प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १ लें.
वेदांविषयीं भारतीय वृत्ति.

आपल्या आणि त्याचप्रमाणें बर्‍याच यूरोपीयांच्या सामान्य पूर्वजांचे प्राचीनतमस्थितिबोधक वाङ्मयांतर्गत अवशेष या नात्यानें वेदांनां जगाच्या वाङ्मयेतिहासांत अग्रस्थान देणें जरूर आहे, ही गोष्ट यूरोपीय पंडितानींहि कबूल केली आहे. आपणां हिंदूंचें ज्ञान, विचार व भावना यांस वेदांमुळेंच निश्चित स्वरूप आलें आहे. आज कित्येक हजार वर्षें कोट्यवधि भारतीय वेदाक्षराला ईश्वरी वाणी मानीत आले आहेत. ‘वेदवाक्य’ याचा अर्थ काय होतो हें महाराष्ट्रीयांस तरी सांगावयास नको. वेद हे भारतीय वाङ्मयांत प्राचीनतम असल्याकारणानें भारतीयांचा आध्यात्मिक जीवनक्रम व संस्कृति यांसंबंधाचें यथार्थ ज्ञान वैदिक वाङ्मयांत गति करून घेतल्याशिवाय मिळणार नाहीं. तसेंच वेदकालीन परिस्थिति लक्षांत आल्याशिवाय व पूर्वस्थितिबोधक वेदांतर्गत अवशेष समजून घेतल्याशिवाय आपल्या बापदाद्यांची माहिती आपणांस होणार नाहीं हें जाणून वेदांविषयीं पूज्यबुद्धि बाळगणें हें आपलें कर्तव्य आहे ही गोष्ट सुशिक्षित यूरोपीय ओळखूं लागले आहेत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .