प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

परकीय उपयोगी वस्तूंचा हिंदुस्थानांत प्रवेश.- परकीय राष्ट्रांचा हिंदुस्थानाशीं जो व्यापारी संबंध आहे त्याजकडे आतां वळूं. या संबंधाचे परिणामहि महत्त्वाचे झालेले आहेत. व्यापारी जिनसांपैकीं अनेक जिनसा परदेशाहून आपल्या देशांत सतत येत आहेत. ज्या केवळ वापरल्याच जात आहेत असें नाहीं तर ज्यांचें उत्पादनहि आपल्याकडे चालू झालें आहे अशा केवळ अमेरिकेहून पोर्तुगीज लोकांमार्फत आपल्याकडे कितीतरी गोष्टी आल्या. तंबाखू, बटाटे, मका, रताळीं, भुइमूग हे पदार्थ आल्या. तंबाखू, बटाटे, मका, रताळीं, भुइमूग हे पदार्थ आपल्या देशांत इतके सडले आहेती कीं, ते परकी आहेत असें कोणासहि वाटत नाहीं. बाहेर देशांतून अनेक गोष्टी विक्रयासाठीं हिंदुस्थानांत येत असत या संबंधांत असा क्रम दिसून येईल कीं, नवीन गोष्टी परदेशांतून येतात आणि नंतर त्यांचें उत्पादन येथें होऊं लागतें आणि याप्रमाणें येथील व्यवहार आणि प्रयत्‍न अधिक व्यापक करण्यास त्या कारणीभूत होतात.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .