विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्कावती — म्हैसूर प्रांतांतील कावेरी नदीला मिळणारी एक नदी. लां. १२० मै. ही नदी दुर्गामध्यें उगम पावून बंगलोर जिल्ह्यांतून वहाते. हिला मिळणार्या नद्या :— पश्चिमेकडून कुमुद्वती व पूर्वेकडून वृषभावती. नदीच्या वरच्या प्रवाहांत मोठमोठे तलाव आहेत, त्यांपैकीं हे सरघट्ट नांवाचा जो तलाव आहे त्यांतून बंगलोर शहराला पाणी आणलें आहे. सावन दुर्गाच्या दक्षिणेस हिचा प्रवाह दर्याखोर्यांतून जात असल्यामुळे पाटबंधार्याकरितां त्याचा उपयोग होत नाही. (इं. गॅ. पु. ६.१९०८).