प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

नव ब्राह्मण्याच्या विकासाचें धोरण.- हिंदुसमाजवर्धनामध्यें जी गोष्ट लक्षांत ठेवावयाची ती ही कीं, हिंदू हे शास्य आहेत असें समजून म्हणजे ते एक समाज आहेत असें समजून त्यांचा विस्तार करावयाचा. तो विस्तार करतांनां पारमार्थिक प्रश्नाकडे मुळींच लक्ष द्यावयाचें नाहीं. ज्याप्रमाणें हिंदु हा पारमार्थिक संप्रदाय नाहीं त्याप्रमाणें ब्राह्मण हे पारमार्थिक गुरू नाहींत ही कल्पना जितकी अधिकाधिक स्पष्ट समजेल तितकी राष्ट्रीकरणाची क्रिया खुली होत जाईल. मुसुलमान व ख्रिस्ती पंथ हे पारमार्थिक मार्ग आहेत. ते शास्यें नव्हत. या पारमार्थिक मार्गांस व्यत्यय न येईल अशा तर्‍हेनें या पंथांनां आपण वागविल्यास आणि यांनां पारमार्थिक मार्गाव्यतिरिक्त इतर गोष्टींत आपलें पृथक्त्व राखण्याची इच्छा कमी झाल्यास हे दोन्ही संप्रदाय हिंदु जनतेंत विलीन व्हावयास हरकत नाहीं. या दोन संप्रदायांनां हिंदुसमाजांत विलीन होण्यास साधक गोष्टी कोणत्या होतील त्यांची चर्चा अंशेंकरून मागें केलीच आहे आणि कांहीं अंशीं पुढेंहि करावी लागेल. येथें भावी हिंदुसमाजांत ब्राह्मणांचें स्थान काय असावें या नाजूक प्रश्नाकडे वळूं.

ब्राह्मणांचें पारमार्थिक स्वरूप हें अत्यंत गौण आहे ही गोष्ट लक्षांत घेऊन समाजांतील नेतृवर्ग या दृष्टीनेंच नव ब्राह्मण्याचा विकास झाला पाहिजे. म्हणजे ब्राह्मणवर्गानें आपली पारमार्थिक श्रेष्ठत्वाची भावना सोडून देऊन लौकिकस्थितिमूलक श्रेष्ठत्व संपादण्याच्या उद्योगास लागलें पाहिजे. या विषयाची मीमांसा थोड्याशा विस्तारानें करूं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .