प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

समाजांत परकीय रक्ताचा प्रवेश.- आपल्या रक्ताच्य शुद्धतेविषयीं तीव्र अभिमान बाळगणार्‍या हिंदूंनीं हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, परक्या देशांतून सुरेख स्त्रिया खरेदी करून आणून आपल्याकडे दासी म्हणून ठेवण्याच्या परिपाठास भारतीयांनीं उत्तेजन दिलें. * * * हि गोष्ट बाहेरचा पुरावा भरभक्कम असल्यामुळें हिंदुस्थानांतील ग्रंथकारांनीं लक्षिली नसली तरी बाहेर पडणारच. आपल्या ग्रंथांत पूर्णपणें आपल्या ग्रंथकारांस ही गोष्ट लपवितां आली नाहीं हें संस्कृत नाटकांतील राजासन्निध असलेल्या यवनींवरून दिसून येतें. हिंदुस्थानांतील कच्चा माल तसाच कलाकौशल्याचा माल बाहेरदेशीं विक्रयास जाई, आणि हिंदुस्थानांत उलट विकावयास ज्या कित्येक गोष्टी येत असत त्यांत परदेशाच्या स्त्रिया येथें आणून विकावयाचाहि परिपाठ असे. बाहेर देशांचा किंवा राष्ट्रांचा आपल्यावर जो परिणाम झाला तो केवळ सांस्कृतिक आणि राजकीय विकृतींसच कारण झाला नसून या परकीय स्त्रियांच्या द्वारा जातिविकृतीसहि कारण झाला हें लक्षांत ठेवलें पाहिजे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .