विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरारिया — बंगाल पुर्णीआ जिल्ह्यांतील वायव्येकडील विभाग नेपाळ सरहद्दीवर आहे. क्षेत्रफळ १०७७ चौरस मैल. २५० ५६' ते २६० ३५ उत्तर अक्षांश व ८७० ३' ते ८७० ४२' ते पूर्व रेखांश लोकसंख्या सुमारें चार लक्ष. यांत ६०० खेडीं आहेत. वसंतपूर, फोर्ब्सगंज, राणीगंज येथें मोठे बाजार भरतात व मदनपूर आणि चंद्रदिहि येथें गुरांचे बाजार भरतात. वसंतपूर हें या विभागाचें मुख्य ठिकाण असून, येथून चार मैलांवर अरारिया खेडें आहे. या खेड्यावरूनच विभागाला हें नांव मिळालें.