प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

आरोग्यमंत्र आणि ताईत.– अथर्ववेदसूक्तांचा पहिला वर्ग रोगनिवारक मंत्रप्रयोगांचा धरला तर दुसरा वर्ग आयुरारोग्यार्थ म्हणावयाच्या प्रार्थनामंत्राचा होईल. या दोहोंच्या स्वरूपांत फारसा फरक नाहीं. हे प्रार्थनामंत्र विशेषतः चौल, उपनयन वगैरे गृह्यसंस्कारांच्या वेळीं वापरतात. ह्या प्रत्येक प्रसंगीं, शंभर पावसाळे किंवा शंभर हिंवाळें इतकें दीर्घायुष्य, शंभर किंवा एकशेंएक प्रकारच्या मृत्यूंपासून मुक्तता व सर्व जातींच्या रोगांपासून संरक्षण होण्याविषयींच्या एकसुरी प्रार्थना या वर्गांतील मंत्रांतून केलेल्या आढळतात.

अथर्ववेदाच्या १७ व्या कांडांत एकच तीस ऋचांचें जें सूक्त आहे तें अशा प्रकारचें आहे. ज्याप्रमाणें रोगनिवारक मंत्रांनीं मांत्रिकवैद्य रोगनाशक औषधींनां आह्वान करतात त्याचप्रमाणें आयुरारोग्यार्थ म्हणावयाचें प्रार्थनामंत्र हे तन्निमित्त धारण केलेल्या ताइतांनां उद्देशून म्हटले जातात.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .