प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अराजकता — प्राचीन काळापासून भरतखंडांत राजा व प्रजा यांमधील परस्परसंबंध विषयक तत्त्वें धर्मशास्त्रें पुराणें व नीतिग्रंथ प्रतिपादीत.  त्यांत विचारवैचित्र्य होतेंच.  पाश्चात्त्य देशांतील हॉब्स वगैरे राजकीय तत्त्ववेत्त्यांनीं प्रतिपादन केलेली राजा व प्रजा यांमधील कराराची कल्पना भारतांतील शांतिपर्वांत दिलेल्या मनूच्या गोष्टींत स्पष्टपणें व्यक्त होते.  प्राचीन काळीं यदाकदाचित् कोणताहि राजा जुलुमी निघाला तरी त्याचा जुलूम कायद्याच्या रूपानें नसल्यामुळें कांहीं थोड्याच व्यक्तीस तो बाधक होत असून एकंदर राष्ट्रास बाधक होत नसे.  त्यामुळें राजा जुलुमी असला तरी राजसत्तेखालीं असलेलें राज्य जेथें अराजकता माजली आहे अशा समाजापेक्षां नेहमीं अधिक बलवान् व सुखी असे.  अराजकतेपासून उत्पन्न होणारे परिणाम महाभारतांत उत्तम वर्णन केलेले आहेत.  "राजा धर्माचें मूळ आहे, अधर्मानें वागणार्‍या लोकांस शिक्षा करून तो ताळ्यावर आणतो, चंद्र सूर्य नसतील तर जग जसें अंधकारांत मग्न होईल, त्याप्रमाणें राजा नसल्यास लोक नाश पावतील.  दुष्ट लोक बलात्कारानें दुसर्‍याचें द्रव्य, स्त्री, पुत्र वगैरे सर्व हरण करूं लागतील व द्रव्यसंपन्न लोकांनां प्रत्यही बंधन व वध भोगावा लागेल.  कोणावरहि कोणाचा अधिकार चालणार नाहीं.  व राजा रक्षण करण्यास असला म्हणजे लोक गृहांचीं द्वारे उघडी टाकून सुद्धां निर्भयपणें झोंप घेतात इत्यादि." यामुळें प्रत्येक समाजाला शास्ता राजा असावा असा त्याकाळीं कटाक्ष होता; कारण :-

अथचेत् अभिवर्तेत राज्यार्थी बलवत्तरः ।
अराजकानि राष्ट्राणि हतवीर्याणि वा पुनः  ।
प्रत्युद्‍गम्याभिपूज्यंस्यात् एतदेव सुमंत्रितम् ।
नहि पापात्परतरं अस्ति किंचित् अराजकात् ।

अराजकापेक्षां परकीय राजाहि बरा, मग आपला जुलुमी राजा फारच बरा, अशी त्यावेळीं प्रवृत्ति होती.  अराजकाच्या भीतीनेंच प्राचीन काळीं हिंदुस्थानांत राजसत्ता फार बलवत्तर झाली असावी असें वाटतें.

अ रा ज क ते ची  ता त्त्वि क  मी मां सा. — लोकराज्य हें अराजकता नव्हे.  अराजकता म्हणजे सरकार या संस्थेचा अभाव.  नियंत्रणाशिवाय कोणताहि समाज शक्य नाहीं.  असें असतांहि "अराजकता" हें समाजशासन विषयक तत्त्व गेलीं शेंदीडशें वर्षें पुढें मांडले जात आहे.  अलीकडे समाजसत्तांवाद्यांनीं अराजकता या शब्दाला चांगला अर्थ देऊन, राजा किंवा कोणत्याहि प्रकारचें सरकार ज्यांत नाहीं अशा प्रकारचा समाज बनवून अशा समाजाचें जीवित व योगक्षेम कसा चालवावा या संबंधाचा एक नवा सिद्धान्त किंवा तत्त्व पुढे मांडिलें आहे.  अशा अराजक समाजांत शांतता व सुव्यवस्था कायद्यांच्या जोरावर किंवा अधिकार्‍यांच्या हुकमतीनें चालवावयाची नसून सर्व गोष्टी समाजांतील निरनिराळ्या स्थानिक व धंदेवाईक अशा लोकांची अर्थोत्पादन व व्यय हीं अर्थशास्त्रीय कार्यें चालण्याकरतां, तसेच अशा समाजांतील प्रत्येक सुंसस्कृत इसमाच्या निरनिराळ्या गरजा व आकांक्षा योग्य रीतीनें पुरविल्या जाण्याकरितां गरजांच्या व त्या पुरविणार्‍या वर्गांच्या अन्योन्याश्रयावर किंवा निरनिराळे वर्ग किंवा संघ बनवून त्यांनीं एकमेकांशीं स्वतंत्र केलेल्या करारमदारांच्या आधारावर सर्व व्यवहार एकोप्यानें व सलोख्यानें चालवावयाचे असतात.  अशा ऐच्छिक रीतीनें बनविलेले संघ मानवी समाजांतील सर्व कार्यक्षेत्रें हातीं घेऊन कार्यकर्ते बनल्यावर स्वत:चें कार्यक्षेत्र अधिक विस्तृत करून हल्लीं सरकारमार्फत जीं कार्यें होत असतात तींहि प्रत्येक संघ आपआपली करूं लागेल.  अशा रीतीनें सर्व कार्यांकरतां लहान मोठे व कमी अधिक चिरस्थायी असे स्थानिक, प्रांतिक, राष्ट्रीय व सार्वराष्ट्रीय वर्ग (ग्रूप्स्) व संघ (फ्रेडरेशन्स्) तयार होऊन त्यांचें एक मोठें जाळें बनेल.  अर्थोत्पादन, विनिमय, व्यय, परस्पर दळणवळण, आरोग्य विषयक सोयी, शिक्षण, आत्मसंरक्षण व देशसंरक्षण वगैरे सर्व कामें असे संघ स्वत:चीं स्वत:च करण्यास समर्थ होतील, इतकेंच नव्हे तर शास्त्रीय संशोधन, कलाकौशल्य, वाङ्‌मयात्मक कार्य, व इतर सर्व समाजाला आवश्यक असलेलीं कार्ये असले संघ बिनबोभाट पार पाडतील.  शिवाय महत्त्वाची गोष्ट अशी कीं, वज्रालेप, कालत्रयीहि न बदलणारी अशी कोणतीहि गोष्ट, व्यवस्था किंवा नियम असावयाचा नाहीं.  वाटेल त्या बाबतींत वाटेल तेव्हां फरबदल करण्याची मोकळीक असणार, उलटपक्षीं सर्व सेंद्रिय सृष्टीमध्यें दिसून येतें त्याप्रमाणें, सर्व कार्यशक्ति व कार्यप्रेरक यांमध्यें समतोलपणा सतत घडून येणार्‍या स्थित्यंतरामुळें अधिक सुलभपणें राखला जाईल, कारण पक्षपातानें कोणाला अडथळा करणारें किंवा कोणाचें अधिक संरक्षण करणारें असें सरकार म्हणून अस्तित्वांतच ठेवावयाचें नाहीं.

या तत्त्वाच्या पुरस्कर्त्यांचें असें म्हणणें आहे कीं, जर समाजाची रचना उपर्युक्त तत्त्वांनुसार केली तर कोणत्याहि माणसाची उत्पादक शक्ति भांडवलवाल्यांच्या हुकमतीमुळें नियंत्रित होण्याचें मुळींच कारण उरणार नाहीं.  भांडवलवाल्यांनां सरकार पाठीराखें असतें, पण सरकारच नष्ट झाल्यामुळें भांडवलवालेहि जिवंत राहणार नाहींत.  उपरितत्त्वनिबद्ध समाजांत कोणाहि व्यक्तीच्या ऐच्छिक व्यापारावर शिक्षेच्या भीतीचें दडपण उरणार नाहीं, किंवा कोणत्याहि अधिकारी इसमाचा अगर अतींद्रिय विभूतींचाहि (मेटॅफिजिकल एंटिटिज) सत्ताधिकार कोणावर चालावयाचा नाहीं; व त्यामुळें कोणालाहि उत्साहभंग व मानसिक गुलामगिरीचा त्रास होण्याचें कारण नाहीं.  प्रत्येक व्यक्ति आपल्या समजुतीप्रमाणें कार्यें करीत राहील, व त्याची समजूत किंवा सदसद्विवेक बुद्धि स्वत:च्या व भोंवतालच्या परिस्थितीमुळें बनलेल्या नैतिक कल्पनांच्या आघातप्रत्याघातानें बनत जाईल.  यामुळें प्रत्येक माणसामधील बौद्धिक, नैतिक, कलाविषयक शक्ति कसल्याहि प्रकारचा अडथळा सरकारकडून किंवा भांडवलवाल्याकडून न होतां पूर्ण वाढ पावूं शकतील.

अराजकसमाजवादी (अनार्किस्ट) यांनीं सुचविलेली उपरिनिर्दिष्ट समाजव्यवस्था सर थॉमस मूर या इंग्रज लेखकाच्या यूरोपिया नामक पुस्तकांतील योजनेप्रमाणें अव्यवहार्य नाहीं.  तसेंच कांहीं थोडक्याशा गृहीत प्रेमयांपासून काढलेलें केवळ तर्कप्रधान अनुमान नाहीं, अशी त्यांची खात्री आहे.  सदरहू योजना प्रस्तुत समाजांत अस्तित्त्वांत असलेल्या प्रवृत्तींवरूनच ठरविलेली आहे.  समाजसत्तावादाचा पुरस्कार करणारे सुधारणावादी आज कित्येक असले तरी त्यांचें हें मत चिरकाल टिकणारें नाहीं.  जीवनाला लागणार्‍या आवश्यक वस्तूंचां सुलभपणें भरपूर पुरवठा करणारी आधुनिक यंत्रसामुग्री, स्वातंत्र्याच्या भावनेची मानवसमाजांतील वाढ, सर्व प्रकारच्या कार्यक्षेत्रांतील कार्यकर्त्यांमध्यें दिसून येणारी स्वयंप्रेरणा व स्वतंत्र विचार, फार काय पण धार्मिकसंस्था व राजकीयसंस्था यांमध्येंहि अधिकाधिक फैलावत असलेलें स्वातंत्र्याचें वारें, या सर्व गोष्टींनीं अराजक समाजरचनेला अनुकूल अशी परिस्थिति हळू हळू पण निःसंशयपणें तयार होत चाललेली आहे.

अराजकसमाजवादी (अनार्किस्ट्स) हें एकंदर समाजसत्तावादी (सोसिआलिस्टस) पक्षाचें डाव्या बाजूचें म्हणजे अल्पसंख्याक अतएव कमकुवत असें अंग होतें.  या सर्वांचीं अर्थशास्त्रीय मतें अर्थात् सारखींच आहेत.  उदाहरणार्थ, दोघांच्याहि मतानें जमीनीची खासगी मालकी, व खासगी भांडवलाच्या जोरावर कारखाने चालवून जबर नफा मिळविण्याची परवानगी हीं दोन्हीं तत्त्वें न्यायीपणाच्या व उपयुक्ततेच्या दृष्टींनीं घातक आहेत.  अलीकडील यांत्रिक सामुग्रीच्या साहाय्यानें आखिल समाजाचें जीवित पूर्ण सुखमय करण्याच्या मार्गांत हे दोन मोठे अडथळे आहेत.  पण अराजक समाजसत्तावाद्यांचें असेंहि म्हणणें आहे कीं, खाजगी जमीनदारी व खाजगी भांडवल पद्धति या दोहोंचें संरक्षण करून त्यांनां वर्षानुवर्ष जबर नफा मारण्यास सवलत देणारें मूळ सरकार होय; आणि म्हणूनच खाजगी जमीनदारी व खाजगी भांडवलपद्धति यांचें उच्चाटन करण्याच्या प्रयत्‍नांबरोबरच सरकार ही संस्थाहि अजिबात नष्ट करण्याचे प्रयत्‍न केले पाहिजेत.  सरकार, मग तें राजसत्ताक असो किंवा लोकसत्ताक असो, हेंच सर्व अनर्थांचें मूळ आहे.  सबब तेंच सर्वस्वीं नाहींसें झालें पाहिजे.  [समाजसत्तावाद पहा.]

प्राचीन काळचा इतिहास पहा, किंवा अर्वाचीन काळचा पहा, मॅसिडोनियाचें साम्राज्य, रोमचें साम्राज्य, किंवा यूरोपातील राज्यें यापैकीं कोणतेहि सरकार पाहिलें तरी तें थोडक्याशा अधिकार नियुक्त इसमांचें बनलेलें असून त्यांच्या हातांत सर्व सत्ता एकवटलेली असते, व त्यांतील अल्पसंख्याक व्यक्तीच सत्तालोलुप असल्यामुळें जमीनदार, भांडवलवाले इत्यादि इतर हक्कदार अल्पसंख्याकांचा नाश करण्याचें काम सरकार नामक संस्थेच्या हातून होणें शक्य नाहीं; तसेंच सरकार नामक या संस्थेंतील अधिकाराधिष्ठित व्यक्तीहि आपल्या हातांतील हक्क व सत्ता सोडण्यास तयार होणार नाहींत.  म्हणून भांडवलवाले, जमीनदार इत्यादि हक्कदार वर्ग नष्ट करून त्यांच्या जमिनी, खाणी, रेल्वे, बँका, औद्योगिक संस्था सरकारच्या हातीं देऊन अगोदरच अनेक बाबतींतील शिक्षण धर्मखाते, देशसंरक्षक लष्करी खातें इत्यादि सरकारच्या हातीं असलेल्या सत्तेंत भर घालणें म्हणजे लोकांवर जुलूम करण्याचें आणखी एक नवें यंत्रच तयार करण्याप्रमाणें आहे.  सरकारी भांडवलव्यवस्था अमलांत आणणें म्हणजे नोकरशाही व भांडवलवाले या दोघांची सत्ता एकत्र करून सरकारच्या सत्तेत अधिकाधिक भर घालून ती प्रजेला अधिकाधिक जाचक करण्यासारखें आहे.  वास्तविक खरी सुधारणा सत्ता एकत्रित करण्यानें होणारी नसून आधिकाधिक अधिकारविभागणी केल्यानें, स्थानविषयक व कार्य विषयक वांटणी करून अनेकांच्या हाती सत्ता दिल्यानें, प्रत्येक व्यक्तीला आधिकाधिक कार्यस्वातंत्र्य व स्वयंप्रेरणेला वाव दिल्यानें घडून येणार आहे.

बहुतेक समाजसत्तावाद्यांप्रमाणें अराजकसमाजवाद्यांनांहि ही गोष्ट मान्य आहे कीं, सृष्टींतील विकाससिद्धान्ताच्या कार्याप्रमाणेंच समाजांतहि नेहमीं विकसनकार्य हळू हळू चालू असतें, आणि मधून मधून मात्र क्रांतिकारक स्वरूपाच्या घडामोडी होऊन सुधारणेच्या कार्यांत एकदम मोठी भर पडत असते.  अशा प्रकारच्या क्रांतिकारक गोष्टी घडण्याचा काल आतां उरलेला नाहीं असें त्यांनां वाटत नाहीं.  मंदगतिक सुधारणेच्या कालामागून एकदम अतिवेगानें सुधारणा होण्याचे दिवस उगवणें अद्याप शक्य आहे, व अशा संधीचा फायदा घेणें सर्व सुधारणावाद्यांचें कर्तव्यच आहे.  पण अशा संधीचा उपयोग सरकार नामक संस्थेची सत्ता अधिकाधिक वाढविण्याकडे न करतां ती कमी करण्याकडे केला पाहिजे; व त्याकरतां गांवानिहाय व प्रांतानिहाय कामकरी व संसारी लोकांचे संघ बनवून त्यांच्याकडे सर्व गोष्टी व सत्ता विभागून दिली पाहिजे.  अशा प्रकारचे संघ सर्व राष्ट्रांत व नंतर जगातील एकंदर राष्ट्रांत तयार केले पाहिजेत.

अराजक समाजवाद्यांची मतें अशा प्रकारचीं असल्यामुळें प्रस्तुत अस्तित्वांत असलेल्या सरकार नामक संस्थेच्या कार्यांत भाग घेण्याचा किंवा तिच्या सत्तेंत अधिकाधिक भर घालण्याचा प्रयत्‍न करणें त्यांनां पसंत नाहीं.  म्हणून पार्लमेंटसारख्या राज्यकारभारी संस्थेंत शिरून तेथें मजूरपक्षाचें प्राबल्य प्रस्थापित करण्याचा मार्ग ते आक्रमित नाहींत; किंवा मजूरवर्गास तसें करण्याचा उपदेश करीत नाहींत.  सार्वराष्ट्रीय कामकरी वर्गाची परिषद (इंटरनॅशनल वर्किग मेन्स असोसिएशन) १८६४-६६ स्थापन झाल्यापासून अराजक समाजवाद्यांनीं आपलीं मतें प्रत्यक्ष मजुरवर्गापुढे मांडण्याचा व मजुरांचे वर वर्णिलेल्या प्रकारचे संघ बनवून भांडवलवाल्यांचा नायनाट करण्याचा उद्योग सुरू केला आहे.  पार्लमेंटसारख्या कायदेमंडळामार्फत कायदे करवून सुधारणा घडवून आणण्याच्या सनदशीर म्हणून गणला गेलेल्या मार्गावर त्यांचा विश्वासच नाहीं.

अ रा ज क स मा ज वा दी पं था च्या वा ढी चा इ ति हा स. — वर वर्णिलेल्या प्रकारचे सामाजिक संघ स्थापण्याची कल्पना व सरकार नामक राज्यकारभारकर्त्या संस्थेच्या मार्फत समाजाचें शासन करण्याची कल्पना या दोन्ही मानवजातीच्या मनांत पुरातनकाळापासून अस्तित्वांत आहेत; आणि ऐतिहासिक काळांत कधी पहिलीचें तर कधीं दुसरीचें अधिक प्राबल्य वाढल्याचें दिसून येतें.  पहिल्या प्रकारच्या प्रवृत्तीमुळें हळूहळू कुळ, गोत्र, ग्राम, जाति, संघ व नगर असे समुदाय लोकांनी स्वत:च बनविले, व त्याच्या बळावर परचक्रापासून व सत्ताधीशांच्या जुलमी वर्तनापासून स्वतःचें संरक्षण करण्याचा मार्ग काढला.  ग्रीसमध्यें इ. स. पू. ४३० च्या सुमारास होऊन गेलेल्या अ‍ॅरिस्टिप्पस या सीरेनाईक पंथाच्या एका उत्पादकानें असें प्रतिपादन करण्यास सुरवात केली होती कीं, शहाण्या लोकांनीं आपलें स्वातंत्र्य गमावून सरकारचें नियंत्रण पत्करतां कामा नये; व साक्रेटीसच्या प्रश्नास उत्तर म्हणून त्यानें असें सांगितलें होतें कीं, तो स्वतः शास्ते किंवा शासित यापैकीं कोणत्याच वर्गांत मोडत नाहीं.  तथापि अ‍ॅरिस्टिप्पसची ही प्रवृत्ति केवळ एपिक्यूरियन पंथाच्या अनुयायांनीं सामान्य जनसमूहाबरोबर ठेवलेल्या बेजबाबदार वर्तनाचा परिणाम होय.  ग्रीसमधील अराजकसमाजवादी तत्त्वज्ञानाचा सर्वांत महत्त्वाचा पुरस्कर्ता क्रीटचा रहिवाशी व स्टोईक तत्त्वज्ञानाचा आद्यजनक झेनो हा होय.  प्लेटोने 'रिपब्लिक' ग्रंथांत जी राज्यकारभारपद्धति आदर्शभूत म्हणून पुढें मांडली तिला विरोध करून झेनोनें सरकाररहित अशा समाजरचनेविषयींची स्वतःची योजना पुढें मांडली.  सरकारच्या नियंत्रणाऐवजीं प्रत्येक व्यक्तीवर स्वतःचें, नैतिक नियमांचें, नियंत्रण असावें, प्रत्येक व्यक्तीमध्यें स्वार्थबुद्धीबरोबर सहवासप्रियताहि नैसर्गिकच असल्यामुळें व्यक्तीची स्वयंनिर्मित नैतिक बंधनें केवळ स्वसंरक्षक न बनतां परार्थपोषकहि आपोआप बनतील.  याप्रमाणें स्वतःच्या नैसर्गिक प्रेरणांप्रमाणें वागण्याची बुद्धि उत्पन्न झाल्याबरोबर ते सरकारी अमलाची सरहद्द सोडून पलीकडे स्वतंत्र संघ बनवून राहूं लागतील.  अशा वसाहतींत त्यांनां न्यायकोर्ट, पोलीस, देवालयें, सार्वजनिक प्रार्थना, किंवा पैसानाणीं वगैरे गोष्टींची मुळींच जरूरी लागणार नाहीं.  पैशाच्या ऐवजीं सर्व देवघेव केवळ देणग्यांच्या स्वरूपानें परस्परांत चालू राहील.  झेनोचे स्वतःचे ग्रंथ आज उपलब्ध नाहींत, इतरांच्या ग्रंथांतून त्याच्या लेखनांतील उतारे म्हणून दिलेले आहेत.  तथापि तेवढ्यावरून झेनोची व तत्कालीन लोकसमाजाची एदद्विषयक प्रवृत्ति स्पष्टपणें निदर्शनास येते.

मध्ययुगांत ९ व्या शतकाच्या सुमारास अनाबाप्टिस्ट लोकांपैकी जोहन्स डेन्क याच्या हुसाईटस पैकीं चोजेकी याच्या आणि आल्बाचा बिशप मार्को गिरोलॅमो व्हिडा याच्या ग्रंथांत वर वर्णन केलेल्या प्रकारचींच मतें आढळतात.

रू सो, डि डो रो, गॉ ड वि न, व प्रू ढाँ यां ची अ रा ज क ता. — अठराव्या शतकांत फ्रेंच एन्सायक्लोपीडियाच्या कर्त्यांच्या डोक्यांत अशाच कल्पना खेळत होत्या ही गोष्ट रूसो व डिडेरॉट यांच्या स्वतंत्र ग्रंथांतील मजकुरावरून सहज सिद्ध होते.  याच कल्पना पुढें फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळीं उघडपणें लोकांपुढें मांडल्या गेल्या.  त्या वेळीं एका बाजूला जॅकोविन लोक सर्व राजकीय सत्ता स्वतःच्या हातीं घेण्याकरता प्रयत्‍न करीत होते; व उलट पक्षीं प्रत्येक प्रांतांतले लोक आपापले संघ बनवून न्यायखातें, लष्करखातें, दानधर्मखाते वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्था स्वतःचे हातीं घेण्याचा उद्योग करीत होते, व अशा सुमारें ३६००० संघांमध्यें एकमेकांत पत्रव्यवहारहि सुरू झाला होता.

अराजकसमाजरचनेसंबंधाच्या राजकीय व अर्थशास्त्रीय कल्पना गॉडविननें १७९३ च्या सुमारास प्रथम व्यवस्थित पणें आपल्या ग्रंथाच्या द्वारें पुढे मांडल्या.  त्यांत तो म्हणतो कीं, पूर्वींचे कायदे हे आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाचे निदर्शक नसून ते त्यांनीं भित्रेपणा, मत्सर, महत्त्वाकांक्षा इत्यादि मनोविकारांनीं प्रेरित होऊन केलेले आहेत.  कायदे व न्यायकोर्टें सर्व रद्द करून त्याऐवजी सर्व भांडणतंटे निकालाकरतां चांगल्या विचारी माणसांकडे सोंपविल्यास योग्य न्याय तात्काळ मिळूं लागण्यास सुरवात होईल.  सरकार समूळ नष्ट करावे; सरकार नामक संस्थेवांचून समाज उत्तम स्थितींत खास राहूं शकेल; समाजाचे लहान लहान व स्वयंशासित असे संघ बनवावे; मालमत्तेच्या बाबतींत खाजगी मालकी नष्ट करून समाईक मालकीचें तत्त्व सुरू करावें; अशा प्रकारचीं गॉडविनचीं मतें होतीं.  परंतु त्यानें आपल्या राजकीय न्यायान्याय ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तींत मात्र हीं मतें भीतीमुळें स्पष्टपणें पुढें मांडली नव्हतीं.

पुढें १८४० मध्यें प्रूढाँने प्रथम अराजकसमाज हें प्रत्यक्ष नांव देऊन आपले विचार पुढें मांडण्यास सुरवात केली.  फ्रेंच राजक्रांतीच्या वेळीं १७ व्या लुईला राज्यावरून काढून टाकण्यानेंच केवळ ज्याचें समाधान होत नव्हतें अशा पक्षास जिराँडिस्ट नामक पक्षानें 'अराजक' (अनार्किस्ट) असें निंदाव्यंजक नांव देण्यास सुरवात केलीच होती.  प्रूढाँनें सरकारविरहित असा समाज कसा बनवावा त्यासंबंधाच्या कल्पना उघडपणें पुढें मांडल्या.  'मालमत्ता म्हणजे चोरी' या सूत्रापासून आरंभ करतांच लोकांचें लक्ष त्याच्या मतांकडे वेधलें.  तथापि समाईक मालकीच्या तत्त्वाचा तो पुरस्कर्ता नव्हता, तसेंच सर्व जमीनदार, काखानदार, खाणीवाले, वगैरे धनिकांची मालमत्ता एकदम हरण करावी अशा मताचाहि तो नव्हता.  त्यानें सुचविलेला मुख्य उपाय म्हणजे सावकारी व व्याजबट्टा हा खाजगी धंदा बंद करणें व भांडवल पुरविणारी एक राष्ट्रीय बँक स्थापणें हा होय.  नागरिकांनीं सर्व व्यवहार आपसांत व बँकेच्या आर्थिक मदतीनें चालवावयाचे व तंटाभांडण मध्यस्थांनीं मिटवावयाचें; अशी सर्व संघात व्यवस्था झाल्यावर सरकारची जरूर उरतच नाहीं, असें त्याचें म्हणणें होतें.  निरनिराळ्या प्रकारच्या राज्यकारभारपद्धतीवर बारकाईनें केलेली टीका, व सर्व आर्थिक प्रश्नांचें सूक्ष्मज्ञान हे महत्त्वाचे गुण प्रूढाँच्या ग्रंथांत दिसून येतात.  प्रूढाँच्या मताचे लोक त्याच्या पूर्वींच, इंग्लंडांत वुल्यम थॉम्पसन व त्याचा अनुयायी जॉन ग्रे आणि अमेरिकेंत जोशिया वॉरेन, हे होऊन गेले होते.  इंग्लंडात ओवेननें अशा संघाचा प्रत्यक्ष प्रयोगहि केला होता.  पण तो फसण्याचें कारण वैयक्तिक स्वातंत्र्याचा अभाव हें होतें, असें प्रूढाँने ठरवून वैयक्तिक स्वातंत्र्याचा पूर्णपणें पुरस्कार चालविला व स्वतः "इक्विटी स्टोअर" (न्याय्य किंमतीच्या वस्तूंचें दुकान) काढलें.  "इक्विटी व्हिलेज" व "इक्विटी हाऊस" अशा नांवाच्या दोन संस्थाहि अमेरिकेंत न्यू यॉर्क व बोस्टन येथें अनुक्रमें निघाल्या.

प्रूढाँच्या अर्थशास्त्रविषयक व विशेषतः सहकारी पेढ्या (म्यूचुअलबँकिंग) संबंधाच्या सूचना लवकरच मान्य होऊन त्या प्रत्यक्ष अमलांतहि येऊं लागल्या; परंतु त्याच्या अराजकविषयक मतांनां प्रत्यक्ष फ्रान्समध्येंहि फारसे अनुयायी मिळाले नाहींत.  फ्रान्समध्यें फोरियर व सेंट सायमन या समाजसत्तावाद्यांच्या मतांचें अगोदरच बरेंच प्रस्थ वाढलेले होतें.  प्रूढाँच्या मतांना जर्मनींत मात्र पुरस्कर्ते मिळून मोझेस हेस यानें १८४३ मध्यें, आणि कार्ल ग्रुन यानें १८४५ मध्यें अराजक समाजविषयक मतें प्रतिपादन करण्यास सुरूवातहि केली.  नंतर स्टर्नरनें सरकारविरुद्ध व समाईक समाजसत्ताकपद्धति विरुद्धहि उघडपणें बंडखोरपणाची भाषा वापरण्यास सुरूवात केली, इतकेंच नव्हे तर कोणत्याहि प्रकारचीं सामाजिक व नैतिक बंधनें व्यक्तीवर असूं नयेत, व्यक्तिमात्राला पूर्ण सत्ता व स्वातंत्र्य असावें, असें प्रतिपादन त्यानें सुरू केले.  अशा तर्‍हेच्या वैयक्तिक स्वातंत्र्ययुक्त अराजक समाजाचें पर्यवसान कसें व्हावयाचे तें स्टर्नरनंतर प्रो. बॉश यानें आपल्या ग्रंथात दाखवून दिलें.  प्रो. बॉशचें म्हणणें आहे कीं, उच्च संस्कृतीचा उद्देश मनुष्यजातींतील सर्व व्यक्तींची उन्नति होण्याकरिता सर्व साधारण मार्ग व साधनें उपलब्ध करून देणें हा न ठेवता जन्मतः उच्चगुणसंपन्न अशा कांहीं विशिष्ट व्यक्तींची पूर्णपणें वाढ होण्याकरितां इतर सामान्य व्यक्तींच्या सुखसोई व जरूर तर अस्तित्व यांची पर्वा न करताहि सोय करून देणें, हा असला पाहिजे.  याप्रमाणें व्यक्तिस्वामित्वपद्धति (इंडिव्हिजयुआलिटी) च अखेर प्रस्थापित होणें इष्ट असून आजपर्यंतची मानवजातीची सुधारणा उच्चगुणयुक्त अशा थोड्याशा व्यक्तींच्या हातूनच होत आलेली आहे.  बॉश प्रभृति विद्वानांचा व्यक्तिस्वामित्ववाद इतक्या थराला गेलेला आहे कीं, वैयक्तिक सुधारणा पूर्णत्वानें पोहोंचविण्याचें ध्येय साधणें कधींहि शक्य नाहीं, कारण इतर सामान्य जनसमाजाकडून सदरहू ध्येयाला अडथळा करणारी त्रासदायक, जुलमी अशी परिस्थिति असते, असें त्यांचें मत आहे.  त्यामुळें 'सकलगुणालंकृत' असा उच्च शिष्ट वर्ग कधींच तयार होणें शक्य नाहीं, तरी सामान्य वर्ग व उच्च वर्ग यांच्यामध्यें नेहमींच मोठें अंतर कायम राहणार यांत शंका नाहीं.  सदरहू विचारसरणींतील वैयक्तिक उत्कर्षाच्या पूर्णत्वाची कल्पना पटण्यासारखी व उपयुक्त असली तरी या पंथाला कांहीं थोड्याशा विद्वान व कलावान् वर्गाखेरीज इतर कोणीच अनुयायी मिळालेले नाहींत.

सा र्व  रा ष्ट्री य  म जू र  प रि ष दे चें  अ रा ज क  पं थ  वि ष य क  म त. — १८४० मध्यें फ्रान्समध्यें रिपब्लिक लयाला जाऊन पुन्हां बादशाही सत्ता सुरू झाली.  त्यानंतर कांहीं काल समाजसत्तावाद्यांपैकी निरनिराळ्या सर्व पोटवर्गांचे मतप्रचारात्मक कार्य बरेंचसें शिथिल झाले; कारण बादशाही सरकारनें समाजसत्तावादी पंथाच्या सर्व छापखान्यांची मुस्कटदाबी केली तो पुढें सुमारें वीस वर्षें तशीच कायम होती.  तथापि या काळांतहि अराजक पंथाचीसुद्धां थोडीशी प्रगति झाली.  १८६४ पासून समाजसत्ताक पंथाची चळवळ पुन्हां सुरू झाली.  त्या साली लंडन येथें युनिव्हर्सल एक्झिबिशनच्या निमित्तानें आलेल्या फ्रेंच कामकरी वर्गापैकीं (हें सर्व अन्योन्यसाहाय्यवादी होते) कित्येक इसमांनीं रॉबर्ट ओवेन पंथी इंग्रजांच्या मदतीनें सार्वराष्ट्रीय मजूर परिषद स्थापन केली.  या परिषदेची फार झपाट्यानें वाढ होऊन तिनें राजकीय पार्लमेंटातील सत्ता हातीं घेण्याच्या मार्गाचा अवलंब न करतां एकदम परस्पर भांडवलवाल्यांशीं अर्थशास्त्रीय तत्त्वानुसार भांडण सुरू केलें; व हें धोरण १८७१ पर्यंत तसेंच चालू ठेवलें.  फ्रँको-जर्मन युद्धानंतर सार्वराष्ट्रीय परिषदेच्या कार्याला फ्रान्समध्यें बंदी करण्यांत आली, त्या वेळीं जर्मनींत सर्वपुरुषमतदानाचा हक्क मिळालेला असल्यामुळें जर्मन कामकरी वर्गानें जर्मन साम्राज्याच्या पार्लमेंटच्या निवडणुकींत भाग घेण्याच्या उद्देशानें परिषदेचें वरील धोरण बदलण्याचा आग्रह धरला व आपला सोशल डेमोक्रॅटिक नांवाचा निराळा राजकीय पक्ष स्थापन केला.  यामुळें सार्वराष्ट्रीय मजूरपरिषदेमध्यें  फाटाफूट होऊन स्पॅनिश, इटालियन, बेल्जियन अशा निरनिराळ्या कामकरी संस्था स्थापन होऊन त्यांनीं आपला एक संघ (फेडरल यूनियन) बनवला.  या संघामधूनच "आधुनिक अराजक समाज पंथ" वाढ पावला.  या संघाचा बाकुनिन हा पुढारी बनला व त्यानें अनेक लेख, पत्रें व पुस्तकें लिहून अराजक तत्त्वांची वाढ केली.  सरकार (स्टेट) ही संस्था समूळ नष्ट झाली पाहिजे; कारण, ती लोकांच्या धार्मिक समजुतींच्या पायावर उभारलेली असून सुधारणेच्या खालच्या पायरीची निदर्शक असते; तिच्यामुळें स्वातंत्र्य नष्ट होतें, असें त्यानें प्रतिपादन केलें.  सार्वत्रिकमतदानपद्धतीनें केलेले कायदे सुद्धां अमान्य ठरवून प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक प्रांतिक संघाला पूर्ण स्वातंत्र्य असावें असें तो म्हणे.  अर्थोदत्पनाची सर्व साधनें कामकरी संघाच्या मालकीचीं असावीं, व तयार झालेल्या वस्तू प्रत्येक संघानें आपापले नियम ठरवून त्याप्रमाणें वाटून घ्याव्या अशीं बाकुनिनचीं अर्थशास्त्रीय मतें होती.

पुढील कित्येक वर्षें उपर्युक्त स्पॅनिश, इटालियन, इत्यादि कामकरी संस्था, सार्व-राष्ट्रीय-मजूर-परिषदेच्या कांहीं शाखा, व जर्मन आणि अमेरिकन अराजक मंडळ्या याच अराजक पंथाच्या मुख्य व कार्यकारी संस्था होत्या.  त्यांनीं राजकीय सत्ता हातीं घेण्याची बिलकुल खटपट न करतां कामकरी वर्गांचीच दृढ मैत्री वाढवून संपाच्या द्वारें देशांत आपले महत्त्व वाढविण्याचा मार्ग अवलंबिला.  कामाचे तास दररोज आठच असावे, वगैरे हक्काकरतां, व सैन्यांतील शिपायांचीं मनें लष्करी नोकरीपासून परावृत्त करण्याकरतां त्यांनीं चळवळी चालविल्या.  त्यामुळें बर्‍याचशा यूरोपीय देशांत व युनैटेड स्टेट्समध्यें या पंथाच्या पुढार्‍यांवर खटले होऊन त्यांनां शिक्षा झाल्या.  त्यामुळें कामकरीवर्गांनीं अधिकाधिक अत्याचार केले व त्यामुळें खटले, दंड, शिक्षा यांचें प्रमाण वाढलें, व त्याचा सूड म्हणून अधिकारी लोकांवर अधिकाधिक अत्याचार होऊं लागले.  त्यामुळें अत्याचार हेंच अराजकपंथाचें मुख्य कार्य असा सार्वत्रिक समज लोकांत पसरूं लागला.  अर्थात् या पंथाच्या प्रवर्तकांनीं सदरहू आरोपाचें निराकरण सुरू केले, व सरकारी दडपशाहीचा अत्याचार हा केवळ नैसर्गिक परिणाम आहे त्याचा अराजक पंथाच्या मूळ तत्त्वाशीं व धोरणाशीं कांहीं एक संबंध नाहीं, असें प्रतिपादन चालविलें.

यापुढें अराजक पंथाची वाढ कांहीं फ्रेंच त्तत्त्ववेत्ता प्रूढाँ याच्या तत्त्वानुसार, कांहीं ख्रिश्चन-अनार्किझम या लिओ टॉलस्टॉयच्या मतांच्या द्वारें, कांहीं अंशीं अराजक लेखकांच्या द्वारें, व मुख्यतः कम्यूनिस्ट-अनार्किझमच्या द्वारें चालू राहिली.  प्रूढाँची परस्परसहाय्यक बँकांची कल्पना युनैटेड स्टेट्समध्यें फार अमलात आली.  व्यक्तिस्वामित्ववादी अराजक पंथाचा प्रसार अमेरिकेंत बेंजामिन आर. टकर या नांवांच्या विद्वानानें आपल्या लिबर्टी नामक पत्राच्या द्वारें फार केला.  त्यानें प्रूढाँन व हर्बर्ट स्पेन्सर या दोघांच्या मतांचा एकत्रिक रीतीनें अवलंब केला.  व्यक्तिस्वामित्व, समान स्वातंत्र्य, व पूर्ण समता या तिन्ही तत्त्वाचा पुरस्कार करून व्यक्तिशः मनुष्य स्वार्थी असला तरी सर्वजण आपल्या हक्कांनां जपूं लागले म्हणजे सर्व व्यवस्था न्याय्य व कायदेशीर अशीच होईल असें प्रूढाप्रमाणें त्याचें मत होतें.  शिवाय स्पेन्सरच्या स्वसंरक्षणाच्या हक्काचा पुरस्कार करून तो असें प्रतिपादूं लागला कीं, एकाद्यानें हक्काचें अतिक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार करण्याचा संरक्षक हक्क प्रत्येकास आहे.  म्हणून प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक संघाला आत्मसंरक्षण करण्याकरतां अपराध्याला देहांत प्रायश्चितापर्यंत योग्य ती शीक्षा करण्याचा हक्क आहे.  तसेंच केलेले करार पाळण्याचे भाग पाडण्याकरतांहि अत्याचार करण्याचा हक्क आहे.  याप्रमाणें संरक्षणाच्या कार्याकरतां म्हणून कोणत्याहि राजसत्तेला असलेले सर्व अधिकार नूतन समाजरचनेंतहि असावे, असा बी. आर. टकरच्या मतांचा निष्कर्ष निघतो.

व्यक्तिस्वामित्ववादी अराजक पंथाच्या प्रूढाँमती अनुयायांनां अमेरिकेतील मजूरवर्गांत फारशी सहनुभूति मिळत नाहीं.  व्यक्तिस्वामित्ववादाचा अंगीकार केल्यानें ही स्थिति केवळ व्यक्तिश: प्रयत्‍नानें साध्य होण्यासारखी नसल्यामुळे त्यांनां अराजकसमाजवादी पंथांतून फुटून निघून अभिमत अर्थशास्त्रपंथी उदारमतवाद्यांच्या गोटांत शिरावे लागतें, किंवा इपिक्युरियन पंथाची नैतिकबंधनशून्य समाजस्थिति पत्करावी लागते, किंवा स्टर्नर व निन्झचे यांचा श्रेष्ठ-मानव कोटी विषयक 'सुपरमॅनथिअरी' सिद्धांत तरी मान्य करावा लागतो.  त्यामुळे अराजक पंथातले बरेचसे लोक अनार्किस्टकम्युनिस्ट मतवादी बनले आहेत.  यांत फ्रान्समधील एलिसी रेक्लूस, जीन ग्रेव्ह, सेबास्टियन फार, एमिली फौजेट यांचा, इटालीमधील एनरिको मॅलाटेस्टा व कॉव्हेली यांचा, स्पेनमधील आर. मेला, एल. लॉरेंझो वगैरेंचा समावेश होतो.  याशिवाय अराजक पंथाची दुसरी शाखा सिंडिकॅलिस्ट पंथ (पहा) नांवानें यूरोपांत आलीकडे महत्त्वास चढली असून राजकीय सत्ता हातीं न घेतां परस्पर भांडवलवाल्यांशीं प्रत्यक्ष सामना त्यांनीं सुरू केला आहे.

अनार्किस्ट – कम्युनिस्ट पंथाच्या विद्वान अनुयायांनी पुढील उपयुक्त गोष्टी करण्याचा प्रयत्‍न चालविलेला आहे; भौतिक शास्त्रांतील शोधामुळें तयार झालेले आधुनिक तत्त्वज्ञान व अराजकसमाजवाद यांचा तर्कशास्त्रदृष्ट्या निकट असलेला संबंध दाखवून देणें, हल्लीं समाजांत दिसून येणार्‍या प्रवृत्तींचा अभ्यास करून अराजकसमाजपंथी मतांची शास्त्रीय पायावर उभारणी करणें, व या मतांचा पुढें विकास कसा होत जाणार याचें दिगदर्शन करणें, आणि अराजकसमाजांतील नैतिक बंधनें योग्य तत्त्वांच्या आधारानें तयार करणें; कलेक्टिव्हिझम पेक्षां कम्युनिझम ग्राह्य होण्याचा संभव कसा अधिक आहे व त्यामुळें अखेर अनार्किस्ट-कम्युनिझमच सर्व सुधारलेल्या समाजांनां मान्य होण्याचा कसा संभव आहे, तसेंच कम्युनिझम व अनार्की हे दोन विकास दर्शक शब्द असून ते अन्योन्यपूरक आहेत म्हणजे त्यांतील एक तत्त्व मान्य केलें की दुसरें मान्य करावेंच लागतें, वगैरे गोष्टी सप्रमाण सिद्ध करून दाखविण्याचा क्रोपॉटकिनच्या लेखांचा उद्देश आहे.  राजक्रांतीच्या काळांत एखाद्या मोठ्या शहरांतील रहिवाशाची संमति असल्यास तेथें कम्युनिझम ताबडतोब अमलांत आणतां येईल असें क्रोपॉटकिनचें म्हणणें असून त्या योजनेबद्दल तो म्हणतो कीं, अशा शहरांतील प्रत्येक रहिवाशाला मध्यम वर्गांतील माणसांनां हल्लीं मिळते तितक्या प्रकारची राहण्याची जागा, खाण्याचे पदार्थ, व कपडेलत्ते इतक्या गोष्टी त्यांच्या अर्ध्या दिवसाच्या म्हणजे पांच तासांच्या कामाचा मोबदला म्हणून देण्यांत यावा आणि बाकी राहिलेल्या अर्ध्या दिवसाचें पांच तास काम त्यांनीं शिक्षणविषयक वाङ्‌मयविषयक किंवा शास्त्र, कला व शारिरिक व्यायामाचें यांपैकीं काम करणार्‍या कोणत्याहि संस्थेंत काम केलें तरी चैनीच्या राहणीच्या इतर सर्व वस्तू सहज मिळूं शकतील.  शेतकी व इतर औद्योगिक धंद्यांतील कामें बौद्धिक व्यवसायांच्या जोडीला कशीं जोडून देतां येतील, तेंहि क्रोपॉटकिननें विवेचन केलें आहे.

पंधराव्या व १६ व्या शतकांतील चोजेकी, डेन्क वगैरे कित्येक इसमांप्रमाणें सामान्य जनसमाजांत धार्मिकदृष्ट्या चळवळ करणार्‍या लीओ टॉलस्टॉय या रशियन देशभक्तानें प्रत्यक्ष अराजकसमाजवादी असें नांव धारण न करतां राजसत्ता व मालमत्तेवरील मालकी या दोन गोष्टींसंबंधानें अराजकसमाजपंथाचींच मतें स्वीकारलेलीं आहेत, आणि हीं मतें ख्रिस्तानें उपदेशिलेल्या गोष्टींतूनच व सामान्य तर्कशास्त्राच्या साहाय्यानें कशीं सिद्ध होतात तें दाखविलें आहे.  चर्च ही धर्मोपदेशकांची संस्था, राजसत्ता ही संस्था (दि : स्टेट) व राजकीय कायदे व विशेषत: खाजगी मालमत्तेविषयींचे कायदे यांच्यावर त्यानें आपलें सर्व बुद्धिसामर्थ्य खर्चून अत्यंत जोरदार टीका केली आहे.  राजसत्ता म्हणजे दुष्ट लोकांनीं पाशवी शक्तीच्या जोरावर जनतेवर चालविलेली जुलमी सत्ता होय.  सुव्यवस्थित सरकार हे प्रत्यक्ष दरवडेंखोरांपेक्षांहि फार अधिक भयावह होय.  धर्मसत्ता, राजसत्ता व मालमत्तेची सांप्रतची वांटणी यासंबंधीं लोकांच्या मनांत असलेल्या कल्पना चुकीच्या आहेत, हें दाखवून देऊन ख्रिस्ताच्या उपदेशांतूनच अप्रतिकाराचें (नॉन रेझिस्टन्स) तत्त्व आणि कोणत्याहि कारणास्तव युद्ध होऊं नये हें तत्त्व कसें निष्पन्न होतें याचें विवेचन टॉलस्टॉयानें केलेलें आहे.  तथापि टॉटस्टॉयच्या एकंदर लेखनांत सांप्रतच्या समाजांतील दोषांचे अवलोकन करून सुचणार्‍या विचाराचा, धार्मिकदृष्ट्या सुचणार्‍या विचारांशीं त्यानें इतका उत्तम मेळा घालून दिलेला आहे कीं, त्याच्या ग्रंथांतील अराजकताविषयक विवेचन धार्मिक व अधार्मिक दोन्ही बुद्धींच्या लोकांनांसारखेंच ग्राह्य वाटते.

अ रा ज क  स मा ज वा द्यां चे  अ त्या चा र. — हा विषय पुरा करण्यापूर्वीं  "अराजकसमाजवादी" म्हणजे मारामार्‍या, खून करणारा इसम असा अर्थ सामान्य जनतेच्या मनांत कां वावरत असतो, त्या कारणांचा थोडासा खुलासा केला पाहिजे.  वास्तविक अराजकसमाजपंथाच्या तत्त्ववेत्यांनां असल्या प्रकारचे अत्याचार बिलकूल संमत नाहींत.  असें असतां सामान्य जनतेची वरील प्रकारची समजूत कां झालेली आहे, तें पुढील हकीगतीवरून दिसून येईल.

१८८२ ते १८८६ यांच्या दरम्यान फ्रांन्समध्यें प्रिंस क्रोपाटकिन, लुई मायकेल व इतर कित्येकांना तुरुंगांत टाकण्यांत आलें.  इंग्लंडमध्यें मॉस्ट या जर्मन अराजकसमाजवादी पुढार्‍याला सेंट पीटर्सबर्ग येथें झालेल्या २ र्‍या अलेक्झांडरच्या खुनाचें समर्थन केल्याच्या आरोपावरून १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा देण्यांत आली.  ती भोगल्यावर १८८६ च्या मे महिन्यांत मॉस्ट युनैटेड स्टेट्समध्यें जाऊन न्यूयॉर्क येथें स्वपक्षाचें पत्र काढूं लागला.

या काळांत युनैटेड स्टेटमध्यें अनार्किस्ट पक्षाच्या वार्षिक बैठकीहि बर्‍याच भरल्या, त्यांपैकीं १८७९ सालच्या अलेघनी शहरांत भरलेल्या सभेच्या वेळीं या पंथांत अनत्याचारी व क्रांतिकारक असे दोन पक्ष उद्‍भवून क्रांतिकारकपक्ष फुटून निघाला व त्यानें शिकागो व बोस्टन येथें आपल्या पक्षाचीं पत्रें काढलीं.  १८८३ मध्यें पिट्सबर्ग येथे भरलेल्या सभेंत या पक्षाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणें पुढे मांडला गेला :-

(१) सांप्रत विशिष्ट वर्गाच्या हातांत असलेली सत्ता हरएक उपायांनीं म्हणजे दयामाया न करतां जोरदार, क्रांतिकारक उपायांनीं, तसेच आंतरराष्ट्रीय चळवळींच्या मदतीनें समूळ नष्ट करावयाची.

(२) स्वतंत्र समाजाची स्थापना करून त्यांत अर्थोत्पादनाची व्यवस्था सहकारितेच्या तत्त्वानुसार करावयाची.

(३) समान किमतीच्या वस्तूंचा विनिमय अर्थोत्पादनांत भाग घेणार्‍या सर्व व्यक्तींनीं आपापसांत करावयाचा.

(४) स्त्री व पुरुष दोन्ही समाजाकरतां शास्त्रीय तत्त्वांच्या पायावर समान शिक्षणाचा कार्यक्रम आंखून तो अमलांत आणायाचा.

(५) स्त्रीपुरुष किंवा वंशजाति वगैरे भेद न करतां सर्वांना समसमान हक्क द्यावयाचे.

(६) निरनिराळे स्वतंत्र समाज, संघ व आंतरराष्ट्रीय संघ बनवून त्यांतील व्यक्तींनीं स्वतंत्रपणें करारमदार ठरवून सर्व सार्वजनिक व्यवहार चालवावयाचे.

हा कार्यक्रम व त्याबरोबर मजूरवर्गाला एक विनंतिपत्र १८८३ मध्यें शिकागो येथें प्रसिद्ध करण्यांत आलें व फ्रेंच, बोहेमियन, जर्मन व इंग्लिश अशा चार स्थानिक कमिट्या स्थापण्यांत आल्या.  त्या एका कमिटीचा मुख्य ऑगस्ट स्पाईस हा होता, त्याला शिकागो येथील हेमार्केट प्रकरणात भाग घेतल्याच्या आरोपावरून १८८७ मध्यें फांशीं देण्यांत आलें.  तें प्रकरण असें कीं, दिवसाच्या कामाचे तास आठ असावे, अशी चळवळ करणारे मजूर व पोलीस यांच्या दरम्यान झालेल्या चकमकींत कांहीं मजूर मरण पावले.  या गोष्टीचा निषेध करण्याकरितां सभा भरविण्यांत आली, ती पोलीसांनीं उधळून लावण्याचा प्रयत्‍न केला; तेव्हां पोलीसांवर एक बाँबगोळा टाकण्यांत आला, त्यानें कांहीं पोलीस मरून कित्येक जखमी झाले.  या प्रकरणांत खटला होऊन स्पाईस इत्यादि चार जणांना फांशीं देण्यात आलें.  यानंतर बरेच अत्याचार झाले व ते सर्व क्रांतिकारक उपायांनीं सुधारणा घडवून आणण्यार्‍या पक्षाच्या शिकवणीमुळें झाले.  १८९३ मध्यें फ्रान्समधील चेंबर ऑफ डेप्युटीज या नांवाच्या कायदेमंडळामध्यें व्हेलँट यानें एक बाँब टाकला.  तेव्हां त्याजवर झालेल्या खटल्याच्या वेळीं जज्जानें व्हेलँटला गरीब निरपराधी स्त्रीपुरुषांचे  प्राण घेण्याच्या कृत्याबद्दल खूप दोष दिला.  त्यावर व्हेलँटनें उत्तर केलें कीं, "बुर्ज्वाझी लोकांच्या (मध्यम स्थितींतील फ्रेंच लोक) वर्गामध्यें कोणी निरपराधी इसम असणेंच शक्य नाहीं (सर्व स्त्रीपुरुष अपराधी गुन्हेगार अतएव शिक्षेस पात्र आहेत)." या उत्तरावरून या पक्षाच्या मतांची स्पष्ट कल्पना होते.  १८९४ मध्येंहि फ्रान्समध्यें दोन ठिकाणीं अत्याचार झाले व त्यांतील एका कृत्याबद्दल सहाजणांनां फांशीची शिक्षा झाली.  त्याच साली लीयाँ येथें एका इटालियनानें फेंच प्रजासत्ताक राज्याचा प्रेसिडेंट कार्नो याचा खून झाला.  या कृत्यांचा 'अराजकसमाजी' मतांशीं संबंध असल्याचें सर्वसाधारण लोकांचे मत पडल्यामुळें १८९४ मध्यें युनैटेड स्टेट्सच्या काँग्रेसनें (कायदेमंडळानें) परकी अराजकपंथीयांना देशांत येण्याची बंदी करून देशांतील अराजक मतवाल्यांना हद्दपार करण्याचा कायदा पास केला; शिवाय रोममध्यें १८९८ मध्यें भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला या अराजक मतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय योजण्याबद्दल विनंति केली.  अराजकमतवाद्यांचे गुन्हे राजकीय न गणतां सामान्य समजून त्यांनां चौकशीकरितां निरनिराळ्या सरकारांनीं एकमेकांकडे परत द्यावें.  या क्रांतिकारक पंथाच्या छापखान्यांनां बंदीकरून या पक्षाच्या गुन्हेगारांचा तपास लावण्याच्या कामीं सर्व देशांतील पोलीसखात्यांनीं सहकारिता करावी, अशा सूचनाहि पुढें आल्या; पण नक्की धोरण जाहीर झालें नाहीं.  उलट १९०० मध्यें ब्रुसेल्स येथें इंग्लंडच्या युवराजाचा खुन करण्याचा सिपिडो नामक तरुणानें प्रयत्‍न केला; त्याची चौकशी होऊन सिपिडो दोषमुक्त ठरला, तेव्हां ब्रिटिश सरकारनें बेल्जियन सरकारला रागानें पत्रहि लिहिलें, त्याच सालीं इटालीच्या हंबर्ट राजाचा खून झाला, त्यामुळें इटालींतील अराजकपंथीयांबद्दल फार ओरड झाली.  पुढें १९०१ सप्टेंबरमध्यें बफलो येथें युनैटेड स्टेटसचा प्रेसिडेंट मॅककिनले याचा झागोकनें खून केला.  यापेक्षां भयंकर अत्याचार १९०६ मध्यें स्पेनच्या तरुण राजाराणीचा त्यांच्या विवाहदिनीं खून करण्याचा प्रयत्‍न हा होय.

हिं दु स्था नां ती ल  अ त्या चा र. — अराजकतेची तात्त्विक मीमांसा करणारे ग्रंथ अर्वाचीन किंवा प्राचीन हिंदुस्थानांत मुळींच झाले नाहींत आणि अराजकतेच्या तत्त्वाचे अनुयायी हिंदुस्थानांत मुळीच नाहींत असें म्हटलें तरी चालेल.  गेल्या  वीस वर्षांत ज्या चळवळी हिंदुस्थानांत झाल्या त्यांपैकी कांहींस अराजक चळवळी म्हणण्यांत येतें पण तें नांव सार्थ आहे, असें वाटत नाहीं.  जेव्हां लार्ड सिडेनह्यामसारख्या कांहीं ब्रिटिश अधिकार्‍यांस, ब्रिटिश राज्य अप्रिय होत आहे असें नसून जे ब्रिटिश राज्याविरुद्ध ते केवळ ब्रिटिश राज्याविरुद्ध नसून शासनसत्तेच्या विरुद्ध आहेत, असें लोकांस भासवावयाचें होतें तेव्हां त्या अत्याचाराच्या प्रयत्‍नांस अराजक चळवळी म्हणण्याचा त्यांनीं उपक्रम सुरू केला असावा असे वाटतें.  खून करणें, ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याचा प्रयत्‍न करणें, यांसारख्या क्रियांस नादान ठरविण्याच्या अनेक प्रयत्‍नांपैकीं त्यांस अराजक ठरविणें हा एक प्रयत्‍न होता असें वाटतें.  या चळवळींस अराजक म्हणण्यापेक्षां अराजनिष्ठ चळवळी म्हणणें अधिक बरोबर होईल.  रौलट सारख्या मंडळीनीं देखील या प्रकारास अराजक न म्हणतां क्रांतिध्यये म्हटलें आहे.

हिंदुस्थानांत सरकारी अधिकार्‍यांचे खून व जाळपोळी करणार्‍या इसमांचे गुप्‍त कट असल्याचा संशय ब्रिटिश सरकारला पुष्कळ वर्षें होता.  अशा क्रांतिकारकांच्या चळवळींचा वृत्तांत लक्षांत घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचे उपाय सुचविण्याकरितां रौलॅटसाहेबाच्या अध्यक्षतेखालीं एक कमेटी १९१७ मध्यें नेमण्यांत आली.  तिनें रिपोर्टांत जे अत्याचार नमूद केलें आहेत ते येणें प्रमाणें :-

मुंबई इलाखा — १८९७ सालीं पुण्यास भयंकर प्लेगाची साथ उद्‍भवली.  तिला प्रतिबंधक उपाय म्हणून क्वारंटाइन सेग्रीगेशन, घरें तपासणें, दूषित घरें धुणें, कपडे जाळणें, आजारी इसमास तात्काळ इस्पितळांत पोहोचविणें वगैरे कृत्यें गोर्‍या शिपायांच्या मदतीनें पुणें शहरांत होऊं लागली.  या कामावरचा मुख्य अधिकारी प्लेग कमिशनर रँडसाहेब व दुसरा एक इंग्रज लेफ्टनंट आयर्स्ट यांचा खून २२ जून १८९७ रोजीं दामोदर चाफेकर व त्याचा भाऊ यांनीं पुणे-गणेशखिंड रस्त्यावर रात्रीं खून केला.  त्यांच्या चौकशींत चाफेकर असोसियेशन (गुप्‍त मंडळ) असल्याचें सिद्ध झालें.  यानंतर लवकरच श्यामजी कृष्णवर्मा नांवाच्या इसमानें (काठेवाडांतील मूळ रहिवाशी) लंडन येथें इंडिया होमरूल सोसायटी स्थापून स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकी यांच्या कल्पना हिंदुस्थानांत पसरविण्याकरितां तयारी करणारांनां स्कॉलरशिपादि मदत करण्याचें जाहीर केलें.  १९०५ च्या सुमारास महात्मा श्री अगम्यगुरु परमहंस यानें पुण्यांत एक सोसायटी काढण्याचा प्रयत्‍न केला, त्यांत विनायक दामोदर सावरकर हा प्रमुख होता, पण लवकरच तो इंग्लंडमध्यें गेला व कृष्णवर्माच्या सोसायटींत सामील झाला.  विनायकचा भाऊ गणेश सावरकर यांनीं अभिनव भारत सोसायटी व मित्रमेळा अशा मंडळ्या काढल्या होत्या, १९०९ मध्यें कृष्णवर्मा याचा एक अनुयायी मदनलाल धिंग्रा यानें लंडन येथें कर्नल वायली पोलिटीकल ए. डी. सी. याचा खून केला.  याच सुमारास गणेश सावरकरावर पीनल कोडांतील १२१ कलमा प्रमाणें राजाविरुद्ध युद्धास मदत केल्याचा खटला झाला.  तेव्हां अभिनव भारत सोसायटीपैकीं एका कान्हेरे नांवाच्या इसमानें नाशिकच्या डिट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (कलेक्टर) जॅकसन यांचा २१ डिसेंबर १९०२ रोजीं नाशिक येथे थिएटरांत खून केला.

बं गा ल. इतर प्रांत — अराजकांच्या कटांचा बंगाल्यांतील उत्पादक बरेंद्रकुमरघोस (अरविंद घोस याचा भाऊ) याला पाश्चात्त्य देशांतील अराजक लोकांच्या चळवळीची माहिती होती, व तशी बंगाल्यांत करण्याचा त्याचा प्रयत्‍न १९०२ पासून चालू झाला.  लॉर्ड कर्झननें केलेल्या बंगालच्या फाळणीमुळें लोकांत असंतोष पसरला.  तेव्हांपासून खून व दरवडे यांची परंपरा सुरू झाली.  १९०७ मध्यें लेफ्टनंट गव्हर्नरच्या आगगाडीवर बाँब फेंकण्यांत आला पण दुखापत झाली नाहीं.  त्याच साली डाक्काचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अ‍ॅलन याचा खून झाला.  १९०८ मध्यें मुझफरपूरचा जज्ज किंग्जफर्ड यांच्याऐवजीं चुकून मिसेस व मिस केनेडी या दोन स्त्रिया मारल्या गेल्या.  १९०९ मध्यें अलिपूर बाँब प्रकरणांतील पब्लिक प्रॉसिक्यूटरचा, व १९१० सालीं डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस, याचा खून करण्यांत आला.  कांहीं गुप्‍त कट पोलिसांनीं शोधून काढून त्यांतील इसमांवर खटले केले पण त्यांनीं अत्याचार न थांबता वाढतच गेले.  खून व दरवडे मिळून १९११ सालीं १६ अत्याचार; १९१२ सालीं १४; १९१३ सालीं १६; १९१४ मध्यें १७; १९१५ मध्यें ३२; १९१६ मध्यें १२; १९१७ सालीं ९; याप्रमाणें अत्याचार सालोसाल चालू राहिले.  दरवडे अर्थात् मोठाल्या श्रीमंत लोकांच्या घरावर पडत असत, व खून गोरे अधिकारी, पोलीस खात्यांतील नेटिव्ह लोक, पब्लिक प्रॉसिक्यूटर, सरकारतर्फेचे साक्षीदार वगैरे लोकांचे होत असत.  त्यामुळें साक्षीदार मिळण्यास कठिण जाऊं लागलें, आणि खर्‍या गुन्हेगारांवरहि योग्य पुराव्याच्या अभावीं आरोपाची शाबिति करणें कठीण पडूं लागलें.  अलीपूर, हावरा, डाका, बारीसाल, इतक्या ठिकाणच्या गुप्‍त कटांची चौकशी झाली.  याच काळांत संयुक्त प्रांतांत बनारस येथील गुप्‍त कट, पंजाबांतील लोहोरचा गुप्‍त कट उघडकीस येऊन त्यांचें जाळें बहार ओरिसा, मध्यप्रांत मद्रास, ब्रम्हदेश वगैरे प्रांतांत पसरल्याचें आढळून आले.  तिनेवल्ली (मद्रास) येथील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (कलेक्टर) याचा वंची आय्यर याने १७ जून १९११ रोजीं खून केला.

ज र्म न क ट. — बर्नहार्डीनें आपल्या "जर्मनी अँड दी नेक्स्ट वॉर" (जर्मनी व पुढील युद्ध) नांवाच्या १९११ मध्यें प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत असें म्हटले होतें कीं, हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यास बंगाली व मुसुलमान मिळून धोका आणतील.  स. १९१७ मध्यें सॅनफ्रँसिस्को येथें झालेल्या खटल्यांत जर्मन-इंडियन कटाबद्दलची बरीच माहिती उघडकीस आली.  कॅलिफोर्नियांत (अमेरिकेंत) घदर रेव्होल्युशनरी पार्टी १९१४ पूर्वींच स्थापन झाली होती, व त्या सालीं बर्लिन येथें "इंडियन नॅशनल पार्टी" चेंपकरामन पिले यानें स्थापली व तिला जर्मन जनरल स्टाफची मदत होती.  हिंदुस्थानांत बंड उभारण्याची तयारी हिंदुस्थानची वायव्य सरहद्द, बँकॉक व बटेव्हिया येथून शांघाय येथील जर्मनीच्या काँसल जनरलच्या देखरेखीखाली चालू होती व त्यांनां वॉशिंग्टन येथील जर्मन एम्बसीकडून हुकूम मिळत असत.  १९१५ सालीं मव्हेरिक नांवाच्या बोटीतून ३००० बंदूका, दारूगोळ्याच्या ४०० पेट्या. आणि दोन लक्ष रुपये बंगाल्यांत पाठविण्याचें बटेव्हिया येथें ठरलें.  परंतु सरकारला ती बातमी कळून त्याबद्दल बंदोबस्त करण्यांत आला.  या प्रकरणांत कलकत्त्यास पोलिसांनीं कांहीं झडत्या घेतल्या, व कांहीं इसमांवर खटले करून शिक्षा दोविवल्या.  मव्हेरिक बोटीचा बेत फसल्यावर शांघाय येथील जर्मन काँसल-जनरलनें आणखी दोन बोटी बंदुका, पिस्तुलें व दारुगोळा भरून पाठविण्याचें ठरविलें.  परंतु हें बेतहि सरकारला अगोदरच कळले, आणि शांघाय, शिकागो व सॅनफ्रँसिस्को येथें कांहीं इसम पकडून त्यांनां शिक्षा देण्यांत आल्या व सर्व कट हाणून पाडण्यांत आले.

याप्रमाणें हकीकत १९१८ सालच्या सेडिशन कमिटीच्या रिपोर्टांत दिली आहे.  त्यानंतर सत्याग्रहाची व असहकारितेची चळवळ सुरू झाली व गेल्या पांच सहा सालांत कांहीं अत्याचार झाले.  (विभाग १ ला परिशिष्ट) त्यांत कोठेंहि अराजक समाजस्थापना हें ध्येय नसून ब्रिटिश सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापणें एवढाच हेतू निदर्शनास आला आहे.  अनार्किस्टांचें भांडवलाविरुद्ध ध्येय बोलशेव्हिकांनीं घेतलें पण त्यांनीं शासनसंस्थेस सर्व सत्ताधीश केलें.  बोलशेविक चळवळ (पहा) हिंदुस्थानांत आल्याचा निश्चित पुरावा नाहीं. (ब्लिस)

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .