विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अय्याशास्त्री - रामशास्त्री याच्या मागून झालेले पुण्याचे न्यायाधीश. सवाईमाधवरावांच्या कारकीर्दीत पुण्यास अय्याशास्त्री प्रसिद्धिस आले. ग्रामण्याचे निवाडे करण्याचें काम त्यांच्याकडे पुष्कळ वेळा सोंपविण्यात येई. हे द्रविड ब्राह्मण होते. श्रावणमासी दक्षिणा देण्यासाठीं रमण्याच्या एका दरवाज्यावर हे बसत. हा दक्षिणा वांटण्याचा मान फक्त कांहीं थोड्या थोर व्यक्तींनाच मिळे.