विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरपल्ली - हा जिल्हा चांद्यांतील मूलतहसीलींत एक परगणा आहे. तो मूलच्या आग्नेय दिशेला असून त्याचें क्षेत्रफळ ४४० चौरस मैल आहे. हा पहाडी परगणा असून याच्यांत अनेक नदीनाले आहेत व जंगल पुष्कळ आहे. यांत ८१ गांवें आहेत. पैकीं घोट हें मुख्य गांव आहे. या गांवांत उंसाची लागवड फार होते. वैनगंगेच्या व प्रणीतेच्या कांठावर जीं गांवें आहेत तीं मात्र चांगलीं आहेत. बाकीचीं सर्व गांवें जंगल तोडून वसविलेलीं खेडीं असून त्यांत मारिया लोक शेतकरी आहेत.