प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अरसीसिंह – (इ.स. १७६१-१७७२) उदेपूरचा राणा अरसीसिंह उर्फ अरिसिंह हा दुसर्‍या राजसिंहाचा चुलता असून त्याच्या मागून वि. सं. १८१८ (इ.स. १७६२) मध्यें गादीवर बसला.  वि. सं. १८०८ (इ.स. १७५२) मध्यें अंबरच्या माधवसिंहाने स्वत:स कांहीं हक्क नसतां मेवाडचा रामपुरा महाल होळकरास देऊन टाकला.  ही एक बाब वगळली तर आतांपर्यंत मेवाडचा एक तसूभरहि मुलूख लोकांकडे गेला नव्हता.  परंतु अरसीसिंहाच्या कारकीर्दीपासून मात्र मेवाडच्या राज्यास ओहोटी लागण्यास सुरूवात झाली.  प्रथम, वि. सं. १८२० (इ.स. १७६४) साली मल्हारराव होळकरानें बाजीरावानें बसविलेली खंडणी वसूल करण्याकरितां म्हणून उदेपूरवर स्वारी करून तेथील खजिन्यांतून ५१ लक्ष रूपये नेले.  याच वर्षीं मेवाडमध्यें मोठा दुष्काळ पडून धारण रूपयास पाऊणशेर झाली.

फि तु री प क्षा चे बं ड.—  यानंतर चार वर्षांनीं राज्यांत अंत:कलह माजून भाऊबंदीच्या लढाया सुरू झाल्या.  या बंडाचें खरें कारण काय होतें तें कळत नाहीं.  तथापि असें दिसतें कीं, अरसीसिंहानें आपल्या उद्दाम वर्तनानें आपल्या पदरचे साद्रीचा ठाकूर व देवगडाचा यशवंतसिंह चोंडावत यांचीं मनें दुखविल्यामुळें ते त्याच्याविरुद्ध उठले व लवकरच त्यांनां राज्यांतील सूक्तावतादि दुसरे कित्येक ठाकूर येऊन मिळाले.  या सर्वांनीं मिळून अरसीसिंहास पदच्युत करण्याचा निश्चय करून मागील राण्यास त्याच्या मृत्यूनंतर गोगुंडावाल्या राजकन्येपासून झालेला रत्‍नसिंह नांवाचा एक तोतया त्यांनीं उभा केला.  रत्‍नसिंह हा राजसिंहाचा खरोखरच मुलगा होता किंवा नाहीं याबद्दल राज्यांत द्विधा मत होतें.  तथापि या फितुरी पक्षानें रत्‍नसिंहासच मेवाडचा राणा असें जाहीर करून कमलमीर येथें त्यास गादीवर बसविलें.  इतकेंच नव्हे तर त्यांनीं 'अरसीसिंहास पदच्युत केल्यास सवा कोट रूपये बक्षीस देऊं' अशी लालूच दाखवून शिंद्यालाहि आपल्या मदतीस बोलाविलें.

उ ज्ज नी ची  ल ढा ई.— या वेळी कोट्याचा जालिमसिंह हा अरसीसिंहाच्या दरबारीं असून त्याजपाशीं त्याचें वजनहि बरेंच होतें.  त्याच्याच सांगण्यावरून राण्यानें रघू पैगावाला व दौलामिया [?] या दोन मराठे सरदारांनां आपल्या मदतीस बोलाविलें. शिवाय त्यानें पूर्वापारपासून पांचोलीकडे राज्याचा कारभार होता तो काढून अगरजी मेहता नांवाच्या एका इसमाकडे सोंपविला.  राज्यांतील मुख्य सोळा सरदारांपैकी फक्त पांचच राण्याच्या पक्षाकडे राहिले असल्यामुळें राण्याच्या पक्षाची स्थिति चिंताजनकच होती म्हणून त्यानें महादजी शिंदे उज्जनीस होता त्याच्याकडे मदतीची याचना केलीं.  (वि. सं. १८२४–इ.स. १७६८).  पण तिचा कांहीं उपयोग झाला नाहीं.  कारण, तोतयाच्या पक्षानें महादजीशीं अगोदरच संधान बांधून त्याची मदत मिळवून ठेविली होती.  इतकेंच नव्हे तर तो क्षिप्रातीरीं महादजीच्या छावणीशेजारीं छावणी देऊनहि राहिला होता.  तथापि अशा स्थितींतहि बिलकुल न कचरतां राण्याच्या सैन्यानें विरुद्ध पक्षाच्या संयुक्त छावणीवर हल्ला करून शत्रूच्या लोकांची दाणादाण केली व ते उज्जनीच्या दरवाज्यापर्यंत शत्रूचा पाठलाग करीत गेले.  परंतु येथें राण्याचें सैन्य आपला जय झाला असें समजून लुटालूट करण्यांत गुंतलें असतां शत्रूस कुमक मिळून त्यानें राण्याच्या सैन्यावर उलट हल्ला केला.  तेव्हां जी लढाई झाली तींत राण्याकडील साळुंब्रा, शहापुरा, बनेडा येथील मोठमोठे ठाकूर ठार झाले; स्वत: जालिमसिंहहि जखमी होऊन शत्रूच्या हातीं लागला व राण्याच्या सैन्यास पराभव पावून उदेपूरला यावें लागलें.

उ दे पू र चा वे ढा. –  आता अरसीसिंहापाशीं उज्जनीच्या लढाईंत पडलेल्या साळुंब्र्याचा चुलता भीमसिंह व जयमल्लाचा वंशज बेदनोरचा राठोड ठाकूर हे दोघेच कायते नांव घेण्यासारखे सरदार राहिले होते.  अशा स्थितींत मराठ्यानीं चाल करून येऊन राजधानीस तीन बाजूंनीं वेढा घातला.  पश्चिम दिशेस मात्र तलाव असल्यामुळें त्या बाजूनें अरवलींतील राजनिष्ठ पहाडी लोकांकडून शहरांतील लोकांस धान्यादिकाचा पुरवठा होत राहिला.  शहराचा बचाव सर्वस्वीं भाडोत्री सिंधी शिपायांच्या राजनिष्ठेवर अवलंबून होता.  पण त्यांचें वर्तन तर दिवासनुदिवस इतकें उद्दामपणाचें होत चाललें होतें कीं त्यांची शेवटीं पगारासाठीं राण्याचा अंगरखा खेंचण्यापर्यंत मजल गेली.  तेव्हां साळुंब्र्याच्या ठाकुराने दहा वर्षांपूर्वीं अमरचंद बडवा म्हणून कारभारी होता त्याच्या हातीं पुन्हां सुत्रें देण्याचा राण्यास सल्ला दिला.  हा अमरचंद मोठा तापट स्वभावाचा माणूस होता.  तथापि त्याच्या वजनामुळें मागील कारकीर्दीत कित्येक आपत्तीपासून राज्याचा बचाव झाला होता.  सिंधी शिपायांचा मेवाडांत प्रवेश देखील त्यानें कारभारांतून अंग काढून घेतल्यावरच झाला.  अरसीसिंहानें अमरचंदाला बोलावून कारभार हातीं घेण्याबद्दल विनंति केली तेव्हां त्यानें आपला लहान मोठा कोणताहि हुकूम राण्यानें फिरवूं नये अशी अट घातली.  या अटीवर राण्याकडून कारभार हातीं पडतांच त्यानें जामदारखाना उघडून त्यांतील जडजवाहिरादिकांच्या साहाय्यानें शिपायांचा पगार चुकता केला व दारुगोळ्याची उत्तम बेगमी करून ठेवली.  अशा रीतीनें सर्व प्रकारें तयारी झाल्यामुळें शहरांतील सैन्यानें सहा महिनेपर्यंत वेढा देऊन बसलेल्या लोकांस दाद दिली नाहीं.  तोतयाच्या पक्षानें उदेपूराबाहेर मेवाडच्या बर्‍याच भागावर अंमल बसविला होता तरी त्याच्याकडून शिंद्यास कबूल केलेली रक्कम पटविली जाण्याच्या रंग दिसेना. म्हणून मराठे उदेपूरपाशीं विनाकारण दिवस घालवित बसण्यापेक्षां सत्तर लाख रूपये घेऊन वेढा उठविण्यास व तोतयाचा पक्ष सोडण्यास तयार झाले.  परंतु तहावर सही होते न होते तोंच शहरांतील प्रतिकूळ परिस्थितीच्या बातम्या कानीं पडल्यामुळें शिंद्यानें आणखी वीस लाखांची मागणी केली.  हें पाहून अमरचंदाच्या तळव्याची आग मस्तकात गेली.  त्यानें लागलीच तहाच्या कागदाच्या चिंध्या करून त्या मराठ्यांकडे परत पाठविल्या, व सिंधी शिपायांपुढें हृदयस्पर्शीं भाषण करून व त्यांच्यामध्यें बक्षीसें वांटून त्यांचा पूर्णपणें पाठिंबा मिळविला.  एवढेंच करून तो थांबला नाहीं; त्यानें खास आपल्या मेहुण्याकडून उदाहरण घालून देऊन शहरातल्या सर्व पेवांतील धान्य बाजारांत आणविलें व अशी दवंडी पिटविली कीं कोणीहि शिपाई धान्य मागण्यास येतांच त्यास सहा महिन्यांची धान्यसामुग्री देण्यांत यावी.  जेथें पूर्वीं रुपायास अच्छेर पाऊण शेर धान्य मिळत होतें तेथें आतां धान्यच धान्य झालेले पाहून मराठे आश्चर्यचकित झाले, व त्यानंतर शहरांतील लोकांचा उत्साहहि वाढलेला दिसून आला तेव्हां त्यांनी आपण होऊनच तहाचें बोलणें लाविलें.  परंतु आतां अमरचंदानें ओढून धरलें, व 'तुम्ही मागील तह मोडल्यामुळें आम्हांस जेवढा खर्च लागला तेवढा आतां पूर्वींच्या रकमेंतून वजा झाला पाहिजे असें तो म्हणूं लागला.  अशा रीतीनें त्याने शिंद्याला केवळ ६३॥.  लक्ष रुपयांवरच समाधान मानून स्वस्थ बसावयास लाविलें.

खं ड णी सा ठीं मु लू ख ता र ण.— यांपैकीं ३३ लक्ष रुपये जडजवाहीर, चांदीसोन्याच्या वस्तू वगैरेच्या रूपानें ताबडतोबच शिंद्याच्या स्वाधीन करण्यांत आलें.  बाकीच्या रकमेकरितां जावद, जीरण, नीमच व मोरवण या महालांचा वसूल लावून देण्यांत आला व रक्कम फिटेपर्यंत त्या महालांत दोनहि सरकारकडून अधिकारी नेमण्यांत यावे असें ठरलें.  या कराराप्रमाणें सं. १८२५ (इ. स. १७६९) पासून सं. १८३१ (इ. स. १७७५) पर्यंत कोणी कोणाच्या हक्कांत दखल दिली नाहीं.  परंतु इ. स. १७७५ सालीं शिंदे मेवाडच्या अधिकार्‍यांना हांकून आपणच ते महाल अन्यायानें बळकावून बसला.  पुढें इ. स. १८१७ सालीं मेवाडचा इंग्रजांबरोबर तह झाला तेव्हां मेवाडच्या वकिलांनीं आमचे महाल शिंद्याकडून आम्हांस परत दिले जावे अशी अट घातली.  पण या मागील व्यवहाराची माहिती नसल्यामुळें ह्यणा किंवा इंग्रज त्यावेळीं शिंद्यास दुखवूं इच्छित नव्हते म्हणून ह्यणा हे महाल त्यावेळी देखील मेवाडच्या राण्यास परत मिळूं शकले नाहींत.

गो द वा ड प्रां ता ची ता टा तू ट.—  शिंद्यानें तोतयाचा पक्ष सोडतांच तीन मुख्य ठाकूर सोडून त्याच्या बाजूस असलेले बाकीचे सर्व ठाकूर एकामागून एक पुन्हां मेवाडच्या राण्याकडे आले; व कमलमीर खेरीज करून कबजांत असलेला मुलूखहि बहुतेक सर्व भराभर सोडविण्यांत आला.  गोदवाड प्रांत कमलमीराजवळ असल्यामुळें त्याचें उत्पन्न मात्र तोतयाच्या हातीं लागत होतें.  तसें तें लागूं नये म्हणून मेवाडच्या राण्यानें अखेरीस, जो मेवाडच्या राण्यांनीं जोधपूर वसविलें जाण्याच्या पूर्वीं मंदोडच्या प्रतिहारापासून जिंकून घेतला होता व ज्याची उत्तर सरहद्द कायम करण्याकरितां जोधाच्या कारकीर्दींत अनेक चोंडावतांचें रक्त खर्चीं पडलें होते तो सुपीक प्रांत, जोधपूरच्या विजयसिंह राजाच्या स्वाधीन केला.  या प्रांताच्या उत्पन्नांतून जोधपूरच्या राजानें मेवाडच्या राण्यास ३००० लढवय्ये लोक पुरवावे असा करार होता.  अशा रीतीनें नाड्या आंखडल्या जातांच राहिलेले तीन ठाकूरहि सं. १८३१ (इ.स. १७७५) मध्यें तोतयास सोडून राण्याकडे आले, व तोतयाच्या खुळाचा समूळ नायनाट झाला.

खू न.—  वि. सं. १८२८ (इ.स. १७७२) मध्यें अरसीसिंह अहेरियाच्या उत्सवानिमित्त बुंदीच्या राज्यांत शिकार खेळावयास गेला असतां त्याचा तेथें खून झाला.  अरसीसिंह व बुंदीचा राजपुत्र हे दोघे एका डुकराच्या मागें लागले असतां बुंदीच्या राजपुत्रानें एकएकीं अरसीसिंहाकडे वळून उरांत भाला खुपसून त्याचा प्राण घेतला.  कोणी म्हणतात बुंदीच्या व मेवाडच्या राजांत सरहद्दीबद्दल कांहीं तंटा होता म्हणून हा खून झाला.  या विश्वासघाताच्या कृत्याचा बुंदीचा राजा व सर्व हाडा लोक यांनीं तीव्र निषेधच केला आहे व स्वत: खुनी माणसासहि मागून आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला.  तेव्हां अरसीसिंहाच्या उद्दामपणाचा मेवाडच्या ठाकुरांस वीट आल्यानें त्यांनींच बुंदीच्या राजपुत्रास चिथवून आपल्या राण्याचा खून केला अशी जी दुसरी दंतकथा आहे तींत सत्यता असण्याचा संभव आहे.  अरसीसिंहास हंमीर व भीमसिंह असे दोन पुत्र होते  [ टॉडचें राजस्थान].

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .