विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरग - (म्हैसूर संस्थान) शिमोगा जिल्ह्याच्या तीर्थहल्ली तालुक्यांतील (इ. स. १९०१) ५७६ लोकवस्तीचें एक खेडें. हा गांव पूर्वी मले-राज्याचा (डोंगरी राज्य) राजधानीचा गांव होता. चालुक्यांचा अंमल असतां हुमचाचे सांतर राजे या भागावर राज्य करीत होते. चौदाव्या शतकांत व नंतर विजयानगरच्या अमदानींत या राज्यांत तीन शहरें व १८ परगणे होते. इ. स. १७६३ सालीं हैदरानें घालवून देईपर्यंत केलदी राजे येथें राज्य करीत होते.