विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरहर-नवरगांव — तहशील ब्रह्मपुरी; जिल्हा चांदा. ब्रह्मपुरीपासून दोन मैलांवर हें खेडें आहे. सुमारें ५० वर्षांपूर्वीं हा गांव हल्लींचे मालगुझार दाजी राघव यांनीं २००० रुपयांस (नागपुर नाणें) विकत घेतला. येथील लोक सुखी आहेत. महारलोक देखील कर्जाऊ पैसे देण्याचा धंदा करतात. येथें शाळा आहे. लोकवस्ती २२३१ (सन. १९०१).