विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अय्याकोंडा तिरुमलाय - (मद्रास) :−त्रिचनापल्ली जिल्हा व तालुक्यांतील एक गांव. त्रिचनापल्ली शहरापासून पश्चिमेस ३ मैलांवर असून लोकं सं. (१९०१ ) १५५० होती. याठिकाणीं एक पुरातन देवालय असून त्यांत पुष्कळसे शिलालेख आहेत गांवाला तटबंदी आहे. तिला लहान लहान नाजुकशीं गोमुखें असून गोमुखाच्या वरच्या अंगाला गोळी जाण्याकरितां द्वारे ठेवलेली आहेत. पूर्वेच्या बाजूस तोफांचे गोळे अजून नजरेस पडतात. 175३ त नबाब व इंग्रज यांच्या दरम्यान युद्ध सुरू असतां या देवालयाचा आश्रय मधून मधून घ्यावा लागे इतिहासकार ऑर्म हा याला वेकोंडा हें नांव देतो म्हैसूरच्या युध्दांत त्रिचनापल्लीवर तोफाचा भडीमार करून कप्तान डायटननें एक रात्र देवालयांत विश्रांति घेतली व दुसरे दिवशीं शहर घेतलें.