विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरदोइ - काठेवाडांतील एक खेडें. लोकसंख्या (१८८१) १११२. कोन्नासांगानी जहागिरीचा मूळपुरूष सांगोजी याला हें १६५४-५५ त गोंडल कडून जहागीर मिळालें. या पूर्वी तें गोंडलराजाच्या राजधानीचे ठिकाण होतें, पुढें गोंडल राजधानी झाली. येथील जमीन चांगली आहे. हें खेडें राजकोट-गोंडलरस्त्याच्या पूर्वेस २ मैलांवर आहे.