विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्घुन — काश्मीरमधील एक जात. संख्या (१९११) १५१७ ( मुसलमानी ) मंगोलियन महावंशांतील ही एक मिश्र जात आहे. हिची उत्पत्ति लदाख प्रांतांतील स्त्रीया, यारकंद व दुसरे मध्य आशियांतील कांहीं प्रदेश, काश्मीर व पंजाब यांतील मुसलमानी धर्माचे पुरुष, यांच्यापासून झाली आहे असें समजतात. या जातीच्या लोकांचा नेहेमीचा धंदा व्यापाराचा आहे. [ खानेसुमारी १९११ पु. २०]