प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

जगामध्यें आत्महितसंवर्धनार्थ जे जे प्रयत्‍न चालू आहेत त्यांचें पृथक्करण करणें, त्यांचा परस्पर संबंध लक्षांत घेणें, समाजांतील अवयवांचा आणि क्रियांचा अन्योन्याश्रय ओळखणें आणि कोणत्याहि क्रियेची या अन्योन्याश्रयामुळें परिणामपरंपरा काय होते तिचा विचार करणें हें अर्थशास्त्राचें क्षेत्र आहे. या अभ्यासस प्रवृत्ति व्हावयाची ती अर्थात् इष्टवर्गाच्या हितार्थच व्हावयाची. जो इष्टवर्ग लेखकाच्या मनांत असेल किंवा ज्याचे अवयव आपण आहों अशी लेखकाच्या मनांत भावना असेल तो इष्टवर्ग अर्थशास्त्राचा अभ्यास करतांना आपण ओळखला पाहिजे. कोणाहि ग्रंथकाराचा सामाजिक, राजकिय किंवा अर्थशास्त्रावरील लेख घेतला कीं ग्रंथकारचा इष्टवर्ग कोणता व त्याचें लिहिणें त्याच्या इष्टवर्गासाठीं किती आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताविषयीं किती आहे याचें पृथक्करण करणें अवश्य आहे. हा इष्टवर्ग अनेक प्रकारचा असतो.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .