विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरुंतुद — रसायनशास्त्रांत अरुंतुद = क १३ उ ९ व अॅक्रिडाइन हा एक उत्कर्ष (हायड्रोकार्बन) आहे, दगडी कोळशापासून डामरांत ३४०० श ते ३६०० श उष्ण मानावर शुष्कपात पावणारा जो भाग असतो त्यांत असणार्या अशुद्ध कर्बसंकाशीन त्यांचा अरुंतुद असतो. याची घटना चक्रवलयेतर (हिरटो सायक्लीकरिंग) आहे. अशुद्धकर्ब संकाशीनचा भाग पातळ ग्रंथकाम्लाच्या द्रवाबरोबर हलविला म्हणजे अरुंतुद विद्राव्य होतो. याचे जें अम्ल गळण येतें त्यांत पालाशद्वि क्रुमित घातलें म्हणजे अरुंतुद द्विक्रुमिताच्या रुपांत निपात पावतो. तो निपात गाळून घेऊन त्यावर अम्र (अमोनिया) ची क्रिया म्हणजे अरुंतुद असंयुक्त होतो याचे रंगहीन सूचिकाकार स्फटिक असतात, ते ११०० श उष्णमानावर वितळतात, हे स्फटिक शीघ्र उर्ध्वपात पावतात, व त्यापासून नाकास झोंबणारी वाफ निघते. द्विभानिल अमिन (डायफेनिल अमिन) व पुत्तिकाम्ल (फार्मिक अॅसिड) यांचें संयोगीकरण जशद हरिदाच्या सांनिध्यांत केलें म्हणजे अरुंतुद तयार होतो तो येणेंप्रमाणें :-
द्विभानिल अमिन पुत्तिकाम्ल अरुंतुद पाणी
क६उ५.नउ.क६उ५ + कउप्रप्रउ = क६उ.४न.कउ:क६उ४ + २उ२प्र.
याशिवाय अरुंतुद कृत्रिम संयोगीकरणानें तयार करण्याच्या पुष्कळ रीति आहेत.
अरुंतुदाचा चामडीला — अंगाचे कातड्याला-स्पर्श झाला म्हणजे अतिशय खाज सुटते. अरुंतुद-क्षाराचे द्रव असतात त्यांस जांभळसर रंगाची झाक असते. (रंगकांति). पालाश परिमंगलितानें (पोट्याशियम परम्यांगनेटने) यावर प्राणिदी करणाची क्रिया केली म्हणजे अरुंतुदाम्ल क९उ५ व कप्रप्रउ) तयार होतें. अरुंतुदाचे जे समश्रेणी पद-घटनेचे पदार्थ आहेत त्यांच्यापासून आदिष्ट (सबस्टिट्युशन प्रॉडक्टस) होतात ते फार महत्त्वाचें रंग असतात.
भानिल अरुंतुदा (फेनिल-अॅक्रिडाइन) पासून सुवर्णनीलीन (क्रिसअनिलाइन), कांतिभास्विन (फॉस्फाइन) अरुंतुद पीत वगैरे उत्तम रंग तयार होतात. सुवर्णनीलीनचे लाल रंगाचे क्षार असतात, त्यांच्या योगानें रेशीम व लोंकर यांवर पिवळा रंग चढतो. या क्षारांच्या द्रवास पिंवळसर हिरवी कांति असते. उदील प्लाविन (बेंझोप्लाविन) हा सुवर्णनीलीनचा समघटकच आहे. उदील प्लाविनची पिवळ्या रंगाची पूड असते ती गरम पाण्यात विद्रुत होते. हे व दुसरे अनेक रंग उदील प्रायोज्जिद (बेंझाल्डिहाईड) आणि अरुंतुद यांच्या संयोगीकरणापासून तयार होतात.