विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरराज – (बंगाल इलाखा.) चंपारण जिल्ह्यांतील एका विभागाचें मुख्य ठिकाण. २६० ३४′ उत्तर अक्षांश ८४० ४०′ पूर्व रेखांश यांवर. लोकसंख्या (१९०१) ११०७. गांवांच्या नैॠत्येस सुमारें एक मैलावर एक उंच दगडी स्तंभ असून त्यावर अशोक लिपीत लेख खोदलेले आहेत. हा स्तंभ एकच दगडाचा असून तो ३६.५ फूट उंच आहे व त्याचा व्यास पायथ्याशी ४१.८ इंच व टोकाशीं ३७.६ इंच आहे.