प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अरबस्थान - हें द्वीपकल्प आशियाखंडाच्या नैऋत्येस असून पश्चिमेस तांबडा समुद्र, दक्षिणेस एडनचें आखात आणि हिंदीमहासागर, पूर्वेस ओमनचें आखात आणि इराणचें आखात हीं आहेत.

पोर्टसय्यदपासून एडनपर्यंतच्या पश्चिम बाजूची लांबी १५०० मैल आहे; बाबेल माण्डेबच्या सामुद्रधुनीपासून रासेलहद पर्यंतची लांबी १३०० मैल असून उत्तरबाजू पोटसय्यदपासून यूफ्रेटीस नदीपर्यंत ६०० मैल आहे. क्षेत्रफळ सरासरी १२,००,००० चौरस मैल आहे.

भू व र्ण न.- अरबस्थान हा एक उंचवट्याचा प्रदेश आहे. तो नैऋत्यदिशेच्या बाजूला अतिशय उंच असून ईशान्य दिशेकडे सखल होत गेला आहे. या देशांत मोठमोठे पर्वत नसल्यामुळें वाष्पपूर्त वार्‍यांनां अडथळा होत नाहीं. त्यामुळें बहुतेक पाऊस पडत नाहीं; अर्थात सरोवरें व नद्या नाहींत. ज्या कांहीं नद्या म्हणून गणल्या जातात त्या पुष्कळ पाऊस पडला तरच नदी या संज्ञेस पात्र होतात.

वि भा ग :- साधारणत: अरबस्तानचे उत्तर, मध्य, व दक्षिण असे तीन भाग केले जातात. पहिला भाग बहुतेक वाळवंटानें व्यापिला आहे. येथील लोकवस्ती बहुतेक मेंढपाळांची असून ते सारखे हिंडत असतात. मध्यभागांत अर्धी जमीन शेतकीला योग्य असून ह्याच ठिकाणीं कांहीं वस्ती करून राहिलेले लोक दिसतात.

दक्षिण भाग मात्र चांगला सुपीक आहे. ह्या ठिकाणीं पाऊस पुरेसा पडून शेती उत्तम होते. या ठिकाणीं घरंदाज लोक राहतात, व बरीच भरभराटींत असलेलीं खेडीं दिसतात. परंतु ही स्थिति फक्त किनार्‍यावर दिसून येते. अंतर्देश वाळवंटानें व्याप्‍त आहे. ह्या देशाच्या बहुतेक सर्व उत्तर भागाचा शोध लागलेला आहे. परंतु दक्षिणेकडील भागाचा शोध लावणें तेथील वाळवंटाच्या योगानें अतिशय कठिण काम असल्यामुळें समुद्र किनार्‍यापासून १०० मैल आंत कोणीहि प्रवासी गेलेला नाहीं. त्यांतील विस्तीर्ण वाळवंटास डाहना असें नांव आहे.

ह वा मा न.- सामान्येंकरून अरबस्तान हा प्रदेश सर्व जगांत उष्ण म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यांचें प्रत्यंतर इराणचें आखात आणि तांबड्यासमुद्राकडील दक्षिण भाग येथें येतें. उत्तर आणि मध्यभाग दिवसा अतिशय उष्ण असून रात्रीं लवकर थंड होतो. दक्षिण प्रांत त्या मानानें थंड आहे.

प्राणी :- हरिण, ससे, रानटी बकरे, चित्ते, लांडगे इत्यादि प्राणी बर्‍याच अंशी सांपडतात. पाळीव जनावरें ह्मणजे उंट आणि घोडा हीं होत. अरब लोकांनां उंटाचा उपयोग फार होतो.
 
वृ क्ष, व न स्प ति व पि कें.- अरबस्तानांतील वृक्षवनस्पतींकडे पाहतां त्यांची जात दक्षिण आशियांतील नसून आफ्रिकन असावीसें वाटतें. उंचावर असणार्‍या भागांतून अंजीर, चिंच, या जातीचीं झाडें फार आढळतात. असुरच्या प्रदेशांत बरेंच मोठें अरण्य आहे. द्राक्षें, अप्रिकॉट, पीच, सफरचंद, अंजीर, केळीं हीं फळें उंच डोंगराळ प्रदेशांत, व खजूर सखल प्रदेशांत पिकतो. मेदीना येथें शंभर प्रकारचा खजूर तयार होतो असें ह्मणतात. कांकड्या वगैरे पुष्कळ पिकतात. पिकांमध्यें विशेष पीक कॉफीचें आहे. ही इ. स. ६ व्या शतकांत अ‍ॅबिसिनियांतून येथें आली असें सांगतात.

द ळ ण व ळ ण.- १९०८ पर्यंत अरबस्तानांत रेल्वेमार्ग मुळींच नव्हते पूर्वी मोठमोठ्या सडका निरनिराळ्या शहरांतून मक्केकडे येत असत. प्रत्येक सडकेवर कांहीं कांहीं अंतरानें विहिरी व धर्मशाळा वगैरे बांधलेल्या असत. १९०८ नंतर दमास्कस पासून मक्केकडे जाणारी एक रेल्वे मदिना पर्यंत तयार करण्यांत आली. हल्लीं तांबड्यासमुद्राला फार महत्तव प्राप्‍त झालें आहे. इराणचें आखात व तांबडा समुद्र ह्यांवरील बहुतेक बंदरांचा संबंध हिंदुस्थानशीं आला आहे. १९२० पर्यंत हेजाझ रेल्वे लाईन खेरीज अरबस्तानांत दुसर्‍या कोठेंहि रेल्वे नव्हती. हीच लाईन मदिना ते मक्कापर्यंत व माआन ते आकाबापर्यंत वाढविण्याचा विचार अलीकडे चालू आहे. १९१८-१६ मध्यें एडनपासून लाहे जच्या बाजूला सुमारें पंचवीस मैलांचा लष्करी रेल्वेचा फांटा तयार करण्यांत आला असून तो लष्करी काम नसेल तेव्हां इतर वाहतुकीलाहि लावतात. होदीदा ते सानाया १७३ मैल रस्त्याखेरीज इतर सडका नाहींत. जुने कारवानांचे रस्तेच अद्याप प्रचारांत असून गेल्या युद्धकाळांत यांचीच दुरुस्ती करून मोटारीरस्ते बनविण्यांत आले होते. तारायंत्राचे फांटे जेद्दा-मक्का; जेद्दा-राबुघमेदिना, होदिदा-साना, होदीदा-मोका-शेखसय्यद; होदीदा-लोहीया-मिदी; व मोकातय्यझ--येरिम--साना हे आहेत.

पा ह णी व म र्या दा नि श्च य.- या द्वीपकल्पाची उत्तर सरहद्द, तसेंच अन्तर्भागांतील अनेक स्वतंत्र संस्थानें यांच्या हद्दी अद्याप निश्चित झालेल्या नाहींत. १९२० च्या फ्रँकोब्रिटिश कन्व्हेन्शननें सीरिया, पॅलेस्टाईन व मेसापोटेमिया या बाजूच्या सीमा मात्र ठरल्या गेल्या आहेत. १९१४ पर्यंत अरबस्तानबद्दलची माहिती अगदींच त्रोटक होती, तेव्हांपासून अलीकडे प्रवाशांनीं लावलेल्या शोधांमुळें व युद्धानिमित्ता झालेल्या हालचालींमुळें बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. त्याबरोबरच अरबस्तानचा सविस्तर नकाशा तयार करण्याचें काम चालू असून देशाच्या उत्तारार्धाचा नकाशा प्रसिद्धहि झाला आहे. उपर्युक्त प्रवाशी संशोधकांमध्यें फिल्बी, शेक्सपीयर व बेल हे प्रमुख आहेत. फिल्बीनें इराणी आखातावरील ओक्वार बंदरापासून निघून मध्य अरबस्तान सर्व ओलांडून थेड तांबड्यासमुद्रावरील जेद्दा बंदरापर्यंत प्रवास पुरा केला. त्यानें दुसरी सफर नेज्दच्या राज्यांतून केली व रियाध व डाम या दोन शहरांमधील मुलुखाची पाहाणी केली. १९१३-१४ मध्यें मिस गर्टरूड लोथियन बेल हिनें फक्त देश्य वाटाडे बरोबर घेऊन एकटीनें प्रवास केला. दमास्कसपासून निघून ती टीमापर्यंत गेली, नंतर पूर्वेकडे वळून हेलला जाऊन नंतर लोका व नेजेफवरून बगदादला पोहोंचली व तिनें या अज्ञात भागाची बरीच माहिती मिळवून दिली. जागतिक युद्धापूर्वी हेजाझ रेल्वे लाईनवरील सर्व स्टेशनांचीं नांवेंसुद्धां प्रसिद्ध नव्हतीं; पण त्या युद्धांत तुर्कांविरुद्ध चढाई करून जातांना हेजाझ, तसेंच असिर व येमेन या प्रांतांची माहिती मिळाली. तसेंच युद्धकाळीं तांबड्यासमुद्रावर पहारा करणार्‍या ब्रिटिश बोटींनीं अकाबपासून एडनपर्यंतच्या सर्व अरबी किनार्‍यांची बारकाईनें पाहणी करून त्याचे नकाशे तयार केले आहेत.

उ द्यो ग धं दे - येथील लोकांचा मुख्य धंदा उंटांची पैदास करणें हा होय. उंटांच्या व्यापाराचीं मुख्य ठिकाणें दमास्कस व बगदाद हीं होत. तेथील सर्व लोकांजवळ मिळून उंटांची संख्या साधारणपणें ७ लक्ष २० हजार असते असें म्हणतात. घोड्यांची पैदास हा दुसरा धंदा असून येथून घोडे मेसापोटेमियांत व सीरियांत जातात. पांढर्‍या रंगाच्या व मोठ्या हाडपेराच्या गाढवाची पैदासहि करतात व तीं ईजिप्‍तला पाठवितात. येथें मोत्यांचा व मासे पकडण्याचा धंदा मोठ्या प्रमाणांत चालतो. बहुतेक बंदरीगांवांत मासे खारवण्याचा उद्योग पुष्कळ लोक करतात. कामाराननजीक बर्‍याच मिठाच्या खाणी चालू होत्या; पण १९२० पासून त्या बंद पडल्या आहेत.

व्या पा र - आरबस्तानांतून बाहेर जाणारा माल म्हणजे मोतीं, खजूर, काफी व कातडीं; यांशिवाय दुसरा कांहींच नाहीं. आयात माल :- कापड, तांदूळ, कणिक, साखर, चहा व इतर खाद्यपदार्थ हा होय. एडन शिवाय करून मस्कत, मानामा व कुवैत हींच कायतीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें होत. यांपैकीं पहिल्यांचा व्यापार यूरोपबरोबर व बाकीच्यांचा हिंदुस्थान व इतर प्राच्य देशांबरोबर चालतो. जेद्दा येथें मोठा व्यापार फक्त यात्रांच्या वेळीं होतो. याशिवाय होदीदा, जीझन मोका व माकाला हीं व्यापारी बंदरें आहेत. अरबस्थानांतील व्यापारी वर्गांत मुख्य भरणा हिंदी लोकांचा व त्यांच्या खालोखाल इटालियन लोकांचा आहे. अन्तर्भागांत मुख्य व्यापाराचीं ठिकाणें टीमा व खैबर (हेजाझ), मुहैल व खमिस मुशीत (असुर); साना (येमेन); लाहेज (एडन); रोस्तक व निझ्दा (ओमन); रियाध बोरीडा व हेल (मध्य अरबस्तान ) आणि होफूफ ( एलहासा ) हीं असून येथें धान्य व बाहेरून आलेला तयार माल यांची देवघेव मुख्यत: चालते.

अ र ब लो क.- सेमिटिक महावंशाची जी शाखा, प्राचीन ऐतिहासिक कालापासून अरबस्तानच्या द्वीपकल्पांत रहात आहे, तिला अरब असें नांव आहे. हल्लीं अरब लोक अरबस्तानाशिवाय मेसापोटेमिया, तांबड्यासमुद्राचा पश्चिम किनारा, इराणच्या आखाताचा पूर्व किनारा व उत्तर आफ्रिका या ठिकाणीं राहतात. खरे अरब लोक हे अरबस्तानचे मूळचे रहिवासी होते.

अरब लोकांचे चेहरे लांबट, डोळे काळेभोर व खोलगट, नाक लांब व कपाळ सरळ पण फारसें उंच नसतें, अरबलोक शरीरानें सडपातळ परंतु पीळदार असून त्यांची रहाणी स्वच्छ असते. ते ह्मातारपणींसुद्धां निरोगी असतात. शारीरिक बाबतींत जगांतील लोकांमध्यें यांचा अनुक्रमांक बराच वर लागेल व बौद्धिकदृष्ट्याहि ते कमी आहेत असें नाहीं. कोणतेंहि काम एकजुटीनें करण्याला ते नालायक आहेत म्हणून त्यांची सुधारणा होत नाहीं. ते सुस्वभावी, सभ्य व शूर परंतु दुष्ट खुनशी, अविश्वासी व  वेडगळ समजुतींचे आहेत. 'आपला जीव सुद्धां धोक्यांत घालून जेव्हां अरब मनुष्य आपल्या पाहुण्यांचे रक्षण करितो व मोठ्या समाधानवृत्तीनें निराशा, संकटें आणि नशीबाचे फेरे सहन करितो, त्यावेळींच त्याचा खरा मर्दानी स्वभाव दृष्टोत्पत्तीस येतो. दया व कृतज्ञता या गुणांमुळें तो तुर्क मुनुष्याहून निराळा वाटतो. तुर्क हा जात्या निष्ठुर असतो; पण अरब पहावा तर जास्त दयाळु अंत:करणाचा, गरीबांनां मदत करणारा व शत्रूचे सुद्धां उपकार न विसरणारा असा असतो ' असें बर्कहार्ट लिहितो ( ट्रॅव्हल्स इन अरेबिया, लंडन १८२९ ).

गहूं, भाजीपाला, खारका व फळें हें त्यांचें मुख्य खाद्य असून श्रीमंत लोकांत मांसाहारहि करतात, हे लोणी फार खातात व कॉफी पिण्याची चाल या लोकांत फार आहे.
 
अरब लोकांत गुलामगिरीची चाल आहे. गुरें राखणें. अथवा घरगुती कामें करणें याकडे गुलामांचा उपयोग केला जातो. आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावरील प्रदेशांतून गुलामांचा पुरवठा होत असे; परंतु १९ व्या शतकाच्या शेवटीं हा ओघ थांबविण्यांत आला. गुलामानें महंमदीधर्माची दीक्षा घेतल्यानंतर सात वर्षांनीं त्याला गुलामगिरींतून मुक्त करण्याची चाल अरब लोकांत आहे.

अरब लोक उत्तम शिपाई आहेत; परंतु त्यांच्यामध्यें सेनानायकाच्या कामाला लायक माणसें फार थोडीं असतात. धैर्य, नातलगांचा वियोग सहन करण्याची संवय व मरणाविषयीं बेफिकिरी हे गुण अरब सैनिकांत आढळतात. तुर्क लोकांपेक्षा अरब लोक अधिक दयार्द्र अंत:करणाचे असतात. ते आपलें वचन कधींहि मोडीत नाहींत; त्यांचा स्वभाव शांत असतो.

अरब लोक आदरातिथ्य करण्याबद्दल प्रख्यात आहेत. ('आतिथ्य' पहा).

अरब स्त्रिया पुरुषांप्रमाणेंच शूर असतात; अरब इतिहासांत अरब स्त्रियांच्या अधिपत्याखालीं झालेल्या पुष्कळ लढायांचा उल्लेख आहे.

अरब लोकांत शिक्षणाचा फार थोडा प्रसार झाला आहे. वडील मंडळींच्या सहवासांत बराच काल घालवावा लागतो म्हणून अरबमुलांचें धैर्य, आचार वगैरे बाबतींत शिक्षण घरींच होतें.

अरबांत मुख्य जाती दोन आहेत. अरब आणि बेदुइन. पैकीं पहिली शेतकरी आहे आणि दुसरी मेंढपाळ आहे. येमेन, हाद्रामल आणि ओमान या प्रदेशांत अरब लोकांची वस्ती आहे व हेजाझ, नेज्द, एलहास, सीरियाचें वाळवंट आणि मेसापोटेमिया ह्या प्रांतांत बेदुइन लोक राहतात. या लोकांची समाजव्यवस्था जातिविशिष्ट असते. प्रत्येक जातींतील मुख्य मनुष्याला शेख असें म्हणतात. त्याच्याकडेच सर्व वादग्रस्त प्रश्न येतात व त्याच्या निर्णयाप्रमाणें सर्व कामें चालतात.

वरील दोन जातींशिवाय हेजाझ आणि दक्षिण अरबस्थान ह्या प्रांतांत शरीफ अथवा सय्यद ह्या नांवाची एक जात आहे. हे आपणांस महंमदाचे वंशज म्हणवितात. या वर्गाची धर्माकडे जास्त प्रवृत्ति दिसून येते. याखेरीज मजूरवर्ग, गुलाम वगैरे भेद आहेत. दक्षिण अरबस्तानांत सिद्दी लोकांचा भरणा फार आहे.

वि वा ह.- अरब लोकांच्या कांहीं जातींत लग्नरीति, अगदीं साधी असते; व कांहीं जातींत ती अतिशय डामडौलाची असते. बेदुइन जातीचा फिरस्ता अरब एका बकर्‍याचा गळा कापून त्याचें रक्त आपल्या भावी सासर्‍याच्या तंबूपुढील वाळवंटावर शिंपडतो, आणि बिनपडद्याच्या बेदुइन बेगमेशीं राजरोस शादी करितो. मक्केंतील नगरवासी अरब असतात ते मात्र लग्नाच्या बाबतींत मुसुलमानी रिवाजाप्रमाणें सोहळ्यांचा अतिरेक करितात!आणि हिरवी पगडी घालणार्‍या व सर्व मुसुलमानी आचार तंतोतंत पाळणार्‍या शेखांच्या पडदानशीन बेगमांशीं शादी करितात.

लग्नासाठीं वधूचें प्रस्थान :- अरब वधूवरें बहुतकरून एकमेकांपासून लांब राहाणारीं असतात नवर्‍याला नवरीच्या गांवीं जावें लागत नाहीं. आपल्याला माळ घालण्यासाठीं गृहलक्ष्मी जितक्या लांबच्या पल्ल्यावरून आपल्या घरीं चालत येईल तितकें अरब गृहस्थ आपलें भाग्य अधिक समजतो. नगरवासी अरब आपलीं मुलें लहान असतांच त्यांनां दूर अंतरावर बेदुइन अरबांच्या तंबूंत राहण्यासाठीं पाठवितात. कारण तेथें तीं बेदुइन मुलांसंगतीं लहानाचीं मोठीं होऊन शरीरानें त्यांच्याप्रमाणेंच काटक निपजावींत, अशी नागरिक मातापितरांची इच्छा असते. तेथें तो मुलगा चांगला वयांत येईपर्यंत राहतो. पुढें तो आपल्या घरी परत आल्यावर त्याला स्वत:ला व त्याच्या आप्तांनांहि त्यानें लग्न करावें असें वाटतें. त्याचें मन पूर्वपरिचित बेदुइन कुमारिकेवर बहुधा जडलेलें असतें तेव्हां बायको करीन तर तीच करीन अशी त्यानें गांठ बांधून ठेवलेली असते. त्याच्या नागरिक माता-पितरांनांहि सशक्त अशा बेदुइन कुमारिकेशीं आपल्या मुलाचा शरीरसंबंध होणें फार हितावह आणि चांगलें वाटतें. सबब ते बहुतकरून आपल्या मुलाचा कल पाहून त्याच्या आवडत्या बेदुइन बेगमेलाच लग्नाचें मागणें घालितात. मुलींकडे तिजबद्दलची मागणी जाण्याचा अवकाश कीं लागलीच ती मुलगी मोठ्या डौलानें आपल्या वरातीच्या उंटावर बसून नवरी होऊनच येते !

वधुप्रस्थानाच्या मिरवणुकीचें वर्णन :- उंटाच्या पाठीवर एक डोली चढविलेली असते, व तिच्यावरून एक बुरखा घातलेला असतो. बुरख्याचें कापड रेशमी असून त्यावर कलाबतूनें कशीदा काढलेला असतो. मधून मधून सोनरी जरीनें कुराणांतील वाक्यें काढलेलीं असतात. काशिद्यांत लहान लहान भिंगे अथवा टिकल्या बसविलेल्या असतात. तसेंच बुरख्याला ठिकठिकाणीं गोंडे लाविलेले असतात. उंटाच्या नाकावर शहामृगाच्या पिसांचा एक ऐटदार तुरा लाविलेला असतो. त्याची वांकडी आणि लांबलचक मान मेंदीनें लालभडक रंगविलेली असते; आणि त्याच्या चोहोंबाजूस लहान लहान आरशा लाविलेल्या असतात, त्या सूर्य किरणांनीं सारख्या चमकत असतात. त्यांच्या गर्दीमध्यें उंटाचे डोळे अगदींच फिके पडून ते केवळ अपारदर्शक स्फटिकांसारखे दिसतात ! त्या प्राण्याच्या ओबडधोबड शरीरावरून पायांपर्यंत लोंबणारी एक फुलकरीची झूल घातलेली असते. डोलीमध्यें नवरीसमागमें तिची एखादी मैत्रीण असते. रस्त्यानें नवरीला सांभाळून नेण्याकरितां तिच्या बरोबर कांहीं पुरुषमाणसें दिलेलीं असतात. तीं नवरीच्या मागें पुढें साध्या झुली घातलेल्या उंटावर बसून मार्ग क्रमीत असतात. त्यांच्या उंटांवर नवरीला अंदण दिलेल्या वस्तूवस्त्रें, पात्रें, रोकड रकम, वगैरे- लादलेल्या असतात ह्या वधुप्रस्थानाच्या मिरवणुकीमागें उष्ट्रारूढ होऊन कांहीं नगारजी चाललेले असतात. ते आपले नगारे रस्त्यानें सारखे बडवीत जातात. नगारे म्हटले तर फारसे मोठे नसतात, परंतु त्यांचा आवाज मात्र कानठळी बसविण्याइतका कर्कश असतो !

लग्न आणि स्नानसोहळ्याची मिरवणुक :- ह्याप्रमाणें वधू आपल्या गांवाहून मिरवत मिरवत वराच्या गांवीं आल्यावर तिचें तिच्या सवंगड्याबरोबर मुसुलमानीं रिवाजाप्रमाणें लग्न होतें. लग्नानंतर नवरा स्नानसोहळ्यासाठीं वाजत गाजत स्नानागाराकडे जात असतो. त्यावेळच्या मिरवणुकीपुढें एक दोन पोरें अगदीं जुन्या पद्धतीचीं डफडीं वाजवीत आणि त्यांच्या तालावर नाचत चालतात. त्यांच्या मागून कित्येक मंडळी बंदुका उडवीत जातात, आणि शेवटीं इष्टमित्रांच्या समुदायाबरोबर नवरा मिरवत जातो. बहुपत्नीकत्व, पत्नीत्याग वगैरे :- अरबांनां अनेक स्त्रिया करण्याला परवानगी आहे. परंतु श्रीमान लोकांखेरीज फार करून बहुपत्नीक नसतात. जे पुष्कळ बायका करितात, ते लोकचर्चेला पात्र होतात. वास्तविक पाहतां जरी बहुपत्नी-कत्वाची चाल पडली आहे, तरी अरब लोक ती प्रशस्तन मानितां उलटी त्रासदायक समजतात. बायकोचा त्याग करितां येतो; परंतु तो क्षुल्लक बाबतींवरून कोणीहि करीत नाहीं. विवाहित स्त्रीपुरुषांचे सर्व हक्क कुराणांत सांगितल्याप्रमाणें पाळण्यांत येतात.

अरब अबलांचें प्राबल्य, आणि अरबी समाजांतील नीतीचें मान :- अरब लोकांत स्त्रियांचें प्राबल्य विशेष असतें. पुष्कळ प्रसंगीं त्या आपल्या इच्छेनुरूप नवरे पसंत करून त्यांच्यांशीं लग्नानंतर अनेक प्रकारच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा खुशाल उपभोग घेतात. नागरिक, अथवा तंबूतून राहणारीं ग्राम्य वधूवरें एकमेकांशीं शुद्धाचरणानें वागण्याबद्दल लग्नामध्यें उघडपणे वचन देतात. परंतु पुढें उभयतांकडूनहि तीं वचनें ' पुराणांतील वांगीं पुराणांत ' ह्या न्यायानेंच पाळलीं जातात ! आपलें वचन कडकडीत रीतीनें पाळण्याविषयीं आपण खरोखरी बांधिले गेलों आहों, अथवा आपली बायको तरी बांधली गेली आहे, असें अरब गृहस्थ मुळींच समजत नाही ! उलट जर कोणी पुरुष आपल्या बायकोच्या अनीतीबद्दल चिडीस जाऊन तिचा सूड घेण्यास प्रवृत्ता झाला, तर तो लोकांत निंदेला व तिरस्काराला पात्र होतो ! सबब अरब लोक आपल्या बायकांच्या अनीतीचा बंदोबस्त करण्याच्या भानगडींतच पडत नाहींत. त्यांनां त्या बाबीकडे कानाडोळा करणें भाग असतें. कारण, स्त्रियांप्रमाणें त्यांची स्वत:ची नितिमत्ताहि बेताबाताचीच असते । ( अलोनी- लग्नविधि सोहळे ).

अ र ब लो कां चा ध र्म. - अरबस्तानांतले लोक मुसुलमान धर्माचे आहेत असा साधारण समज आहे. पण इशमेल ( इस्माएल ) च्या मूळ रहिवाश्यांच्या ज्या जाती आहेत त्यांमध्यें मुसुलमानी महिने व त्यांचा पवित्रपणा मानला जात नाहीं. अरबस्तानांतील ' बडावी ' नांवाचे जे लोक आहेत ते मक्केस जाणार्‍या मुसुलमान यात्रेकरूंचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. ते खुद्द तुर्की सुलतानापासून करभार घेण्यास कमी करीत नाहींत. ते मुसुलमानी धर्म मानीत नाहींत इतकेंच नाहीं तर त्यांच्यांत दुसरा एखादा जुना धर्म-मूर्तिपूजेचा एखादा प्रकार-असावा असें दिसतें. यावरून मुसुलमानी धर्माचा पवित्र प्रांत जो मक्का व सर्व अरबस्तान येथील खरे मालक जे ' बडावी ' ते मुळींच मुसुलमान नाहींत उलट त्या धर्माचे शत्रु आहेत असें उघड होते ( इं. अँ. पु. १५ पा. ३१२-३१६ ).

हिं दु स्था नां ती ल अ र ब- प्राचीन काळापासून हिंदु व अरब लोक यांचा संबंध येत गेला आहे. हा संबंध विशेषत: व्यापारार्थ असे. खलीफ उमरच्या वेळेस ( इ. स. ६३७ ) अरबांची एक टोळी ठाणें येथें आली होती. पुढें समुद्र मार्गानें महलब नांवाचा सरदार इ. स. ६६४ त मुलतानपर्यंत येऊन गेला. यानंतर ७११ मधील महंमद कासीमची सिंध प्रांतावरील स्वारी होय. त्यानें सिंधमधील देवलबंदर काबीज करून दाहिर राजावर स्वारी केली; दाहिर रणांत गारद होऊन त्याचें राज्य अरबांचें मांडलिक बनलें. कासीमबरोबर आलेल्या अरबांनीं मुलतान वगैरे ठिकाणी आपल्या वसाहती स्थापिल्या. त्यांचा व हिंदूंचा स्नेहभाव जमला. तथापि कुरेष जातीच्या अरबांनीं सिंधमधील हिंदूंच्या इमारती, देवळें वगैरे उध्वस्त करून त्यांचें सामान आपल्या नवीन इमारतींस लाविलें.

अलप्‍तगिनानें गझनी येथें स्थापिलेल्या स्वतंत्र राज्याची पूर्व सरहद्द पंजाब प्रांतास लागून होती. त्यामुळें पंजाबचा जयपाळ व अलप्‍तगीन यांच्यांत वितुष्ट उत्पन्न झालें. नंतर गझनीच्या गादीवर संबंक्तगीन आला. त्यावेळीं रजपुत राजसंघानें त्याच्या हद्दींत शिरून लढाई दिली. पण सबक्तगिनाचा मुलगा प्रख्यात् महंमद याने रजपुतांचा पराभव केला. महंमदानें सुलतान पद धारण केलें तेव्हां हिंदुस्थानच्या सरहद्दीवरच तुर्की बादशाही स्थापन झाल्यासारखें झालें. महंमदाच्या हिंदुस्थानावरील स्वार्‍या प्रख्यात आहेतच. त्यावेळेपासून आजतागाईत अव्याहत अरबांचा निकट संबंध येत गेला; तो इतिहासांत नमूद आहेच.

मराठे शाहींतील अरब :- मुसुलमानांशिवाय अरब व हिंदुस्थानी म्हणजे परदेशी पुरभय्ये वगैरे लोकांचा भरणा मराठी पायदळांत विशेष असे. सरदार लोक किंवा श्रीमंत सावकारहि शरीरसंरक्षणार्थ किंवा खजिना वगैरे संभळण्यास शिपाई ठेवावयाचे ते अरब किंवा परदेशीच ठेवित. हे परके शिपाई आपला मुलूख व घरदार सोडून दूरदेशीं नोकरीच्या मागें आल्यामुळें व त्यांचे ऋणानुबंध इकडे नसल्यामुळें अष्टौप्रहर नोकरीशिवाय त्यांनां दुसरें व्यवधानच नसे. परदेशी शिपाई नोकरीस ठेवण्याची मराठ्यांची ही चाल पुढें पुढें इतकी बळावली कीं, थोरामोठ्यांच्या खास नोकरींत मराठे शिपाई दिसेनासे झाले. प्रत्येक श्रीमंताच्या देवडीवर पहारा अरबांचा. नाना फडणीस बाजीरावशाहींत महाडांस जीव बचावण्याकरितां पळून गेला तो अरबांच्याच भिस्तीवर. बडोद्यास तर अरबांचें प्रस्थ इतकें माजलें होतें कीं, त्यांचें बंड मोडून त्यांच्या पाशांतून गायकवाडांनां मुक्त करण्यास इंग्रजांनां सक्त श्रम करावें लागले. गायकवाड सरकारास कर्ज लागलें असतां संस्थानच्या वसुलाचीहि हमी दिलेली पुरत नसे; पण अरब सरदाराच्या शब्दाची जामिनकी पुरे होई ! याला ' बहादरी ' म्हणत व गायकवाडी कारभारांतील तें एक प्रकरणच होऊन राहिलें होतें. दुसरा बाजीराव पळत असतां अखेर उत्तरहिंदुस्थानांत त्याच्याजवळ जें सैन्य उरलें त्यांत अरब हेच प्रमुख होते. पण बाजीराव जेव्हां इंग्रजांच्या स्वाधीन झाला तेव्हां आपल्या पगाराच्या बाकीबद्दल त्यांनीं बंड करून बाजीरावांस कैदेंत ठेवलें व जनरल स्मिथ यानें मध्यस्थी केली नसती तर ते त्या वेळीं त्याचा प्राणहि घेते ! नागपूरच्या आप्पासाहेब भोंसल्यास पदच्युत केल्यावर शांतता प्रस्थापित करण्याच्या वेळीं तेथील अरब सैन्य काढून लावण्याचीच मुष्कील पडली. अद्यापीहि दक्षिण हैद्राबादेस सामान्य देशी मुसुलमानांपेक्षां अरबांचेंच प्राबल्य शिपाइगिरीच्या कामीं अधिक दिसून येतें ( मराठे आणि इंग्रज ).

भोंसल्याच्या सैन्यांतील शिपायांच्या वंशजांचें जनरल हिस्लापनें ' समरी ऑफ दि मराठा अँड पेंढारी कँपेन्स ' मध्यें फार चांगलें वर्णन केलें आहे.  हे लोक फार शूर व काटक असत. १८१७ च्या नोव्हेंबर महिन्यांत नागपूरच्या लढाईंत यांनीं फार मोठी मर्दुमकी गाजविली. नागपुरास कॅप्टन डोव्हटनबरोबर यांनीं निकरानें युद्ध केलें. मालेगावांस महिनाभर लढून यांनीं आपलीं कीर्ति ठेविली. अमळनेरास यांनीं आपल्या स्वामीकरितां, प्रामाणिकपणानें लढून शत्रूकडील लाचेचा मोह झुगारून दिला. अशीरगडासमोर याचें इंग्रजांबरोबर चांगलें युद्ध झालें. यांची संख्या ६००० पेक्षां कधींच जास्त नव्हती.

अर्वाचीन :- नागपुराकडे यांनीं इतर मुसुलमानांच्या चाली रीतीचा स्वीकार केला आहे. याची लग्ने निका पद्धतीनें होतात व फक्त एकच जेवणावळ असते. कारण फातिमा म्हणून महंमदाची मुलगी होती तिच्या लग्नांत फक्त एकच जेवणावळ झाली होती. घरांत कोणी मेलें तर हे महंमदाच्या सांगण्याप्रमाणें शोक करीत नाहींत. हे लोक इतर सुन्नी मुसुलमानांबरोबर लग्नें करतात. सिताबर्डीच्या लढाईंत यांची युद्धारोळी ' दीन दीन महंमद ' अशी होती.

१९११ सालीं पंजाबांत असणार्‍या ९६९ अरबांपैकीं ९५८ भावलपूर संस्थानांत आढळले. आपण भिकु व शादिखान या दोन अरबस्तानांतून आलेल्या मुसुलमानांचे वंशज आहोंत असें ते ह्मणतात. यांच्यांत ज्ञातिविवाह रूढ आहे. परंतु कधीं कधीं निरुपायास्तव ते जाटांशीं बेटी व्यवहार करितात. त्यांच्या लग्नाच्या चालीरीती जाटांच्या सारख्या आहेत.

अ र बी वा ङ् म य का व्यें.- आरबी वाङ्‌मयाचा आरंभ हा महंमदापूर्वी जे अरब लोक होते त्यांच्या काव्यांपासून व  कथांपासून होतो. हीं काव्यें प्रथम तोंडींच असत व परंपरेनें पुढें चालत. प्रथम अर्धवट गद्य असून नंतर हळू हळू यमकें प्रास वगैरेंचा प्रवेश झाला. प्रथम या काव्याचें स्थल म्हणजे लष्करची छावणी व विषय मृतवीरांची स्तुति व  नंतर कवीची प्रणयकथा याप्रमाणें असत. पुढें पुढें कवितेचा सार्वलौकिक विषय आढळून येऊं लागला. तो ह्मटला ह्मणजे कवि याचना करावयास गेला आहे अशा एखाद्या थोर अथवा श्रीमान् मनुष्याची स्तुति हा होय.

महंमदीय कालापूर्वी कवींनां फार मान असे. स्तुति व व्याजोक्ति हीं यांचीं मुख्य शस्त्रें असत. वर सांगितलेल्या कालो द्‍भव काव्यांची संहिता ८ व्या शतकापासून १० व्या शतकाच्या दरम्यान तयार झाली. तोंपर्यंत असा एकीकरणाचा कोणी प्रयत्‍न केला नव्हता. पूर्वकालीन काव्यांचें रक्षण व एकीकरण करण्यास साहित्य उपलब्ध होतें ? यापैकीं पुष्कळशीं, व्याकरण वगैरे विषयांत उदाहरणादाखल दिलेलीं असत, तेथून जमा करण्यांत आलीं. वर सांगितलेलीं काव्यें शुद्ध स्थितींत मात्र मिळालीं नाहींत. मध्यंतरी महंमदी  धर्माचा प्रसार झाल्यामुळें यांपैकीं कांहींची छाटाछाट झालेली आढळून येतें. व हीं तोंडी परंपरेनें आल्यामुळें मूळामध्यें पुष्कळसा फरकहि पडत गेला असेल.

यांची भाषा मध्य अरबस्तानांतील होती. त्यामुळें शहरांतील लोकांस समजण्याकरितां भाषेचा अभ्यास वगैरे करण्याकरितां त्यांवर पुष्कळ टीका तयार झाल्या. या कालचे सहा मोठे कवी होते, शिवाय एक यहुदी व एक ख्रिस्ती होता.

महंमद हा या कवींचा द्वेष करीत असे. कारण, त्यांचें अरब लोकांवर फार वजन असे व ते पूर्वीच्या धर्माचीच स्तुति गात असत. जेव्हां या कवींनां महमदीयांपासून त्रास होऊं लागला तेव्हां कांहीं कवी पगडी फिरवून महंमदीय मताची स्तुति गाऊं लागले.

पहिले चार खलीफ जरा धार्मिक व साधे असत, त्यामुळें काव्याची बरीच गळचेपी झाली व फक्त धार्मिक काव्यांनांच प्रोत्साहन मिळालें. परंतु उमईद खलीफ गादीवर आल्यावर त्यानें जरी महंमदी मताचा बाह्यात्कारीं पूर्ण स्वीकार केला होता तरी अरबांच्या जुन्या चाली व ख्रिस्ति संप्रदाय यास पूर्ण मुभा दिली.

या कालीं कवींनां राजदरबारी व सरदार यांजकडूनच मुख्यत: आश्रय मिळत असल्यामुळें काव्यांचेंहि स्थलांतर अरण्यापासून शहराकडे झालें व त्यामुळें काव्यांत कृत्रिमतेचा प्रवेश झाला. हळू हळू काव्यांस जास्त स्वातंत्र्य प्राप्‍त होऊन पूर्वीचे नियम सैल होत जातां जातां अजीबात नाहींसे झाले. या सुमारास फारसी वाङ्‌मयाचाहि परिणाम बराच झालेला दिसून येतो. कवितेचा विषयहि ' आपल्या राष्ट्र जातीची थोरवी ' हा जाऊन त्या जागीं साध्या आयुष्यांतील गोष्टी येऊं लागल्या. यानंतर स्पेन, सिसिली वगैरे देशांतहि मोठमोठे अरबी कवी होऊन गेले. सुमारें आठव्या शतकापासून कांहीं काव्यांचे संग्रह केलेले आढळतात. हे संग्रह निरनिराळ्या उद्देशानें केलेले आढळतात. उदाहरणार्थ, व्याकरणदृष्ट्या शब्दांचा उपयोग दर्शविणें, चालीरीतीबद्दल माहिती देणें किंवा केवळ या कवितांनां स्थैर्य देणें इ.

यमकयुक्त गद्याचा उपयोग प्रथम महंमदानें केला. परंतु पुढें दहाव्या शतकापर्यंत त्याचें कोणी अनुकरण केलें नाहीं. दहाव्या शतकानंतर मात्र या वाङ्‌मयाचा प्रसार बराच झालेला दिसतो. या वाङ्‌मयाचा उपयोग फक्त भाषासौंद-र्याच्याच कामीं होत असे. याच कालीं नैतिक शिक्षण व सर्वसाधारण सभ्य गृहस्थास लागणारें शिक्षण देणारें एक वाङ्‌मय तयार होत होतें. याला ' अदब ' वाङ्‌मय ह्मणत. हें गोष्टी व कविता यांच्या रूपानें असे. आपल्याला ' इब्नकुतैबा ' याच्या ' उमुन उल अखबार ' या ग्रंथांत राज्यकारभार, युद्ध, मैत्री, नीति, इत्यादि विषयांचीं नांवें आढळतात. आठव्या शतकांत ' इब्न मुकाफा ' हा मझ्द धर्म सोडून म्लेंच्छ झाला व त्यानें पंचतंत्राचें ' बिदपै ' यानें पल्हवींत केलेलें भाषांतर ' कलिल व दिम्म ' या नांवानें अरबींत आणलें. याची भाषा फार शुद्ध असल्यामुळें व याची लेखनशैली चांगली असल्यामुळें हें एक आदर्शपुस्तक होऊन बसलें आहे.

इतिहास.- अरबी भाषेंतील इतिहास म्हणजे प्रत्यक्ष पाहणार्‍यांनीं घडलेल्या गोष्टी दुसर्‍यास सांगिल्यावर त्या परंपरेनें ग्रंथकारापर्यंत येऊन त्यानें लिहून ठेवलेली हकीगत होय. याचेंच एक दुसरें स्वरूप असें असे कीं, ग्रंथकार निरनिराळ्या प्रसंगांबद्दल निरनिराळ्या हकीकती एकत्र ग्रथित करीत असे. प्रथमपासून गोष्टी व काव्यें यांचे विषय वीरांचीं शूर कृत्यें व इराण आणि कान्टांटिनोपल येथील राजांचें वैभव हे असत. परंतु महंमदाचा उदय व अरबानीं नंतर अर्ध्या जगावर मिळविलेलें स्वामित्व या दोन गोष्टीनीं या काव्यांस व गोष्टीस एक पुष्कळ दिवस पुरणारा विषय करून दिला. परंतु गोष्टींचें टांचण करून ठेवणें त्यावेळीं अधर्म मानला जात असे. तरीहि अशीं टांचणें पुष्कळ होऊं लागलीं. हल्लीं उपलब्ध असलेला सर्वांत जुना इतिहास ह्मटला म्हणजे ' इब्न इषाक ' याचें महंमदाचें चरित्र होय. हें बरेंच विश्वसनीय आहे. याची मूळ प्रत उपलब्ध नसून नक्कल आहे ( इब्नहिषाम कृत ). यांत सर्वांत मोठा इतिहास म्हटला म्हणजे ताबरीचा होय. या कालाबद्दल काहीं ऐतिहासिक अद्‍भुत कथाहि उपलब्ध आहेत. यावेळीं कांहीं बनावट इतिहासहि तयार झाले होते व त्यावरूनहि कांहीं अद्‍भुत काव्यें व गोष्टी तयार झाल्या होत्या. परंतु हिजरी सनाच्या ६ व्या शतकांत हीं अद्‍भुत काव्यें व गोष्टीं आधारादाखल घेतल्यामुळें पुष्कळ खोट्या गोष्टी इतिहासांत शिरल्या.

भूगोल :- महंमदी संप्रदायाच्या विस्ताराबरोबर भूगोलाचें ज्ञान वाढत जाऊन ९ व्या शतकांत पहिलें पुस्तक बाहेर पडलें. टॉलेमीच्या भूगोलाच्या अध्ययनानें या विषयावरील ग्रंथांस चालन मिळालें. याशिवाय जुन्या काव्यांतून निर्देश केलेल्या स्थळांसंबंधीं माहिती देणारे ग्रंथ असत.

व्याकरण व शब्दशास्त्र :- पहिलें अरबी व्याकरण ७ व्या शतकांत अबुल असबद-उद-दुअलि यानें लिहिलें. परंतु खरा व्याकरणास आरंभ ८ व्या शतकांत होतो. खलीफ इब्न अहमद यानें प्रथम छंद:शास्त्राचें नियम लिहिले व एक कोश तयार केला. याचा शिष्य सिबावैहि ( इराणी ) यानें एक व्याकरण लिहिलें ते अद्याप आदर्शग्रंथ मानलें जातें. वरील ग्रंथकार बसर्‍याकडील होत. कुफाकडील ग्रंथकार बेदुइन लोक जी भाषा बोलत तिजकडे लक्ष्य देत व त्यांचें व्याकरणाच्या नियमपेक्षां प्रचलित भाषेकडेच जास्त लक्ष्य असे. यांपैकीं हरुन अल् रशीद याच्या पुत्राचा शिक्षक किझाइ हा प्रमुख असे. ४ थ्या शतकामध्यें या दोन्ही संप्रदायांचा अस्त होत गेला. बगदाद येथील भाषावेत्त्यांचा संप्रदाय पुढें आला. १० व्या शतकांत कांहीं इराणी ग्रंथकार अरबी भाषेचें अध्ययन करूं लागले. एकानें ( हमधानी ) पर्यायशब्दकोश व दुसर्‍या एकानें ( जौहरी ) एक शब्दकोश ( सहाह ) तयार केला. परंतु महत्त्वाचे असे अरबी शब्दकोश यानंतरच तयार झालें. 'इब्न मनझुर' याचा 'लिसान उल अरब' हा ग्रंथ, १२३२-१३११ व 'मुर्तदा-उद-झबिदी' याच्या 'कामुस' या ग्रंथाधारें 'फैरुझाबादी' यानें लिहिलेला 'ताअ उल आरुस' हा ग्रंथ, हे नंतर तयार झाले.

शास्त्रीय :- प्रथम ग्रीक ग्रंथांचें भाषांतर होऊन अरबी शास्त्रीय ग्रंथांचा आरंभ झाला. यांपैकीं बरेचसे ग्रंथ सिरीअक भाषेंतून आले. संस्कृत भाषेंतूनहि बराच भाग घेतलेला आढळतो. विशेषेंकरून ज्योतिषशास्त्र संस्कृतामधून हिंदुस्थानाकडूनच आलें. यांनीं हिंदुस्थान व ग्रीस या देशांपासून मिळविलेल्या गणितशास्त्राची चांगली वाढ केली व हेच पुढें यूरोपचे शिक्षक बनले. वैद्यकीचें ज्ञान गॅलेनच्या ग्रंथांपासून व गांदिसपुर येथील वैद्यक संप्रदायाकडून मिळालें. पुष्कळसें अरबी तत्त्ववेत्ते वैद्य असत. वास्तविक यांस रसायनशास्त्र माहीत नव्हतें. परंतु यांचेंच किमयेबद्दलचें ज्ञान पुढें रसायनशास्त्राची जननी ठरलें. प्राणिशास्त्राची तशीच गोष्ट आहे. भूस्तरशास्त्राबद्दलचें ज्ञान शास्त्रीय नसून व्यावहारिक होतें.

अ र बी त त्त्व ज्ञा न. - अरबी तत्त्वज्ञानामध्यें वास्तविक अरबी असें नांव व भाषा यांशिवाय कांहीं नाहीं. ही  मूळची ग्रीक विचारपद्धति असून तिचें या भाषेंत भाषांतर होऊन तिच्यावर थोडासा प्राच्य संस्कृतीचा परिणाम झाला आहे. जे राजे उदारमतवादी झाले, त्यांनीं तत्त्ववेत्त्यांस वेळोवेळीं प्रोत्साहन दिलें, परंतु साधारणत: लोकांचा या लोकांवर विश्वास नसे. कालांतरानें सेमिटिक व महमदी पद्धतीचा झालेला विकार निघून जाऊन पुढच्या सॅरॅसन तत्त्ववेत्त्यांनीं फक्त अ‍ॅरिस्टाटल याच्याच पद्धतीचा अंगीकार केला.

महमदी धर्माचीहि एक तत्त्वज्ञानपद्धति होती; परंतु ही पारमार्थिक होती; तीपासून 'कलाम' व 'मुताकल्लिमून' हे शब्द प्रचारांत आले. ही पद्धति मध्ययुगीन 'स्कूलमेन' च्या पद्धतीसारखी होती. हे तत्त्ववेत्ते आपल्या पारमार्थिक तत्त्वांनां ही लावीत असत, पुढें ग्रीक तत्त्वज्ञानपद्धति जेव्हां खलीफाच्या कारकीर्दीत प्रचारांत आली तेव्हां ते स्वत:च्या तत्त्वांनां आधारभूत म्हणून त्या पद्धतींतील कांहीं तत्त्वें घेऊं लागले.

अरबी तत्त्वज्ञानाला त्याच्या आरंभकालींच (९ व्या शतकांत) या ग्रीक तत्त्वज्ञानाचा फार मोठा लाभ झाला. हेंच लॅटिन भाषेंत येण्यास १२ व्या शतकापर्यंत काळ जावा लागला. प्रथम सिरियामधील तत्त्ववेत्त्यांनीं प्लेटोच्या मतांचा सर्वत्र (पूर्वेकडे) प्रसार केला होता परंतु हळूहळू 'निओप्ले टानिक' पद्धति प्रचारांत आली व त्यांनीं अ‍ॅरिस्टॅटल याच्या मतांचा इतका जोरानें प्रसार केला कीं हींच मतें पुढें 'ईस्टर्न चर्च' पद्धतीचा मुख्य भाग झालीं (६ वें ७ वें शतक). परंतु ही विचारपद्धति पुढें अशीच वाढत जाऊन तिची पारमार्थिक बाजू अजीबात सुटली. सरतेशेवटीं झेनो बादशहानें नेस्टोरिअन तत्त्ववेत्त्यांनां एडेस्सा येथून इ. स. ४८९ मध्यें इराणांत हांकून दिलें. तेथें त्यांनां सस्सनिद राजांनीं आश्रय दिला. तेव्हां त्यांनीं 'निसीबिस' येथें एक शाळा स्थापन केली. गांदिसपूर अथवा निशापूर येथें एक ग्रीक वैद्यकीची शाळा प्रथम सुरू झाली व वैद्यकाबरोबरच ग्रीक तत्त्वज्ञानाचाहि सर्व इराणभर प्रसार झाला. यांच्या वैद्यकीच्या ज्ञानामुळें यांनां समाजांत फार मान असे. त्यामुळें महंमदी संप्रदायाचा प्रसार झाल्यानंतरहि यांनां या पद्धतीचा प्रसार बगदाद येथें व आसपास करण्यास सांपडला. व लवकरच अ‍ॅरिस्टाटलच्या ग्रंथांचें प्रथम सीरियक व नंतर अरबी भाषांत भाषांतर झालें.

लौकिक तत्त्वज्ञानाचा प्रसार आब्बासि खलीफ गादीवर असतांना झाला. हे राजे इराणाकडील असल्यामुळें पुष्कळशी इराणी संस्कृति यावेळीं महंमदी संप्रदायांत शिरली. या तत्त्वज्ञानालाहि साधारण जनतेपेक्षां राजाचाच आश्रय जास्त असे. आणि या राजाश्रयामुळेंच बगदाद व निशापूर येथील शाळांकडे विद्वान लोक लोटले.

अरबी तत्त्वज्ञानपद्धति प्रथम चार नांवाखालीं लॅटिन स्कूलमेन यांनां माहीत होती. ती म्हणजे अलकिंडिअस, अलफॅरॅबिअस, अव्हिसेन्ना व अल गाझेल यांची. यांपैकीं अव्हिसेन्ना हा फार प्रख्यात होऊन गेला.

अव्हिसेन्ना यानें पारमार्थिक व लौकिक तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्‍न केला. परंतु याचा सांप्रदायिक गूढें तर्कपद्धतीनें सिद्ध करण्याचा प्रयत्‍न पुष्कळदां चुकीचा ठरलेला आहे. ही त्याची चूक घाशोलि यानें प्रथम स्पष्ट करून दाखविली. घाशोलि यानें लौलिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास विशेष केल्यामुळें त्याची परमार्थाकडून दृष्टि पार वळली. यानें निरनिराळ्या तत्त्वज्ञानपद्धतीची छाननी केली. याचा ग्रंथ (तत्त्वज्ञान्यांचा नाश) उपलब्ध आहे. या काळापासून अरबी तत्वज्ञानाच्या र्‍हासास आरंभ झाला. जनताहि तत्त्ववेत्यांस नेहमीं पाखंडी समजत असे. व तुर्कांचा अंमल जारी झाला व इराणचें वर्चस्व महंमदी संप्रदायामुळें पुढें कमी झाले तेव्हां तत्त्वज्ञानाचाहि अंत झाला. खलीफ गोस्तनजिद यानें एक वाचनालय ११५० मध्यें जाळल्याचा उल्लेख आहे व ११९२ मध्यें एका वैद्यास कैद करून त्याची पुस्तकें जाळल्याचेंहि आढळतें. स्पेनमध्येंहि महंमदी अमलाखालीं याच प्रकाराची पुनरावृत्ति आढळून येते. मात्र येथील तत्त्ववेत्त्यांचें युग फार लहान झालें. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाची उच्चता फार मोठी असून वाढहि फार झपाट्यानें झाली. येथील तत्त्वज्ञानाच्या शाळा अँदालुशिया व कार्डोवा येथें होत्या. या कालांतील मुख्य तत्त्ववेत्ते अव्हेंपेस, अबुबेसर व अव्हेरोस हे होते. यांपैकीं अव्हेरोस हा फार प्रख्यात झाला. याला मुसुलमानांनीं सोडल्यावर ज्यू लोकांनीं याच्या तत्त्वांनां कांहीं दिवस आश्रय दिला. पुढें हीं तत्त्वें लॅटिन 'स्कूलमेन' यांस माहीत झालीं. पुढें पुढें अंधश्रध्देचा पगडा कमी झाल्यावर १२ व्या शतकांत पॅरिसमध्यें या तत्त्वज्ञानाचे भक्त निघाले. रॉजर बेकन हा देखील यास मान देत असे. १४ व्या शतकांत जॉन बेकनथॉर्प आणि वॉल्टर बर्ले हे अव्हरोसचे भक्त होते. सरतेशेवटीं पदुआ व त्याच्या आसपासचा प्रदेश हें या तत्त्वज्ञानपद्धतीचें कायमचें स्थान झालें. परंतु हा सर्वकाल ही तत्त्वज्ञानपद्धति पाखंड समजली जात होती.  याच वेळीं ग्रीक भाषेंतून मूळ अ‍ॅरिस्टाटलचे ग्रंथ भाषांतर रूपानें लॅटिन भाषेंत आल्यामुळें, अव्हेरोस हा मागें पडला. यावेळीं चर्चसुद्धां एकदम जागें होऊन अ‍ॅरिस्टाटलच्या ग्रंथांच्या पाठीस लागलें, परंतु दिवसेंदिवस विचाराची दिशा बदलत जाऊन तींच मतें प्रमाण होऊन बसलीं.

अरबी तत्त्वज्ञानानें मुख्यत: पाश्चात्त्य देशांत जी कामगिरी बजाविली तीमुळें अ‍ॅरिस्टाटला व त्याच्या मूळच्या ग्रीक भाषेंतील ग्रंथांकडे स्कूलमेननां लक्ष वळवावे लागलें.

अ र बां चें शा स्त्र ज्ञा न.- ज्योतिष, वैद्यक, व गणित या शास्त्रांत प्राचीन अरबांची बरीच गति असे. यासंबंधीं थोडेसें विवेचन ज्ञानकोश विभाग ५-विज्ञानेतिहास यांत त्या त्या शास्त्राखालीं आलेंच आहे. याठिकाणीं अरबांचे ज्योतिषविषयक ज्ञान कितपत होतें हें सविस्तर दिलें आहे. प्राचीन अरबांचें ज्योतिषाचें ज्ञान थेलीझपूर्वीच्या ग्रीकांच्या ज्ञानापेक्षां जास्त नसावें. अब्बासि खलीफांच्या वेळेपासून अरब ज्योतिषाचा विशेष अभ्यास करूं लागले. प्रसिद्ध अलनमसूर उर्फ अबूजाफर (राज्यारोहण हि. स. १३६ इ. स. ७५४ ) याच्या कारकीर्दीत बौद्धिक विचारांत क्रांति होऊन शास्त्रीय अभ्यासास उत्तेजन मिळालें. अलमनसूर हा स्वत: ज्योतिषाचा अभ्यास करीत असे. याच्यानंतर हरून अलरशीद व त्याचा मुलगा महंमद अल अमीन यांनीं वरील संक्रमणास उत्तोजन दिलें. हरूनचा दुसरा पुत्र खलीफ अल मामून अबदल्ला ( राज्यारोहण हि. स. १९८, इ. स. ८१३-१४ ) याचें  नांव सर्वांत प्रामुख्यानें पुढें येतें. हा विद्येचा मोठा पुरस्कर्ता होता. याच्यावेळेपासून शास्त्रें व विशेषत: ज्योतिषशास्त्र यांचा अरबांनीं जबर व्यासंग केला. अल्माजेस्ट आणि अलेक्झांड्रा येथील ग्रीक ग्रंथ यांचीं भाषांतरें झालीं. बगदादच्या ज्योतिष्यांनीं वेध घेऊन टॉलेमीपेक्षां अधिक बिनचूक सूर्य चंद्रांचीं कोष्टकें तयार केलीं. सायन वर्षाचें मान त्यांनीं हिपा र्कसपेक्षां जास्त सूक्ष्म काढलें; पृथ्वीचा आकार ठरविण्यासाठीं त्यांनीं मेसापोटेमियांत याम्योत्तार वृत्ताच्या एका अंशाचें मापन केलें.

अलमामूनच्या कारकीर्दीत व नंतर बरेच ज्योतिषी उदयास आले. त्या सर्वांत महंमद बिन जाफर हा विशेष प्रसिद्ध असून तो आलबाटेग्निअस (आलबटानी ) या नांवानें यूरोपांत प्रसिद्ध आहे. हा इ. स. ८८० च्या सुमारास प्रसिद्धीस आला असावा. तो जातीनें सेबियन असून नक्षत्रोपासक होता. या वेळीं बगदाद दरबारांत परधर्मसहिष्णुता असून विद्येस मान असे. आलबाटेग्निअस हा सिरियाच्या सुभेदारीच्या जागीं असून त्याचा विशेष भर ज्योति:शास्त्रावर होता. यानें बहुतेक वेध अँटायोक अथवा मेसापोटेमियांतील रुक्का शहरीं घेतले.

आलबाटेग्निअसनें टॉलेमीची पद्धति व शोध घेऊन त्यांत कांहीं ठिकाणीं फरक केला व कित्येक स्वत:चे शोध लावले. स्थिरतारकांच्या गतीसंबंधानें आलबाटेग्निअसचे शोध त्याच्या पूर्वीच्या लोकांपेक्षां जास्त बरोबर होते. टॉलेमीच्या मतें त्यांनां एका शतकांत १ अंश गति आहे. पण आल बाटेग्निअसच्या मतें ही गति ७० अंश असून आधुनिक ज्योतिष्यांच्या मतेंहि ती सुमारें ७२ अंशच आहे. टॉलेमीच्या वेधांशीं तुलना करून यानें जें ३६५ दिवस ५ तास ४६ मि. २४ से. वर्षमान ठरविलें त्यांत फक्त २॥ मिनिटांचीच चूक होती. याच्या पूर्वी चंद्रोच्च अचल, काल्पनिक व नक्षत्रापलीकडे आहे असा समज होता. यानें इतर अचलतारे व हा बिंदु यांत फरक दाखवून जरा जलद गति असल्याचें दाखविलें. या शोधानें हीच गति इतर ग्रहांसहि असावी असें त्याला वाटलें व तें सांप्रत खरेंहि ठरलें आहे. चंद्र व इतर ग्रहांबद्दल टॉलेमीच्या कांहीं चुका यानें सुधारल्या.यानें नवीन कोष्टकें केलीं व तीं टॉलेमीपेक्षां सरस ठरलीं. याच्या ' झिंजसाबी ' नांवाच्या ग्रंथाचें लॅटिन भाषेंत रूपांतर झालें पण तें चुकीचें होतें. मूळ ग्रंथ व्हॅटिकन ग्रंथालयांत असावा. हा प्रसिद्ध पुरुष हि. स. १३७ ( इ. स. ९२९ ) मध्यें मरण पावला ( विज्ञानेतिहास पृ. २८९ पहा ).

अरब ज्योतिष्यांनीं ग्रीकांचें अनुकरण करून फारच थोडी प्रगति केली असा यूरोपमध्यें समज होता. १८०४ मध्यें कॉसिननें इब्न युनीसच्या ग्रंथाच्या कांहीं भागांचें रूपांतर केलें. त्यांत ग्रहण व ग्रहांच्या युती यांसंबंधीं जी माहिती होती तिजवरून तर वरील कल्पना अधिकच दृढ झाली. जे. जे. सेदिलो यानें इब्न युनीसच्या ग्रंथाच्या राहिलेल्या भागाचें रूपांतर करून शिवाय त्याला इब्न शाथिरच्या ग्रंथांत याचे आणखी भाग सांपडले; तेहि त्यानें प्रसिद्ध केले. यांत कांहीं नवीन रीती असून त्या सांप्रतच्या त्रिकोणमितीशीं जुळतात. इब्न युनीसचा समकालीन बगदाद येथे १०० व्या शतकांत असलेला अबल-वोल्फा याच्या अल्माजेस्ट ग्रंथांत स्पर्शज्या व कोटिस्पशज्या यांच्या सारण्या असून त्यांचा उपयोग सध्यांच्या त्रिकोण मितीच्या कोष्टकाप्रमाणें करावयाचा असे. अशा रीतीनें यानें गणितशास्त्रांत क्रांति घडवून आणली. वरील शोधांनीं हुरूप येऊन सेदीलोनें आणखी शोध सुरू केले. त्याच्यामतें उलुघबेगची यादी स्वतंत्र असून बाकीच्यांनीं केवळ सेलोमीची नक्कल केली असावी. मेनेलॉसनें हिपार्कसवरून व टॉलेमीनें मेनेलॉसवरून नक्कल केली.
वरील सेदीलोच्या प्रयत्नानें बरीच नवीन माहिती उपलब्ध झाली.

ग्रीकांच्या शंकुयंत्राप्रमाणें अरबांचीं यंत्रें उपलब्ध नाहींत असा समज होता. आलबाटेग्निअसच्या ग्रंथावरून अरबांनीं टॉलेमीच्या पुढें मजल मारली नव्हती असें दिसतें. सेदीलोनें अबलहसन अल्लीच्या ग्रंथाचें भाषांतर केलें. यांत शंकुयंत्राचें फारच चांगले वर्णन आहे. हा १३ व्या शतकांत झाला. याच्या ग्रंथांत अरबांच्या शोधांबद्दल आणखी माहिती आढळते. विशेषत: स्पेनमध्यें अरबांनीं शास्त्रीय विषयांत प्राविण्य मिळविलें होतें व तेथील मुख्य शहरीं मोठालीं ग्रंथालयें असत.

अरबांच्या ज्योतिषग्रंथांत फलज्योतिषहि येतें. त्यांनीं बीजगणिताचा शोध लावला असें म्हणतात. परंतु त्यांनीं दशमानात्मक संख्यालेखन पद्धति, इतर गणितविषयक शोध व बीजगणित हिंदूंपासूनच घेतलें असावें. धर्मयुद्धामुळें पौरस्त्यांच्या बर्‍याच कल्पना यूरोपांत पसरल्या. बगदादच्या ज्योतिष्यांनीं अलेक्झांड्रा येथील ज्योतिष संप्रदायावर ताण केली होती यांत शंका नाहीं. अबुल वोकानें काढलेल्या विचारपद्धतीनें अरबांच्या ग्रंथांसंबंधीं उत्सुकता उत्पन्न झाली परंतु त्यांच्या यंत्रसामुग्रीकडे कोणीहि लक्ष्य पुरविलें नाहीं.

वे ध यं त्रें.- अरबांच्याजवळ नक्षत्रयंत्र, षष्ठांशयंत्र ( सेक्स्टंट ) व इतर यंत्रें असून त्यांनीं यंत्रकलेंत बरीच प्रगति केली होती. हरूनअलरशीदनें शार्लमेनला एक घड्याळ नजर पाठविलें होतें. त्यांच्याजवळ घटीयंत्र, वाळूचीं घड्याळें व चाकावर चालणारीं घड्याळें असत. दमास्कस येथील मोठ्या घड्याळाचें वर्णन सिल्व्हेस्ट्रेड सॅसीनें केलें आहे. अरब धातूचे खगोल तयार करीत. इराणी वाङ्‌मयाचा नाश झाल्यामुळें प्राचीन इराणी लोकांचे परिश्रम कळण्यास मार्ग नाहीं. खलिफाच्या सत्तेपासून मुक्त झाल्यावर इराणी ज्योतिषी  चमकूं लागले. त्यांच्यापैकीं एकानें पंचांग सुधारून एक दिवस वाढविला. १३ व्या शतकांत होलगू-इलेकूखाननें ज्योतिष्यांनां उत्तोजन दिलें व त्याच्यानंतर झालेला उलुघखान स्वत: वेध घेण्यांत फार तरबेज होता. यानें १४७७ मध्यें रवीची परमक्रांति म्हणजे क्रान्तिवृत्ताचें तिर्यक्त्व मोजून जंत्र्या तयार केल्या. यांहून जास्त बरोबर जंत्र्या पुढें टायकोब्राही पर्यंत कोणी केल्या नाहींत. अरबी ग्रंथांत यंत्रांसंबंधीं दोनच पुस्तकें असून त्यांचें रूपांतर सेदीलो या पितापुत्र द्वयांनीं केलें आहे. मुल्लाफिरुझ ग्रंथालयांत ज्योतिष, गणित वगैरे सदरांखालीं ९३ हस्तलिखितें आहेत. यांतील ' नझत-अलहकैक ' नांवाच्या ग्रंथांत त्याचा कर्ता जमशीद बिन मसुद अलतबीब अलकाशी
उर्फ घयास हा 'तबकअल ममाटेक' ( क्रान्तिवृत्तीय तबकडी ) नांवाच्या यंत्राचें वर्णन देतो. नं. ५९ च्या हस्तलि खितांत बरीच माहिती असून त्यांत विशेषत: कंकण, नक्षत्रयंत्र व शंकु यांचें वर्णन आहे. नं. ७२ च्या हस्तलिखिताचा कर्ता इब्न काशेफ अलदिन महंमद काजी असून यांत मुलालिद अल-सदवात-वलआर्झ या यंत्राचें वर्णन आहे. सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ नं. २१ चा असून त्यांतील बरेंच वर्णन दुर्बोध आहे. पण त्यांत यंत्रांच्या प्रतिकृति दिल्या आहेत.

याच ग्रंथांत अबुरैहान अलबेरुणीचें एक तुरीय यंत्र ( क्वाड्रंट ) असून त्याच्या योगानें खस्वस्तिकापासून क्रांतिवृत्ता ज्याठिकाणीं क्षितिजास छेदतें तितकी उंची काढतां येते. दुसर्‍या एका जुन्या यंत्रावरून रवीची परम क्रांति काढतां येते. याच यंत्रांवरून बहुधा सध्यांच्या लघुभाग मापकाची (व्हर्निअरची ) कल्पना निघाली असावी. सूर्याचें अथवा चंद्राचें ग्रहण मोजण्याचें एक यंत्र असे. 'द्विपाद' अथवा अलरूवयन या यंत्राच्या साहाय्यानें एकाच वेळीं दोन वेध घेतां येतात. अंशात्मक विभाग पाडलेल्या यंत्राच्या साहाय्याखेरीज मोजण्याचेंहि एक यंत्र होतें. याशिवाय या ग्रंथांत ( नं. २१ ) आणखी बर्‍याच यंत्रांचीं चित्रें व वर्णनें असून त्यांत अनबुया नांवाच्या पोकळ नळ्या असलेल्या एका यंत्राचीं चित्रें आहेत. नक्षत्रयंत्र पितळेचें करीत असून तें सहज वाहून नेतां येण्याइतकें सुटसुटीत होतें.

इ ति हा स.- अरबस्तान हें सेमाइट लोकांचें वसतिस्थान होतें असें म्हणतात, परंतु ह्याबद्दल खात्रीलायक पुरावा मिळत नाहीं. अरबस्तानचा खरा इतिहास, देशांतील जातीजातींमधील तंटे सुरू झाले तेव्हांपासून लिहिलेला आहे.

१९ व्या शतकापर्यंत अरबस्तानच्या पुरातन इतिहा साचें साधन म्हणजे अरब लोकांमधील दंतकथा होत.  परंतु वरील शतकांत बरेच शिलालेख सांपडल्यामुळें ख्रिस्तपूर्व दहा किंवा अधिक शतकांचा इतिहास ज्ञात झाला आहे.

ह्या शिलालेखांवरून असें अनुमान काढण्यांत आलें आहे कीं, त्यावेळीं मैन, साब, हाद्रमत आणि कतबन्नू अशीं थोडीशीं सुसंस्कृत राष्ट्रें होतीं. पैकीं शेवटल्या दोन राष्ट्रांविषयी फारशी माहिती मिळालेली नाहीं. फक्त हाद्रमत हें राष्ट्र इ. स. ३०० च्या सुमारास इथिओपियन लोकांनीं जिंकलें एवढी माहिती सांपडते.

साबियन राष्ट्रांत ख्रिस्तपूर्व ११५ वर्षे पावेतो सेबियन राजे राज्य करीत होते; नंतर हिमिअराइट ह्या जातीचे लोक तेथें राज्य करूं लागले. हिंदुस्थान आणि इजिप्‍त ह्यांमधील व्यापार ह्या राष्ट्रामार्फतच होत असल्यामुळें हें राष्ट्र त्यावेळीं उर्जितावस्थेस पोंचले होतें, परंतु टॉलेमी राजांनीं अलेक्झांड्रियापर्यंत जमिनीवरून मार्ग शोधून काढल्यामुळें ह्या देशाचा व्यापार बंद होऊन पुष्कळ साबियन लोकांनां स्थान-त्याग करावा लागला.

मिनाई हें राज्य दक्षिण अरबस्तानांतील जाफपर्यंत पसरलें होतें. या राज्यांत जवळ जवळ २५ राजे होऊन गेले अशी माहिती शिलालेखांवरून सांपडते. त्यावरून हें राष्ट्र बरेंच पुरातन असावें  असा अंदाज आहे. ह्यांतील मुख्य शहरें कर्नो, मैन आणि याथिल हीं होत.

ख्रिस्तपूर्व ११५ च्या सुमारास साबिअन लोकांची दक्षिण अरबस्तानवरील सत्ता हिमिअराइट लोकांच्या हातीं गेली असा उल्लेख वर आलाच आहे. ह्याच सुमारास कतबनिया राष्ट्राचाहि लय झाला. हिमिअराइट राजांनीं साबा आणि रैदान ह्या राष्ट्रांचे राजे असें नामाभिधान धारण केलें. ह्यांचे २६ राजे होऊन गेले असें वाटतें. ह्यांच्या कारकीर्दीत रोमन लोकांनीं अरबस्तानवर स्वारी केली परंतु वाळवंटामध्यें त्यांच्या सैन्याचा नाश झाला. नंतर आफ्रि-
केच्या किनार्‍यावर जे अबिसीनियन लोक गेले होते ते परत आले व दक्षिण अरबस्तानांत राहून आपलें वर्चस्व वाढवून इ. स. ३०० च्या सुमारास हिमिअराइट राजांनां जमीनदोस्त करून त्यांनीं गादी बळकाविली आणि साबा, रैदान, हाद्रमत आणि टोमेन ह्या राष्ट्रांचे राजे असें नांव धारण केलें. परंतु हिमिअराइट लोकांनीं ज्यू धर्माचे अनुयायी बनून पुन: आपला राजा गादीवर बसविला. हिमिअराइट आणि अबिसीनियन लोकांमधील युद्ध ह्मणजे ज्यूधर्म आणि ख्रिस्तधर्म ह्यांमधील युद्ध होय. ह्मणून ख्रिस्तानु यायी राष्ट्रांचें साहाय्य मिळून अबिसीनियन लोक विजयी झाले. परंतु लगेच इ. स. ५७५ त इराणच्या राजाच्या  मदतीनें येमेन येथें ज्यू धर्माच्या अनुयायांनीं आपलें राज्य स्थापिलें.

वरील राष्ट्रांशिवाय हीरा, घसान, आणि किण्डा हीं तीन बलाढ्य राष्ट्रें होतीं. हीरा येथें लखमीद नांवाचें घराणें इ. स. ६०२ पर्यंत राज्य करीत होतें. परंतु हें राष्ट्र स्वतंत्र नसून इराणच्या हुकमतीखालीं होतें. इ. स. ६०२ नंतर हें घराणें नष्ट झाल्यामुळें इराणतर्फे एक गव्हर्नर नेमण्यांत आला.

घसान हें संस्थान अरबस्तानाच्या वायव्येस असून जाफनिद ह्या नांवाचें घराणें तेथें राज्य करीत असे. ह्या घराण्याची रोमबरोबर मैत्री असल्यामुळें इराण किंवा हीरा ह्या राष्ट्रांबरोबर त्यांचें सतत युद्ध सुरू असे. परंतु ५८३ मध्यें घसनीद राज्याचे तुकडे होऊन कांहीं भाग इराणच्या अमलाखालीं तर कांहीं रोमच्या सत्तेखालीं गेला.

५ व्या शतकाच्या सुमारास किण्डा हें राष्ट्र उदयास आलें. हें राष्ट्र येमेनच्या राजाच्या सत्तोखालीं होतें. ह्या राष्ट्रानें एकवेळ हीरा राष्ट्रावर देखील आधिपत्य मिळविलें होतें.

वरील राष्ट्रांशिवाय इसवी सनाच्या ६ व्या शतकाच्या सुमारास बेहरीन, ओमन, जुलन्द, आणि हेजाझ अशीं लहानमोठीं राष्ट्रें होतीं.

वरील राष्ट्रांचा इतिहास दिला आहे तो महंमदाच्या उदय कालापर्यंतचा दिला आहे. त्याच्या उदयकालानंतरचा चव दाव्या शतकापर्यंतचा इतिहास चवथ्या विभागांतील तेराव्या व सतराव्या प्रकरणांत दिला आहे. (बुद्धोत्तर जग पहा.)

खलीफतीचा इतिहासहि त्या विभागांत (प्र. १७) आलेला आहे. खलीफाच्यानंतर उमईद घराण्यांतील पुरुष खलीफ ह्मणवूं लागलें. ह्यांच्या कारकीर्दीचीं आरंभींचीं वर्षें दंगेधोपे नाहींसे करण्यांत गेलीं. ह्या घराण्याचा मुख्य शत्रु ह्मणजे खारिजित लोक होत. अल्ली यानें ६५८ त त्यांचा मोड केला, परंतु ह्यावेळीं बरेच लोक पळून गेले व  सर्वत्र अशांतता उत्पन्न झाली. अल्लीच्या निधनानंतर हसन आणि हुसेन असे त्याचे दोघे पुत्र होते. परंतु हुसेन याने याझिद हा खलीफ कबूल न केल्यामुळें ६८० सालीं कर्बेला येथें तो मारला गेला. त्याबरोबर अब्दल्ला हा हुसेन घराण्यातर्फे याझिद ह्याचा सूड घेण्याकरितां तयार झाला. युद्ध सुरू होऊन मक्का व मदिना ह्या पवित्र स्थानांस याझिद ह्यानें वेढा दिला, परंतु कांहीं दिवसांनीं तो मरण पावल्यामुळें अरबस्तान, इजिप्‍त व सिरियाचा कांहीं भाग या ठिकाणीं अबदल्ला हा खलीफ मानला गेला. परंतु खारिजित लोकांचा अग्रणी अबदुलमलीक ह्याच्याकडून ६९२ मध्यें अबदुल्ला मारला गेल्यानंतरचा इतिहास लुप्‍तप्राय आहे.

ह्यानंतर अब्बासी घराणें उदय पावलें. त्यांची कारकीर्द ९ व्या शतकापर्यंत चालू होती. परंतु अरबस्तानला महत्त्वाची अशी एकहि गोष्ट तींत घडून आली नाहीं.

इ. स. १००० पूर्वी ओमन ह्या राष्ट्रानें खलिफची सत्ता झुगारून देऊन तें स्वतंत्र झालें होतें. नंतर एक शतक इमाम लोक राज्य करीत होते. पुढें बानीनेभान हें घराणें ११५४ ते १४०६ पर्यंत अधिकारावर होतें. १४३५ मध्यें बानी नेभान घराण्याविरुद्ध बंड होऊन इमामी कारकीर्द सुरू झाली. १५०८ मध्यें पोर्तुगीज लोकांनीं ओमनच्या पूर्व किनार्‍यावरील बराच भाग हस्तगत केला. परंतु १६२४ मध्यें एक नवीन घराणें उदयास येऊन पोर्तुगीज लोकांचें वर्चस्व कमी करण्यांत आलें व १६५१ मध्यें पोर्तुगीज लोकांनां मस्कत सोडून देणें भाग पडलें.

अरबस्तानच्या अर्वाचीन इतिहासाला वाहाबी चळवळीपासून सुरुवात झाली आहे. ह्या चळवळीचा प्रवर्तक महमद इब्न अदुबल वहाब हा होता. मुसुलमान लोकांच्या वेडगळ धर्मसमजुती, आणि त्यांपासून होणारे दुष्परिणाम दूर करावे ह्या उद्देशानें अबदुल ह्यानें प्रयत्‍न चालविले. १७४२ मध्यें दरैयाचा शेख महमद सौद हा अबदुलचा अनुयायी झाला. आणि १७६५ पर्यंत नेज्द आणि एलहास ह्या ठिकाणीं त्यांनीं तरवारीच्या जोरावर नवीन धर्माची स्थापना केली. १७६५ त त्याचा मुलगा अबदुल अझीझ हा गादीवर बसला. त्यानेंहि आपल्या पित्याचा कित्ता गिरविल्यामुळें तुर्कस्तानचा सुलतान देखील त्याचा वैरी झाला. परंतु अझीझच्यापुढें सुलतानाला हात टेंकावे लागले, ह्यामुळें वाहाबीचें बरेंच प्रस्थ माजून बहुतेक अरबस्तान पादाक्रांत करण्यांत आला. १८०२ मध्यें अझीझ वारला व त्याचा मुलगा सौद अमीर झाला. परंतु देवळें पाडणें, लोकांचा छळ करणें इत्यादि घोर कृत्यांमुळें लोकांच्या आणि इतर मुसुलमान राष्ट्रांच्या मनांत द्वेषाग्नि भडकून अमीर घराणें जमीनदोस्त करण्याचा कट झाला. ह्या कटांत तुर्कस्तान देखील सामील झाला. परंतु ह्यावेळीं तुर्कस्तान यूरोपांतील भानगडीत गुंतल्यामुळें इजिप्‍तचा पाशा महमदअल्ली ह्याकडे ही कामगिरी सोंपविण्यांत आली. त्याप्रमाणें १८११ मध्यें महमद अल्लीचा मुलगा तसनपाशा हा सौदवर चाल करून आला. परंतु सौद ह्याच्यापुढें त्याचें कांहीं न
चालल्यामुळें महमदअल्ली स्वत: आला, परंतु व्यर्थ. १८१४ मध्यें सौद वारल्यानंतर त्याचा मुलगा अब्दुल्ला ह्यानें तह केला. परंतु इजिप्‍तचें सैन्य निघून गेल्यानंतर त्यानें तहाच्या अटी नाकबूल केल्या. परंतु पुन्हां सैन्य घेऊन १८१८ मध्यें अबदुल्ला शरण आला व त्याचा कॉन्स्टान्टिनोपल येथें वध करण्यांत आला.

इ. स. १८२४ त अबदुल्लाचा मुलगा तुर्की ह्यानें इजिप्‍तचें स्वामित्व कबूल करून व खंडणी देऊन १० वर्षांच्या आंत आपल्या राज्याला बळकटी आणली. १८३४ मध्यें याचा खून झाला व त्याचा मुलगा फेसल हा अमीर झाला. परंतु १८३६ मध्यें त्यानें खंडणी देण्याचें नाकारल्यामुळें त्याला पकडून कैरो येथें ठेवण्यांत आलें. कांहीं दिवसांनीं तुर्कस्तान आणि इजिप्‍त ह्यांमध्यें राजकीय भानगड उपस्थित होऊन अरबस्तानकडे दुर्लक्ष्य झालें. ही संधी साधून फेसल १८४२ त पळून आला, आणि ओमन व येमेन शिवाय सर्व अरबस्तानानें त्याला अमीर ह्मणून कबूल केलें.

इ. स. १८३४ मध्यें एलहासच्या स्वारींत फेसलबरोबर शामर कुळांतील अबदुल्ला नांवाचा एक गृहस्थ होता. बापाचा खून करणारा मशारा ह्याला धरण्यांत फेसल ह्याला ह्या गृहस्थानें साहाय्य केल्यामुळें अबदुल्ला हा जेबेल शामर येथील गव्हर्नर झाला. परंतु फेसल ह्याला कैरो येथें नेऊन ठेवल्यावर अबदुल्ला ह्यानें आपली सत्ता वाढविली. १८४३ त अबदुल्लाचा मुलगा तलाल हा गादीवर बसला. हा मोठा कारस्थानी आणि मतलबी असून यानें आपल्याबद्दल कोणालाहि संशय येऊं न देतां राज्याची मजबुती, प्रगति, व वाढ केली. त्याचप्रमाणें इजिप्‍तबरोबर देखील ह्यांनें संधान बांधलें होतें.

तलालच्या नंतर त्याचा भाऊ मताब हा १८६८ मध्यें गादीवर बसला. परंतु तो लवकरच मारला गेल्यामुळें त्याचा पुतण्या बन्दर हा अमीर झाला. त्याच्या मागून थोडक्याच दिवसांत अबदुल्लाचा तिसरा मुलगा महंमद अमीर झाला. कांहीं करणामुळें फेसल याचे वंशज आणि महमद ह्यांच्यामध्यें लढाई होऊन महंमद विजयी झाला ह्या जयामुळें उत्तर आणि मध्य अरबस्तानचा १८९१ मध्यें महंमद स्वामी झाला.

१८९७ मध्यें अबदुल अझीझ, महमदचा पुतण्या गादीवर बसला. ह्याच्या कारकीर्दीत कुवेत येथें एक नवीनच संघ तयार झाला. ह्या प्रांतांतील बंदरावर तुर्कस्तानचा डोळा होता. परंतु आयत्या वेळीं कुवेत येथील शेख मुबारक ह्यानें इंग्रजांचें साहाय्य मिळविल्यामुळें तुर्कस्तानचा बेत फसला. आणि १९०३ मध्यें कुवेत येथील इंग्रज लोक हे राजे मानण्यांत येऊं लागले.

हा बेत फसला असें पाहून तुर्कस्ताननें स्वत: नाहीं तरी दुसर्‍या मार्फत आपला डाव साधण्याचा प्रयत्‍न केला. परंतु याहि डावांत तुर्कस्तानला यश आले नाहीं आणि तह करावा लागला.

यू रो पी य व र्च स्वा चा इ ति हा स.- प्रथम पोर्तुगीज लोक अरबस्तानांत आले. १५०६ मध्यें त्यांनीं होर्मझ हें ठाणें घेतलें. नंतर १६५० त मस्कत हें शहर घेतलें. पोर्तुगीज लोकांनंतर ओमन येथें इराणचें वर्चस्व होतें. नंतर १७५९ मध्यें घफरी घराण्यांतील अहमद इब्न सय्यद ह्यानें इराणी लोकांनां हांकून लाविलें. नंतर १७९८ मध्यें त्याचा मुलगा ओमनच्या गादीवर बसला. त्याच्या मनमिळाऊपणामुळें आणि सात्विक धोरणामुळें राज्याला बळकटी येऊन बराच विस्तार झाला. ह्याचे साहाय्यकर्ते इंग्रज होते.

१८५६ त हा वारल्यानंतर त्याच्या मुलांमध्यें गादीविषयीं तंटे उपस्थित झाले. शेवटीं थुवेनी हा इंग्रजांच्या मदतीनें विजयी झाला, व फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्यें करार होऊन ओमनच्या सुलतानची स्वतंत्रता प्रस्थापित झाली. १८६६ त तो वारल्यावर त्याचा मुलगा सय्यद तुर्की ह्यांनें १८८८ पर्यंत गादी संभाळली. नंतर फीसल ( सय्यदचा मुलगा ) गादीवर आला. इंग्रजांच्या संमती शिवाय ह्यानें परराष्ट्रीय कारभार कांहीं करूं नये ह्मणून
हिंदुस्थानच्या तिजोरींतून त्यास खंडणी देण्यांत येऊं लागली.
 
१८३९ त इंग्रजांनीं एडन घेतलें. १८५७ पासून पेरीम बेट इंग्रजांच्या ताब्यांत आहे. तुर्कस्तान व इंग्रज यांची अरबस्तानांतील सरहद्द कायम करण्याकरितां एक मंडळाची योजना झाली व १९०५ मधील रिपोर्टाप्रमाणें बहुतेक सर्व दक्षिण अरबस्तान इंग्रजांच्या सत्तोखालीं आला.

हेजाझ आणि येमेन हे प्रांत तुर्कस्तानच्या ताब्यांत होते. येमेन येथें १९०४ च्या सुमारास बंड उपस्थित झालें होतें, परंतु लवकरच त्याचा तुर्की शिपायांनीं मोड केला.

अ ली क डी ल इ ति हा स. -  जागतिक युद्धापूर्वी खलीफ या नात्यानें सुलतानाची धार्मिक सत्ता असल्यामुळें अरबस्तान हा ओटोमन साम्राज्याचा एक भाग म्हणून गणला जात असे. तथापि वस्तुस्थिति अशी होती कीं, अरब स्तानांत पुष्कळ लहान लहान स्वतंत्र राज्यें होतीं व त्यांपैकीं कांहीं खलीफाची आधिसत्ता अंशत: मान्य करीत असत. दुसरीं कित्येक ब्रिटिश संरक्षणाखालीं आलीं होतीं. तुर्कांचा प्रत्यक्ष अम्मल हेजाझ प्रांत, मक्क, मदीना हीं पवित्र शहरें, असीर व येमेन या प्रांतांतील कांहीं शहरें व बंदरें वगैरे भागांवर मात्र होती.  हेजाझ रेल्वे ही तुर्कांचीं सत्ता अरबस्तानावर दृढ बसविण्याकरितांच बांधण्यांत आली होती; पण ही लाईन एकतृतीयांश भागावरच होती व तेवढीहि नीट चालविणें तुर्कांकडून झालें नाहीं व बाकीचा भाग सुधारण्याचें काम तुर्कांकडून झालें नाहीं, जागतिक युद्धानंतर तुर्कांची अरबस्तानावरील सत्ता सर्वस्वी नाहींशी झाली आणि १९२१ मध्यें पुढील स्वायत्त राज्यकर्ते प्रस्थापित झालेले आहेत :- हेजाझचा राजा, नेज्द व एलहासचा अमीर, जेबेलशामरचा अमीर, असिरमधील साबियाचा संस्थानिक, येमेनचा इमाम, ओमनमधील मस्कतचा सुलतान, हाद्रामौतचा सुलतान, कुवैतचा शेख, क्वातारचा शेख वगैरे.

हेजाझचें राज्य :- जागतिक युद्धाच्या वेळीं जर्मनपक्षानें तुर्कस्तानाकरितांच धर्मयुद्ध चालू आहे, अशी चिथावणी अरबी मुसुलमानांमध्यें सुरू केल्यामुळें ग्रेटब्रिटन व दोस्त राष्ट्रें यांनां अरबस्तानांत कांहीं संकटांनां तोंड द्यावें लागलें. तांबडा समुद्र तुर्कांच्या ताब्यांत गेल्यास पूर्वेकडील दळणवळणाचा सुवेझमार्ग बंद होईल, अशी भीति पडल्यामुळें ग्रेट ब्रिटननें मक्केच्या शेरीफाकडे वळण बांधलें. शेरीफचें धार्मिक वजन मोठें असल्यामुळें त्यानें युद्ध धार्मिकस्वरूपाचें नाहीं, असें ठरवून युद्धांत पडण्यास मनाई केली तर अरबी मुसुलमान ऐकतील असा भरंवसा होता, व त्या मक्केच्या शेरीफला उर्फ अमीराला हेजाझच्या आटोमन सत्तेंतून मोकळे होण्याचीहि इच्छा होती. इ. स. १९१५ मध्यें मक्केच्या या शेरीफ हुसेननें बंड करून स्वतंत्र होण्याची इच्छा दोस्त राष्ट्रांस जाहीर केली. तेव्हां दोस्तांनीं त्याला द्रव्य व दारूगोळा वगैरे युद्धसामुग्री पुरविण्याचें कबूल केलें. १९१६ मध्यें शेरीफनें बंड उभारून आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला. त्याच्याविरुद्ध धाडण्यास तुर्कांजवळ मोठें सैन्य रिकामें नसल्यामुळें शेरीफला 'अरबांचा सुलतान' म्हणून आसपासच्या बर्‍याचशा संस्थानिकांनीं मान्यता दिली. नंतर त्यानें लवकरच 'हेजाझचा राजा' ही पदवी धारण केली व त्या गोष्टीला ग्रेटब्रिटन, फ्रान्स व इटाली यांनीं मान्यता दिली. युद्धसमाप्‍तीनंतरच्या तहपरिषदेंत हेजाझच्या राज्याचा स्वतंत्र प्रतिनिधीहि घेण्यांत आला व १९२० मध्यें राष्ट्रसंघामध्यें हेजाझ राज्याला प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला. तुर्कस्तानबरोबरच्या तहांत तुर्कांनीं अरबस्तानावरील सर्व सत्ता सोडून दिली.

१९२० मध्यें हेजाझच्या हुसेन राजाचा नेज्दच्या अमीराबरोबर सरहद्दीबाबत तंटा होऊन लढायाहि झाल्या व १९२१ मध्येंहि हें भांडण मिटलें नव्हतें.

म ध्य  अ र ब स्ता नां ती ल  रा ज्यें. - मध्यभागांत नेज्द (राजधानी रियाध) व जेबेल शामर (राजधानी हेल) हीं दोन राज्यें आहेत. नेज्दच्या अमीरानें १९१४ मध्यें ब्रिटिश सरकारशीं दोस्तीचा करार केला व तो युद्धांत शेवटपर्यंत पाळला. उलटपक्षीं जेबेल शामरचा अमीर तुर्कांनां मिळाला होता. त्यामुळें या दोघां अमीरांमध्यें लढाया झाल्या. त्यांत यशस्वी होऊन नेज्दच्या अमीरानें मध्य अरबस्तानांत आपली सत्ता पूर्णपणें प्रस्थापित केली. नेज्दचा अमीर हेजाझच्या राजाची धार्मिक किंवा राजकीय कोणतीहि अधिसत्ता मान्य करीत नाहीं.

'जेबेल शामर' च्या अमीरानें जागतिक युद्धांत तुर्कांच्या बाजूला मिळून त्यांना उंट वगैरेची पुष्कळ मदत केली; पण या युद्धांत पुढें त्याची सत्ता मुलुखदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या बरीच कमी झाली.

असुर :- या राज्याची सरहद्द अद्याप नक्की ठरलेली नाहीं, तरी साधारणपणें हेजाझ व येमेन यांच्यामध्यें हा मुलुख आहे व पूर्वेस नेज्दचें राज्य आहे. याचे उंच प्रदेश व सखल प्रदेश असे दोन भाग असून या दोन भागांतील लोकांत राजकीय व सामाजिक भेद फार तीव्र आहे. येथील लोक स्थायिक आहेत. कारण हा मुलुख शेतकीला सोयीचा असल्यामुळें भटकत हिंडण्याची जरूरी नाहीं. येथील बहुतेक लोक सुनी मुसुलमान व कांहीं वाहाबीपंथीहि आहेत. जागतिक युद्धापूर्वी या प्रांतावर एकछत्री सत्ता कोणाचीच नव्हती; कांहीं भागावर तुर्कांचा, कांहींवर मक्केच्या शेरीफचा, कांहींवर आबु अरिशच्या इद्रिसीचा व कांहींवर केवळ भटक्या लोकांचा अंमल होता; पण तुर्क सर्व प्रांतांवर अधिसत्ता सांगत जसत. जागतिक युद्ध चालू असतां इद्रिसी सय्यद महंमद याची इच्छा तुर्की अंमल नष्ट करून स्वत:चें वर्चस्व सर्व प्रांतांवर स्थापण्याची फार असल्यामुळें त्यानें तुर्कांविरुद्ध लढण्याचें जाहीर करून एडनच्या ब्रिटिश रेसिडेंटबरोबर १९१५ मे मध्यें करार केला व दोस्त राष्ट्रापासून युद्धसामुग्रीची मदत मिळविली. तथापि त्याला स्वत:ची सत्ता थोडीशी वाढवितां आली. येमेनच्या इमामाबरोबर त्याचें शत्रुत्व असल्यामुळें तिकडून हल्ला होण्याची त्याला भीति सतत होती. युद्धोत्तर कालांत (१९२१ मध्येंहि) या राज्याच्या सीमा नक्की ठरलेल्या नाहींत.

येमेन :- असुरप्रमाणेंच येथेंहि उंच व सखल प्रदेशांतील लोकांत धार्मिक व वांशिक मोठा तीव्र भेद आहे. उंच प्रदेशांतील लोक शियापंथाचे असून तिहमकडील शफीपंथाचे आहेत.  तसेंच राजकीय सत्ता कांहीं लोक तुर्कांची मानीत, तर कांहीं इमामाची मानीत.

इ.स. १९०४ मध्यें यह्म इब्न महंमद सत्ताधीश झाल्यावर त्याने तुर्कीसत्तेविरुद्ध बंड केलें.  उभयपक्षीं बरीच वर्षें विरोध चालू असून अखेर १९१३ मध्यें तह झाला व बादशाही फर्मान निघून इमामाची असुरपासून एडनपर्यंतच्या सर्व उंच प्रदेशावर सत्ता मान्य करण्यांत आली.  जागतिक युद्ध सुरू झाल्यावर १९१५ मध्यें त्यानें आपली सहानुभूति तुर्कांना दाखविली; पण तो युद्धांत प्रत्यक्ष सामील झाला नाहीं.  युद्ध समाप्‍तीनंतर १९१८ मध्यें ब्रिटिश हिंदी सैन्यानें होदीदा बंदरांत तळ दिला व इमामाबरोबर दोस्तीचा करार ठरविण्याची खटपट सुरू झाली; पण १९२१ पर्यंत या प्रयत्‍नांनां निश्चित स्वरूप काहींच प्राप्‍त झालें नाहीं.

इ रा णी आ खा ता व री ल सं स्था नें.– हीं सर्व आतां ब्रिटिश नियंत्रणाखालीं आलीं असून  त्यांच्या परराष्ट्रीय राजकारणावर ब्रिटिशांचा ताबा आहे.  अन्तर्गत कारभाराची सत्ता मात्र त्यांनां ब्रिटिश सरकारनें दोस्ती कायम राखण्याच्या अटीवर दिली आहे.  हीं संस्थानें ओमन, ट्रुशियल ओमन, एल काटर, बहरीन व कुवैत अशीं आहेत.  १९२१ मध्यें ब्रिटिश नियंत्रणाखालचा अरबी प्रदेश व एडन यांचा कारभार वसाहतखात्याकडे दिला असून हेजाझसंबंधाची व्यवस्था मात्र परराष्ट्रीय राजकारणाच्या स्टेट सेक्रेटरीकडे ठेविल्याचें ब्रिटिश पार्लमेंटांत जाहीर करण्यांत आलें.

इ. स. १९२१ पासून निरनिराळी अरब संस्थानें सुसंघटितण्याची व त्यांचा संघ बनवून अरबस्तान पूर्ण स्वतंत्र करण्याची चळवळ चालू आहे.  १९२१ आगष्ट मध्यें अमीर फैसूल याला इराकचा राजा या नात्यानें राज्याभिषेक करण्यांत आला.  वाहाबी टोळीचा प्रमुख अमीर इब्न साऊद याला ब्रिटिश सरकार शांतता व सुव्यवस्था राखण्याबद्दल मदत म्हणून सालिना ६०,००० पौंड देतें; हाच १९२१ ऑगस्ट पासून मध्यवर्ती अरब संस्थान मेज्द याचा सुलतान म्हणून राज्य करीत असून त्यानें फैसूल राजाशीं दोस्ती ठेवण्याचें जाहीर केलें आहे.  १९२२ डिसेंबरमध्यें मार्क्विस कर्झननें तुर्कस्तानच्या सत्तेखालून अरबांनां सोडवून स्वतंत्र करण्याची ब्रिटनची इच्छा असल्याचे जाहीर केलें.  १९२३ फेब्रुवारी मध्यें अंगोरासरकारनें हेजाझचा हुसेन राजा हा सर्व अरब राष्ट्राचा मुख्य अधिपति असल्याचें जाहीर केलें, आणि हेजाझ, सीरिया, पॅलेस्टाइन व मेसापोटेमिया हीं स्वतंत्र असल्याचें कबूल केलें (१९२३ मार्च) प्रमुख अरब संस्थानांचें प्रतिनिधी लंडन येथें जमले, आणि त्यांनीं सीरिया, पॅलेस्टाइन, इराक, हेजाझ, येमेन, असुर, नेज्द व मस्कत या सर्वांचा मिळून संयुक्त संस्थानसंघ (ग्रेट अरब कान्फिडरेशन) बनविण्याची सूचना केली.  ब्रिटननें ट्रान्स जार्डानियाचें स्वातंत्र्य कबूल केलें, पण पॅलेस्टाइनचा अरबी मुलुखांत समावेश होत नाहीं असें जाहीर केलें.  जून १९२३ मध्यें जाफा येथें पॅलेस्टाइनच्या अरब काग्रेसनें आंग्लो-अरब तहांतील पॅलेस्ताइनसंबंधाचा करार अमान्य केला.  आंग्लो-अरब तहानें अरबाचें स्वातंत्र्य मान्य करण्यांत आले.  सप्टेंबरमध्यें हेजाझच्या राजानें पॅलेस्टाईनमध्यें राष्ट्रीय सनदशीर सरकार स्थापण्याचें कबूल केलें.  १९२३ सप्टेंबरमध्यें ट्रान्सजार्डिनियांत अमीर अबदल्लाविरुद्ध बंड झालें तें असुरच्या फौजेनें लवकरच मोडलें.

अरबस्तानांत गुलामांचा व्यापार अद्याप चालू आहेत तांबड्या समुद्राच्या कांठचे रानटी लोक पकडून ते मोठ्या किंमतींना विकले जातात.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .