सालीं सुजाउद्दौला मरण पावला. ( सुजाउद्दौला पहा. )

असफउद्दौला :− ( १७७५−१७९७ ) सुजाउद्दौल्याच्या नंतर त्याचा वडील पुत्र मिर्झा अमानी हा असफ उद्दौला हें नांव धारण करून गादीवर बसला असफउद्दौला अधिकारारूढ झाल्यावर अयोध्येच्या रेसिडेंटानें पूर्वीचा दोस्तीचा तह रद्द करून जो नवीन तह नबाबाकडून मान्य करवून घेतला (२१ मे १७७५) त्यांतील मुख्य अटी म्हटल्या म्हणजे.−(१) कोरा व अलाहाबाद हे जिल्हे कंपनीनें नबाबाच्या अंमलाखालीं द्यावेत, (२) बनारस जोनपूर, गाझीपूर आणि चेतसिंग राजाच्या ताब्यांतील सर्व मुलूख मिळून २३ लक्षांचा प्रांत नबाबानें कंपनीस द्यावा; ( ३ ) नबाबानें मागील बाकी फेडून इंग्रज सैन्याच्या खर्चासाठीं दरमहा २,६०,००० रुपये द्यावे ; व इंग्रजांनीं नबाबाच्या प्रांतांचें संरक्षण करावें. असफउद्दौला गादीवर बसल्यावर
ब्रिटिश रेसिडेंटानें संस्थानची सर्व संपत्ति असफउद्दौल्याच्या स्वाधीन करण्याऐवजीं त्याच्या आईस देऊन तिला एक मोठी स्वतंत्र जहागीर तोडून दिली. यामुळें मातापुत्रांमध्यें वांकडें येऊन असफउद्दौल्यानें आईजवळून ६२ लक्ष रुपये घेतले. पण पुढें इंग्रजी रेसिडेंटाच्या मध्यस्तीमुळें असफउद्दौल्यानें अत:पर आपण आपल्या आईस त्रास देणार नाहीं असा कौलनामा लिहून दिला ( १५ आक्टो १७७९ ). या वादापासून असफउद्दौल्यानें फैजाबाद सोडून लखनौ हें आपलें राहण्याचें ठिकाण केलें व तेथेंच आपलीं राजधानी आणली. यानंतर सहा वर्षेपर्यंत लखनौचा राज्यकारभार असफउद्दौल्यानें सुरळीत रीतीनें चालविण्याचा प्रयत्‍न केला. परंतु इकडे नबाबाच्या लष्करामध्यें यूरोपीय अधिकार्‍यांचा भरणा करून व मन मानेल त्याप्रमाणें नबाबाच्या सैन्यांत ढवळाढवळ करून इंग्रज रेसिडेंटानें अयोध्येंत गोंधळ उडवून दिला. स्वेच्छाचारी यूरोपीय लोकांचा अयोध्येमध्यें सुळसुळाट होऊन ते जमीनदार लोकांकडून वाटेल तसा पैसा घेऊ लागले. त्यांनीं व्यापार सुरू केला व जकातीचा वसूलहि ते आपणच करूं लागले ( आयर्व्हिन व हेनरी लॉरेन्स ). यामुळें एतद्देशीय सैन्य बेदिल होऊन त्यांनीं बंड केलें. या सगळया भानगडींत सैन्याचा खर्च वाढून कंपनीची बाकी तुंबत चालली. या वेळीं कंपनीच्या खजिन्याची स्थिति अत्यंत वाईट असल्यामुळें वॉरन हेस्टिंग्ज यानें नबाबाकडे वाटेल त्या तर्‍हेनें ५५ लक्ष रुपये रोख व २० लक्ष रुपयांची रक्कम कांहीं दिवसांनी देण्याबद्दल मागणें केलें. हेस्टिंग्जनें काशीच्या चेतसिंग राजाशीं अत्यंत जुलुमाचें वर्तन केल्यामुळें काशी येथें १७८१ च्या आगस्ट मध्यें बंड झालें. या बंडांत अयोध्येच्या बेगमांचें अंग आहे असा खोटा पुरावा हेस्टिग्जनें आपला मित्र इम्पे याच्या साहाय्यानें तयार करून त्यांच्या जहागिरी व संपत्ति खुद्द सफउद्दौल्याच्या इच्छेविरुद्ध जप्त करण्याचें काम सुरू केलें. लखनौचा रेसिडेंट मिडल्टन व हेस्टिंग्जच्या कृपेनें प्रधानपद धारण केलेला सरदार हैदरबेगखान यांनीं त्या पडदानशीन स्त्रियांवर व त्यांच्या वृद्ध द्वारसंरक्षकांवर अतिशय जुलूम करून त्यांच्याकडून ७५ लक्ष रुपये काढले ( मि. मिलचा इतिहास पहा ). ही गोष्ट १७८२ सालीं घडली. अशा रीतीनें हेस्टिंग्जच्या कारकीर्दीत अयोध्येच्या राज्यकारभाराची अव्यवस्था होऊन सर्वत्र हाहा:कार उडाला. कॅप्टन एडवर्ड्स यानें असें म्हटलें आहे कीं १७७४ सालीं सुजाउद्दौल्याच्या कारकीर्दीत अयोध्या प्रांत अतिशय भरभराटीमध्यें होता. तो १७८३ मध्यें उध्वस्त व उच्छिन्न बनला. आपला निभाव लागत नाहीं असें पाहून असफउद्दौल्यानें गव्हर्नरजनरलकडे आपल्या तक्रारी पाठविण्याचा क्रम एकसारखा सुरू ठेवला. तेव्हां १७८४ मध्यें सैन्याची एक तुकडी कमी करून  जप्त केलेल्या जहागिरीचा कांहीं भाग खुला केला. पुढें १७८७ मध्यें कॉर्नवालिसनें यूरोपीय लोकांचा निरनिराळा खर्च मिळून नबाबास दरसाल ८४ लक्ष रुपये द्यावे लागत होते तो खर्च कमी करून लष्करी खर्च ५० लक्षांवर मुक्रर केला व रेसिडेंटानें संस्थानच्या अंतर्गत कारभारांत बिलकुल हात घालूं नये असेंठरविलें. यानंतर पुन्हां पुढच्या वर्षी लखनौ येथें गव्हर्नर जनरलचा एजंट म्हणून सालीना दहा लक्ष रुपये नेमणुकीचा एक अधिकारी होता ती जागा कमी केली व कंपनीच्या नांवाखालीं कित्येक यूरोपीय व्यापार्‍यांनां अयोध्येमध्यें जे हक्क प्राप्त झाले होते ते सर्व काढून घेतले.

नबाब असफउद्दौला याजबरोबर कॉर्नवालिस यानें जो तह केला. त्या तहाप्रमाणें बरेच दिवस सुरळीत राज्यव्यवस्था चालली व नबाबानें टिकायतराय व झौलाल या हिंदू मुत्सद्यांच्या मदतीनें बरींच लोकोपयोगी कामें करून प्रजेचा असंतोष नाहींसा करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु पुढें १७९५ मध्यें कॉर्नवालिस जाऊन त्याच्या जागीं सर जॉन शोअर गव्हर्नरजनरल होऊन आला तेव्हां त्यानें अयोध्येवर इंग्रज सैन्याप्रीत्यर्थ पुन्हां ५॥ लक्षांचा अधिक लष्करी खर्च लादला व तफझुल हुसेन नामक इसमास नबाबाच्या इच्छेविरुद्ध त्याचा दिवाण केलें. यामुळें नबाबाच्या मनास धक्का बसून तो आजारी पडला व त्यानें औषधपाणी वगैरे न घेतल्यामुळें तो अखेरीस २१ सप्टेंबर १७९७ रोजीं मरण पावला. असफउद्दौला हा फार चैनी, विषयासक्त पण दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानें लखनौ शहराचें वैभव बरेंच वाढविलें.

सादतअल्ली ( १७९८−१८१४ ) : − असफउद्दौला मरण पावल्यानंतर त्याचा औरस पुत्र वजीरअल्ली यास गादीवर बसविण्यांत आलें. परंतु असफ उद्दौल्याच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरलनें नेमलेला दिवाण अफझुल हुसेन हा पूर्वी सुजाउद्दौल्याचा दुसरा पुत्र सादतअल्ली याचा शिक्षक असल्यामुळें त्यानें वजीरअल्लीवर नाना प्रकारचे असत्य आरोप आणून गव्हर्नरजनरलाकडून आपला जुना शिष्य असफउद्दौल्याचा सावत्र बंधु जो सादतअल्लीखान
त्यास गादीवर बसविलें ( इ. स. १७९८ ). यानें इंग्रजांशीं नवीन तह करून त्यास अलाहाबादचा व फत्तोगडचा असे दोन बळकट किल्ले दिले व ७६ लाख रुपये सालिना देण्याचें कबूल करून शिवाय उपर्युक्त किल्ल्यांच्या दुरुस्तीकरितां ११ लक्ष व स्वत:च्या राज्यारोहणाप्रीत्यर्थ १२ लक्ष रुपये दिले. उलट ब्रिटिशांनीं अयोध्या प्रान्ताचें रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. चार वर्षांनंतर जमानशहा दुराणी स्वारी करणार ह्या भीतीनें रोहिलखंडांत व अयोध्या प्रान्तांत मोठी खळबळ उडाली. व ही संधि साधून शिंदे कदाचित् त्या प्रान्तावर स्वारी करतील अशी इंग्रजांस भिती वाटत होती. ह्मणून इंग्रजांनीं १८०१ सालीं नबाबाकडून एक नवीन तह करवून घेऊन त्याजकडून सैन्याच्या खर्चाकरितां गोरखपूर, अलाहाबाद, अजीमगड, फत्तोगड, कानपूर, इटावा, मैनापुरी, फरुकाबाद, वास्ती वगैरे जिल्हे मिळून एक कोट पस्तीस लक्ष रुपये वसुलाचा प्रांत सर्व हक्कांसंह तोडून घेतला. व बाकीचा प्रान्त सादतअल्लीकडे वंशपरंपरा चालविला जाईल असं ठरविलें. तेव्हां त्याकडे फक्त ब्रिटिश राज्यवेष्टित अयोध्येचा प्रदेश राहिला. सादतअल्ली १८१४ सालीं मरण पावला. त्याच्या कारकीर्दीसंबंधानें कर्नल मॅक ऍंड्रयू यानें असें लिहिलें आहे कीं, याच्या राज्यव्यवस्थेमुळें लोक फार सखी व संतुष्ट झाले. राज्यांतील पडित जमिनीची लागवड झाली. आणि दाट वस्तीच्या प्रांतांतून जमीन महसूल द्रव्यरूपानें घेण्याची पद्धति अंमलांत आली. एकंदरीनें सादतअल्लीनें आपल्या पश्चात रयतेचा मित्र अशी कीर्ति मिळवून राज्याचा खजिना पूर्ण भरून ठेविला. याच्या मरण-
कालीं याच्या खजिन्यांत १४ क्रोड रुपयांची शिल्लक होती.

गाजीउद्दीन हैदर ( १८१४−१८२७ ) : −१८१४ मध्यें सादतअल्लीखानाचा पुत्र गाजीउद्दीनहैदर हा गादीवर आला. त्यानें पाहिल्यानेंच आपल्या नांवाचें नाणें पाडिलें. इ. स. १८१४ सालीं नेपाळच्या लढाईच्या प्रसंगी यानें इंग्रजांचा नेपाळच्या पायथ्याचा मुलूख व खैरागड जिल्हा गहाण ठेवून त्यांनां दोन कोट रुपये सहा टक्के व्याजानें कर्जाऊ दिले. १८१९ मध्यें दिल्लीचा बादशहा इंग्रजांविषयीं अराजनिष्ठ आहे असें वाटण्यावरून, त्याची बादशहात कमी करून लखनौच्या नबाबास '' बादशहा '' हें पद लार्ड हेस्टिंग्जनें दिलें. पण दिल्लीच्या गादीचा हा अपमान मुसुलमानांस न खपल्यामुळें हें पदांतर कोणी मानलें नाहीं. पुढें १८२५ मध्यें ब्रह्मदेशच्या लढाईच्या प्रसंगीं यानें आंणखी दीड कोट रुपये इंग्रजांस कर्जाऊ दिले. गाजी उद्दीनानें इंग्रजांस पैशाची व सैन्याची जी वेळोवेळीं मदत केली तिच्यामुळें त्याजवर इंग्रजांची फार मर्जी होती. हा १८२७ सालीं मरण पावला. नासिरउद्दीन हैदर ( १८२७−१८३७ ):−गाजी- उद्दिनच्या मागून त्याचा बदफैली पुत्र नासिरुद्दीन अधिकारारूढ झाला. त्यानें इंग्रजी चालीरीतींचे अनुकरण करण्यांत बराच पैसा उधळला. याच्या दुर्वर्तनामुळें कंपनी सरकार याला पदच्युत करून राज्यव्यवस्था आपल्या हातीं घेणार तोंच ७ जुलै १८३७ रोजीं हा विषप्रयोग होऊन एकाएकीं मृत्यु पावला. याच्या मरणासमयीं खजिन्यांत १४ कोटी पैकीं फक्त ७० लाख रुपयेच शिल्लक राहिले होते.

महमदअल्लीशहा ( १८३७ - १८४२) : −नासिरुद्दीनच्या नंतर त्याचा एक औरस पण अप्रिय पुत्र मुन्नाजान यास नासीरउद्दिनच्या आईनें गादीवर बसविण्याचा प्रयत्‍न केला परंतु नासिरउद्दिनानें आपल्या दुलारी नामक वारांगनेच्या खानजहा नांवाच्या पुत्रास गादी देवविण्याच्या इच्छेनें मुन्नाजान हा माझा औरस पुत्र नाहीं असें रेसिडेंटास कळवून ठेविलें असल्यामुळें रेसिडेंटानें मध्यें पडून नासिरउद्दीनाचा चुलता नासिरउद्दौला यास महमदअल्लीशहा हें पद देऊन गादीवर बसविलें. यास गादीवर बसवितांना इंग्रजांनीं १८०१ सालच्या तहाविरुद्ध अयोध्येवर १६ लक्ष रुपयांचा नवीन लष्करी खर्च लादण्याचा आपला हेतु साध्य करून घेतला. महमदअल्लीशहा हा १८४२ मध्यें मरण पावला.

अमजदअल्लीशहा ( १८४२ - १८४७ ) : −महमद अल्ली शहानंतर त्याचा पुत्र अमजदअल्ली गादीवर येऊन त्यानें १८४७ पावेतों राज्य केलें. हा विषयासक्त निघाल्यामुळें याच्या कारकीर्दीत अयोध्येची स्थिति फार बिघडली. याच्या कारकीर्दीतील सार्वजनिक महत्वाच्या गोष्टी म्हणजे गोमती नदीवरील लोखंडी पूल व कानपूरलखनौ रस्ता या होत.

वाजिदअल्लीशहा ( १८४७ -१८५६ ) : −अमजदअल्ली शहानंतर त्याचा पुत्र वाजिदअल्लीशहा गादीवर बसला. आज पर्यंत हिंदुस्थानांत जे दुर्व्यसनी, दुर्वृत्त, विषयासक्त आणि कर्तव्यशून्य राजे झाले त्यांतील प्रमुखांमध्यें वाजिदअल्लीची गणना करण्यास हरकत नाहीं. नबाबाचें राज्यकारभाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळें सर्व अयोध्या प्रांतांत अंदाधुंदी माजली व प्रांतोप्रांतीचे अधिकारी स्वेच्छाचारी होऊन प्रजेवर जुलूम करूं लागले. इ. स. १८५५ सालीं अयोध्येचा रेसिडेंट कर्नल औट्राम यानें अयोध्येच्या राज्यकारभारासंबंधीं जो रिपोर्ट सादर केला त्यावरून असें कळतें कीं, १८५३−५४ सालचा एकंदर वसूल एककोट वीस लक्ष रुपये जमा असतां त्यापैकीं फक्त तीसचाळीस लक्षच लखनौस आले, व बाकी सर्व प्रांतोप्रांतीच्या अधिकार्‍यांनीं गिळंकृत केलें. अयोध्या प्रान्तांतील एकंदर न्यायखात्याचा खर्च अवघा १६,००० रुपये होता. आणि सैन्याची संख्या ६०,००० असून त्याचा वार्षिक खर्च ४२ लक्ष रुपये होता. आपल्या राज्याच्या कारभारांत सुधारणा करण्याविषयीं वारंवार सूचना केल्या असतांहि जेव्हां सुधारणा होईना तेव्हां अखेर ता. ४ फेब्रुवारी सन १८५६ रोजीं वाजिदअल्लीशहास अयोध्येचा बादशहा हा किताब, दिलखुष आणि बिबियापुर या दोन ठिकाणांचें स्वामित्व व १२ लक्ष रुपयांची वंशपरंपरा सालिना नेमणूक एवढें त्याच्याकडे ठेवून त्याचें राज्य खालसा करण्याचा कंपनीसरकारचा उद्देश कळविण्यांत आला. परंतु नबाबानें या नवीन तहावर सही करण्याचें नाकारल्यामुळें ता. ७ फेब्रुवारी रोजीं त्यास पदच्युत करण्यांत येऊन कैद करून कलकत्यास पाठविण्यांत आलें.

इंग्रजीअंमल.− इ. स. १८५९ पासून नबाबास १२ लाख रुपयांची नेमणूक करून देण्यांत आली, व वजिदअल्लीशहास त्याच्या मरणकालापावेतों ( १८८७ ) अयोध्येचा बादशहा म्हणवून घेण्याची परवानगी दिली गेली. पण वाजिदअल्लीशहाच्या मरणानंतर ती पदवी काढून घेतली गेली व नेमणूकहि कमी करण्यांत आली. १८५६ मध्यें ब्रिटिश राज्यास जोडल्यावर अयोध्येच्या प्रान्ताची एक चीफ कमिशनरशिप निर्माण करण्यांत आली, व लखनौ, सितापूर, फैजाबाद व सुलतानपूर येथें सैन्य ठेवण्यांत आलें हा प्रान्त ब्रिटिश राज्यास जोडल्यामुळें खानदानीच्या लोकांत बराच असंतोष माजला. तालुकदारांस काम करण्यास भिति वाटूं लागली. मीरत येथें बंडाचा पुकारा होतांच १५ दिवसांच्या आंतच अयोध्या प्रांतांत बंड झालें. मार्च १८५७ मध्यें हेनरी लॉरेन्स यानें लखनौ येथें कामाचा चार्ज घेतला. व मेच्या ३० तारखेस हिंदू शिपायांनीं बंड केलें. बंडांत पहिल्यानें तालुकदारांचें कांहींहि अंग नव्हतें. जुलैच्या आरंभीं लखनौ येथील ब्रिटिश सैनिकांस बंडखोरांनीं गराडा घातला, व ४ जुलैस हेनरी लॉरेन्स तोफेचा गोळा लागून मरण पावला. औटराम व हॅवेलॉक हे सप्टेंबरच्या २५ व्या तारखेस या सैन्याच्या मदतीस आले, पण सैन्यबल फार नसल्यामुळें नोव्हेंबर मध्यांत कॉलिन कॅंपबेल मदतीस येईपर्यंत त्यांची खरी मुक्तता झाली नाहीं. नोव्हेंबरच्या २३ व्या तारखेस इंग्रजांनीं लखनौ सोडून बायकामुलांस कानपुरास पोहोचवून दिलें. इतक्यांत नेपाळच्या प्रधानाकडून मदत मिळाल्यामुळें ८००० गुरखे लोकांच्या साहाय्यानें बंडखोरांचा बींमोड करण्यांत आला. १८५८ च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीं कॅम्पबेल साहेब गंगापार होऊन लखनौवर चाल करून गेला. त्यानें लखनौ शहर बर्‍याच प्रयासानें हस्तगत केलें, व दिलखुष वाडा. आपल्या ताब्यांत घेतला. जूनमध्यें बेगमच्या सैन्याचा बींमोड करण्यांत आला. या कामांत कपुरथळयाचा राजा रणधीरसिंग याच्या सैन्याकडून बरीच मदत झाली. १८५८ च्या नोव्हेंबरांत बंडाचा पूर्णपणें मोड झाला.

प्रा ची न अ व शे ष व इ मा र ती.−गोंडामध्यें साहेत माहेत येथें बरेच बौद्ध व जैन प्राचीन अवशेष आहेत. येथेंच प्राचीन श्रावस्ती शहर असावें. अयोध्येंतील सर्व देवालयें अर्वाचीन कालांतील आहेत. बाहरैच येथें सय्यद सालारचें थडगे आहे. अयोध्या येथें बाबरची कबर व सुरी पठाणांनीं बांधलेल्या इमारती आहेत. फैजाबाद व लखनौ येथें अयोध्येच्या नबाबांनीं व राजांनीं बांधलेल्या इमारती आहेत.

लो क व र्ण न. −येथील लोकवस्ती जगांतील कोणत्याहि भागाहून अधिक दाट आहे. लखनौ जिल्ह्यांत एका चौ. मैलांत सरासरी ८२८ लोक राहतात. यामुळें आतां आसामांत व वसाहतींत लोक जाऊं लागले आहेत. या प्रांतांत लखनौ, फैजाबाद ( अयोध्या ), बाहरैच, सीतापूर, शहाबाद, इत्यादि मोठीं शहरें आहेत. या प्रांतांत जवळजवळ अर्धे लोक मुसुलमान धर्माचे व अर्धे हिंदु धर्माचे आहेत. हरदोई जिल्ह्यांत पश्चिम हिंदुस्थानी भाषा व इतरत्र अयोध्यी भाषा बोलतात. ह्या प्रांतांत ब्राह्मण व रजपूत लोक नांगरास हात लावीत नाहींत.

अलाहाबाद ते फैजाबाद व लखनौ ते फैजाबाद रस्त तयार करण्यांत आले आहेत. ' औध व रोहिलखंड स्टेट रेल्वे ' हा मुख्य लोहमार्ग असून शिवाय इतर लोहमार्ग चालू आहेत.

शा स न प द्ध ति.−१८५६ मध्यें अयोध्येचें राज्य खालसा करण्यांत आल्यापासून १८७७ पावेतों अयोध्या प्रांताचा कारभार वेगळा पाहिला जात असे. पण त्या वर्षी अयोध्येच्या चीफ कमिशनरची व ' वायव्य प्रांता 'च्या लेफ्टेनंट गव्हर्नरची जागा एक करण्यांत येऊन येथील अधिकार्‍यास वायव्यप्रांताचा लेफ्टेनंट गव्हर्नर व अयोध्येचा चीफ कमिशनर असें संयुक्त नांव देण्यांत आलें. पुढें १९०२ सालीं चीफ कमिशनर हें नांव वगळण्यांत येऊन सर्व प्रांतास आग्रा अयोध्येचा संयुक्त प्रांत असें नांव मिळालें. १९२१ मध्यें नवीन सुधारलेला कायदा अमलांत आला तेव्हां संयुक्त प्रांताचा लेफ्टेनंट व्हर्नर हा गव्हर्नर झाला.

एकंदर ३६,७२१ खेडयांपैकीं २३,५४३ खेडीं प्रथमत: या प्रांतांतील तालुकदारांकडे होतीं. १८५६ मध्यें २३,५४३ खेडयांपैकीं ३५ लाख उत्पन्न येणार्‍या फक्त १३,६४० खेडयांच्या तालुकदारांचे हक्क मानण्यांत आले पण १८५८ मध्यें जिकडे तिकडे शांतता झाल्यानंतर सर्व योजना बदलून टाकण्यांत आली; मालकीचे सर्व हक्क काढून घेण्यांत आले. फक्त पांचच तालुकदार राजनिष्ठ आढळून आल्यावरून त्यांचे मालकीहक्क कायम ठेवण्यांत आले. त्यांचीं धाराबंदी कायमीची ठरविण्यांत येऊन त्यास आणखी देणग्या देण्यांत आल्या. इतर जे तालुकदार शरण आले त्यांस क्षमा करण्यांत आली. १८५९ मध्यें २२,६५८ खेडीं तालुकदारांच्या स्वाधीन करण्यांत आलीं. ह्या तालुकदारांपैकीं पुष्कळ जण खानदानीचे गृहस्थ नव्हते. नबाब सादतअल्लीखानाचा कर्तृत्ववान प्रधान अलमासअली ह्यानें सर्व तालुकदारांस आपल्या वर्चस्वाखालीं आणिलें होतें. १८५९ मध्यें ज्यांनां कायमचे तालुककदार बनविण्यांत आलें त्यांस त्याप्रमाणें सनदा देण्यांत आल्या व १८६९ मध्यें ' औध इस्टेट्स अ‍ॅक्ट ' पास करण्यांत आला. कांहीं इस्टेटींत अव्यवस्था व कर्ज झालें होतें. त्यांच्याकरितां ' म्यानेजर ' नेमण्यांत आले व त्यांच्याविरुद्ध डिक्री किंवा दिवाणी दावे चालविण्याचें बंद केलें गेलें व व्याजाचा दर सहा किंवा सहापेक्षां कमी करण्यांत आला. १८७३ मध्यें ब्रिटिश सरकारनें ह्या तालुकदारांस ५ रु. व्याजानें वीस वर्षाच्या करारानें कर्ज देऊं केलें.

शे त क र्‍यां ची स्थि ति.−अयोध्या प्रांतांत जमीनदार व सरकार आणि जमीनदार व त्यांचीं कुळें यांमधील संबंधाचा प्रश्न बराच भानगडीचा झाला आहे. १८५७ च्या बंडानंतर इंग्रज सरकारनें या प्रांतांतील जमीनदारांस सरकार तुमच्या जमिनीवर कुळांनां वहिवाटीचा हक्क सांगूं देणार नाहीं असें अभिवचन देऊन ठेविलें होतें. या अभिवचनापासून उत्पन्न होणारे दुष्परिणाम टाळण्याकरितां इ. स. १८८६ सालीं ' औध रेंट ऍक्ट ' म्हणून एक कायदा पसार करण्यांत आला. त्यानें जमीनदारांनां आपल्या जमीनीचा खंड दर सात वर्षांनीं रुपयास एक आण्याहून अधिक वाढवितां येईनासा झाला. उत्तारअयोध्या प्रांतांत लोकवस्ती विरळ आहे. तेथें हा सुरळीतपणें अंमलांत आला. पण दक्षिण अयोध्या प्रांतांत लोकवस्ती दाट असल्यामुळें तेथें जमीनीकरितां मागणी अतिशय असते. १८८५ च्या कायद्यानें जमीनदारास आपल्या जमीनीच्या खंडांत योग्य तेवढी वाढ करतां येईना. पण त्यास सात वर्षांच्या अखेर अगाऊ सूचना देऊन आपल्या कुळांकडून जमीन काढून घेतां येत असल्याकारणानें तो जुन्या कुळांकडे जमीन कायम ठेवण्याबद्दल किंवा नवीन कुळांस जमीन देण्याबद्दल त्यांच्या कडून नजराणा घेऊं लागला. याचा  परिणाम असा झाला कीं, अनेक कुळांच्या जमीनी जाऊन त्यांनां दारोदार भीक मागर्‍याची पाळी आली व कित्येकांनां अवाच्या सवा व्याज देऊन पैसे कर्जाऊ काढावे लागले. हा त्रास दूर करून घेण्यास १९२० च्या पावसाळयांत प्रतापगड जिल्ह्यांत प्रथम ' किसान सभा ' स्थापन झाली व तेथून ती चळवळ पुढें रायबरेली तालुक्यांत व इतरत्र ठिकाणीं पसरून १९२१ च्या जानेवारी व मार्च महिन्यांत रायबरेली व फैजाबाद जिल्ह्यांत दंगे झाले. तेव्हां एकपक्षीं जमीनदारांनां आपल्या कुळांकडून इच्छेस येईल तेव्हां जमीनी काढून घेतां येऊं नयेत किंवा नजराण्याच्या रूपानें मोठमोठया रकमा उकळतां येऊं नयेत तर दुसर्‍या पक्षीं जमीनदारांनांहि आपल्या कुळांकडून जमीनी बद्दल योग्य तो खंडहि घेतां यावा म्हणून १९२१ सालीं संयुक्त प्रांताच्या कायदेकौन्सिलांत मागील कायद्यांत सुधारण करणारा एक ठराव मांडण्यांत आला.

१९०५ मध्यें जुडिशिअल कमिशनरच्या मदतीस एक मदतनीस ज्युडिशिअल कमिशनर नेमण्यांत आला व पांच वर्षापूर्वी लखनौ येथें एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापण्यांत आलें.

 [  संदर्भ ग्रंथ.−स्लीमन, जर्नी थ्रू औध; आयर्व्हिन, गार्डन ऑफ इंडिया; पारसनीस,योध्येचे नबाब; पेपर्स रिलंटिंग टु अंडर प्रोप्रायटरी राइटस ऑफ दि कल्टिव्हेटर्स इन औध;डिशन्स ऑफ टेनन्सी ऍंड वर्किंग ऑफ रेंट लॉ इन औध; ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट युनायटेड प्रोव्हिन्सेस ( १९२१−२२ )इंपिरियल गॅझेटियर ]

ता लु क दा री.−अयोध्या या तालुकदारीचें क्षेत्र फैजाबाद गोंडा, सुलतानपूर, बाराबांकी व लखनौ या जिल्ह्यांत पसरलें आहे. हिचें क्षेत्रफळ ७६२ चौरस मैल आहे. हिला ब्रिटिश सरकारास ५.९ लाख रुपये खंडणी द्यावी लागत असून हिचें एकंदर उत्पन्न इं. गॅ. मध्यें सुमारें ११ लाख दिलें आहे. बखतावर सिंग हा या तालुकदारीचा संस्थापक होय. हा अयोध्येचा नबाब सादतअल्लीखानाजवळ घोडेस्वार म्हणून चाकरीस राहिला. याची बढती फार त्वरेनें झाली व महमदअली शहानें त्यास राजा हा किताब दिला व फैजाबाद  जिल्ह्यांतील माहदोना जमीनदारी बहाल केली. अयोध्या संस्थानांत बखतावरसिंग हा पहिल्या प्रतीचा मानकरी झाला व इ. स. १८४९ सालीं सर विल्यम स्लौमन यानें ज्या वेळीं अयोध्या संस्थानाची पहाणी केली त्यावेळीं हाच त्याजबरोबर होता. याचा धाकटा भाऊ दर्शनसिंग हाहि मोठया पदवीस चढला होता. तो इ. स. १८४४ सालीं मरण पावला. त्याच्या तीन पुत्रांपैकीं सर्वांत धाकटा मानसिंग यानेंहि अयोध्या दरबारची महत्वाची कामगिरी केली. इ. स. १८५५ सालीं बखतावर सिंग निपुत्रिक मरण पावला. त्यामुळें सर्व मालमत्ता मानसिंगासच मिळाली. पुढें अयोध्या संस्थान खालसा झाल्यामुळें मानसिंगाची बहुतेक सर्व इस्टेट काढून घेण्यात आली व ज्या वेळीं १८५७ सालचें बंड झालें त्यावेळीं मानसिंग फैजाबाद येथें अटकेंत होता. परंतु पुढें यूरोपियन स्त्रिया व मुलें यांनां सुरक्षित जागीं पोंचविण्याची त्यास कामगिरी देऊन त्यास मोकळें केलें. त्यानें ती कामगिरी बजावल्यावर तो पुन्हां बंडखोरांस मिळाला. परंतु औट्रॅम साहेब रणांगणावर आल्याबरोबर त्यानें आपलें अंग काढून घेतलें आणि पुन्हां त्यानें गोर्‍या स्त्रिया व मुलें यांच्या जीवितांचें रक्षण करून प्रांतांत स्थिरस्थावर करण्याकरतां बहुमोल मदत दिली. इ.स. १८५८ मध्यें त्याची जमीनदारी त्यास परत देण्यांत आली व त्यानें दिलेल्या मदतीदाखल त्यास महाराजा हा किताब व गोंडा राजाची जप्त केलेली इस्टेट बहाल केली. हा इ. स. १८७० सालीं मरण पावला. याच्यांमागून याचा नातु सर प्रताप नारायणसिंग यास ही तालुकदारी मिळाली यानें इंपीरियल आणि प्राव्हिन्शियल कौन्सिलमध्यें चांगलें काम केलें हा इ. स. १९०७ सालीं मरण पावला.

शहर.− हें संयुक्त प्रातांतील  फैजाबाद जिल्ह्यांत आहे. तें २६°४८' उत्तर अक्षांशांवर आणि ८२°१२' पूर्व रेखांशांवर आहे. हा गांव गोग्रा ( शरयू ) नदीच्या दक्षिण तीरावर असून औध रोहिलखंड रेल्वेचें एक स्टेशन आहे. लोकसंख्या सन १९०१ सालीं सुमारें २१५८४.  

प्राचीन इतिहास :−हें अति प्राचीन शहर आहे. हल्लीं प्राचीन शहराचे अवशेष अस्तित्वांत नाहींत. कांहीं उंच भाग प्राचीन शहराची पूर्वीची जागा म्हणून दाखवितात. प्राचीन काळीं अयोध्या हें फार मोठें वैभवशाली शहर होतें. ही नगरी मूळ वैवस्वत मनूनें (ख्रि. पू. १३६६ या वर्षी) राहण्यासाठीं स्थापिली असें म्हणतात. ग्रंथांतरीं जरी ही कोसल देशाची राजधानी होती इतकाच केवळ उल्लेख आहे, तरी इंद्रप्रस्थाच्या पूर्वेस दिशाभेदानें दोन कोसल देश आहेत त्यांतील आग्नेय कोसलाचीच ही राजधानी होय. सूर्यवंशांतील ५६ वा राजा दशरथ याच्या वेळेस ही नगरी बारा योजनें लांब व तीन योजने रुंद होती असें वाल्मिकी रामायणांत म्हटलें आहे (बाल कांड सर्ग ५). याच ग्रंथांत पुढें (उत्तरकांड स. १११) असें वर्णन आहे. कीं, दशरथाच्या मरणानंतर या नगरींत दाशरथी रामानें अकरा सहस्त्र वर्षे राज्य केले व निजधामास जांतांना हिच्यांतील प्राणिमात्रास त्यानें आपल्या समागमें नेले त्यामुळें ही नगरी बहुत कालपर्यंत शून्य पडून राहिली होती; परंतु पुढें सूर्यवंशीय ऋषभ नामक राजानें हींत पुन्हां वसति केली. रामायणाच्या प्रारंभीं या शहराचें प्राचीन वैभव वर्णिलेले आहे, सूर्यवंशांतील शेवटचा म्हणजे ११३ वा राजा सुमित्र याचा काल झाल्या वर अयोध्या शहर ओसाड पडलें व राजघराण्याची वाताहात झाली. याच राजघराण्यांतील पुरुषांपासून उदेपूर, जयपूर इत्यादि घराणीं निघालीं असें या घराण्यांचे म्हणणें आहे. अयोध्येस पुन्हां ऊर्जितावस्थेस पुढें उज्जनीचा राजा विक्रमादित्य याने आणलें अशी दंतकथा आहे. परंतु हा विक्रमादित्य कोणता व केव्हां झाला हें निश्चित सांगतां येत नाहीं. बौद्धकालीं अयोध्या शहरास फारसें महत्तव नसून त्यावेळीं कोसलांची राजधानी साकेत व श्रावस्ति (सावठ्ठि) साकेतच्या उत्तरेस ४५ मैलांवर (विनय २.१४७)-हीं शहरें होतीं. साकेत शहर कोठें वसलेलें होतें याची नक्की जागा अजून संशोधकांनां सापडली नाहीं. तथापि प्राचीन अयोध्या शहराच्या भागावरच हें शहर वसलेले असावें असा कांहींचा अजमास आहे. पण बुद्धाच्या काळीं हीं दोनहि शहरें अस्तित्वांत असल्याचे उल्लेख असल्यामुळें तीं शेजारीं शेजारीं असण्याचाच जास्त संभव आहे. ख्रिस्ती शकाच्या प्रारंभीं अयोध्येंत व अयोध्येच्या आसपास एका स्वतंत्र राजघराण्याचा अंमल चालू होता असें भूम्यंतर्गत सांपडलेल्या नाणक पुराव्यावरून कळतें.

अकबर बादशहाच्या वेळीं अयोध्या हें सुभ्याचें मुख्य ठिकाण होतें. अठराव्या शतकांत कांहीं काळ अयोध्येच्या नबाबाची राजधानी येथें होती. इ. स. 1765 सालीं सुजाउद्दौल्यानें फैजाबाद हें आपलें राहण्याचें मुख्य ठिकाण केलें. त्यामुळें अयोध्या शहराचें राजकीय महत्तव नष्ट झालें. हल्लीं या गांवास फक्त धार्मिकदृष्टया महत्तव आहे.

वर्णन.- ज्या ठिकाणीं श्रीरामचंद्र जन्मास आला तें ठिकाण रामकोट म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंचवटयाच्या एका कोपर्‍यावर दाखविण्यांत येतें. तेथील बराचसा भाग बाबरनें बांधलेल्या मशीदीनें व्यापलेला आहे. बाहेरच्या बाजूस एका लहानशा चबुतर्‍यावर रामाची मूर्ति व एक देऊळ असून हें त्याचें जन्मस्थान आहे असें समजतात. जवळच याहून कांहींसे मोठें एक देऊळ आहे. त्याठिकाणीं सीतेचें स्वयंपाकघर होतें असें म्हणतात. गोग्रेवर ज्या ठिकाणीं लक्ष्मण स्नान करीत असे तेथें एक मोठें देऊळ आहे. गांवांत हनुमान गढींत हनुमानाचें देऊळ आहे. तें लहान आहे तरी त्याचें बांधकाम सर्वोत्कृष्ट असून त्यांत हनुमंताची प्रचंड मूर्ति आहे. देवालयाच्या पुढील भांगात राम, लक्ष्मण व सीता यांच्या लहान लहान मूर्ती असून त्याचें मंदिरहि अगदीं लहान आहे. गढींत जाण्याकरितां पुष्कळ पायर्‍या चढाव्या लातात. याशिवाय अलीकडे अठराव्या एकोणिसाव्या शतकांत बांधलेलीं पुष्कळ देवळें येथें आहेत. यांपैकीं मुख्य मुख्य म्हटलीं म्हणजे टीकमगडच्या राणीनें बांधलेली कनक भवन नांवाची सुंदर इमारत, नागेश्वरनाथाचें देऊळ, दर्शन सिंहाचें देऊळ व अयोध्येच्या महाराजांनीं बांधलेलें एक लहानसें संगमवरी देऊळ हीं होत. येथें जैनांचीं देखील कित्येक देवळें आहेत. यापैकीं पांच दवेळें पांच तीर्थकरांच्या जन्मभूमीच्या चिरस्मरणार्थ १८ व्या शतकांत बांधण्यांत आलीं. ज्या ठिकाणीं रामाचा अवतार समाप्त झाला त्या ठिकाणीं बांधलेल्या स्वर्गद्वार नांवाच्या देवळावर अवरंगजेब बादशहानें एक मशीद बांधली होती ती हल्लीं मोडकळीस आली आहे. दुसर्‍या एका त्रेता-का-ठाकुर नांवाच्या देवळावर अशीच एक त्याच बादशहानें मशीद बांधली आहे, तींत कनोजचा शेवटचा राजा जयचंद याचा एक शिलालेख सापडला आहे. या देवळाच्या जागेवर रामानें यज्ञ केला होता अशी दंतकथा आहे. शिवाय मुसुलमान ज्यांनां पूज्य मानतात अशा नोह, सेथ आणि जोब यांच्या तीन कबरी असून त्यांपैकीं शेवटच्या दोन कबरींचा ऐनी-अकबरींत उल्लेख आहे. जवळच मणिपर्वत म्हणून एक मातीचा ढीग दिसतो. मारुतीनें हिमालयाचा कांहीं  भाग उचलून येथे आणून टाकला व त्यास मणिपर्वत नांव मिळालें अशी दंतकथा आहे; तसेंच रामकोट ज्या वेळीं बांधला त्या वेळीं मजूर लोकांनीं
आपल्या टोपल्या झाडल्या त्या झाडतांना जी माती पडली तिचा हा मणिपर्वत झाला अशी दुसरी दंतकथा आहे. बहुधा हा एखाद्या स्तूपाचा अवशेष असावा असें वाटतें.

फैजाबाद म्युनसिपालिटीच अयोध्येची व्यवस्था पाहते. येथें व्यापार मुळींच नाहीं असें म्हटलें तरी चालेल. येथें दर वर्षी तीन वेळा मार्च-एप्रिल, जुलै-आगष्ट, आक्टोबर-नवंबर या महिन्यांत मोठया जत्रा भरतात. ( इं. गॅ. )

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .