विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरवंतघाट – (मद्रास इलाखा.) निलगिरी जिल्हा. कुन्नुर तालुका. उब्बुतलाई खेड्याची वाडी. ११० २२′ उत्तर अ. ७६० ४५′ पूर्व रे. यांवर. निलगिरी पठरावरील एका खोर्यास या वाडीचें नांव मिळालें असून या ठिकाणीं बिन धुराची दारू तयार करण्याचा कारखाना सरकारनें काढला आहे. येथील यंत्रें विजेच्या साहाय्यानें चालतात व वीज तीन मैलांवर असलेल्या कार्तेरी नांवाचा धबधबा आहे त्या ठिकाणी उत्पन्न करितात. यामुळें या खेड्यास बरेंच महत्त्व आलें आहे. या कारखान्याजवळूनच उटकमंडला जुना रस्ता गेला आहे.