विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरंग - (मध्यप्रांत.) रायपुर जिल्हा. रायपुर तहशिलींत हा गांव रायपुर गांवापासून २२ मैलांवर आहे. २१० १२' उत्तर अक्षांश व ८१० ५९' पूर्व रेखांश. लोकसंख्या सुमारें सात हजार. गांवाभोंवतीं तळीं व आंबराया पुष्कळ असून आसपास जुनाट देवळें पुष्कळ आहेत. पुष्कळ यात्रेकरू जगन्नाथपुरीची यात्रा करावयास निघाले असतां येथील बागेश्वराचें दर्शन घेतात. येथें थोडा फार व्यापारहि चालतो.