प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण २ रें.
वेदप्रवेश– ऋग्वेद.

सप्तम प्रपाठक.

याजमान ब्राह्मणशेष १-६

१. इडानुमंत्रण, इडाभक्षण, मार्जन व चतुर्धाकरण मंत्रव्याख्यान.

२. इडाप्रशंसन आख्ययिकेसह.

३. अन्वाहार्यचरुचें आसादन, अभिमंत्रण वगैरेचें व्याख्यान आख्यायिकेसह.

४. अनूयाजादिकांचीं अनुमंत्रणें.

५. ध्रुवेचे आप्यायनादि मंत्र. यजमानभागभक्षण. पूर्ण पात्रनिनयन.

६. आहवनीयादि अग्नींचे उपस्थानमंत्र यज्ञविमोक. वा ज पे य वि ष य क आ ध्व र्य व मं त्र ७-१२

७. दीक्षांगभूत सावित्रहोम, रथारोहण, घोड्यांनां धुण्याचा विधि. रथ चालविणें.

८. रथ पळविण्याचे मंत्र, चात्वालावर पुरलेल्या रथचक्रावर ब्रहृयानें आरोहण करण्याचा विधि. दुंदुभिवादन. सोळा रथ दक्षिणारुपानें देणें. कृष्णल दान. इ.

९. तुपांत भिजलेलें वस्त्र नेसून यजमानानें यूपावर चढण्याचा विधि.

१०. अन्नहोंममंत्र, अन्नहोमाचीं द्रव्यें अभिषेकविधि.

११. उज्जितिमंत्रव्याख्यान.

१२. पंचजनोद्देशानें आग्रयणसंज्ञक ५ अतिग्राह्य ग्रह घेण्याचा विधि.

१३. ग्रामाधिपत्यप्राप्तीसाठीं ‘इंद्र अनुवृजु’ देवतेच्या उद्देशानें स्वत:ची सेना दुर्बल झाली असल्यास ती स्वकार्यक्षम व्हावयाकरितां, संग्रामभूमीवर प्राप्त झाल्यानंतर जय मिळावा म्हणून, रोगानें अथवा द्रव्यहानीमुळें उद्विग्न झालेलें चित्त धैर्यसम्पन्न होण्यासाठीं, आपल्या प्रजेमध्यें दानत उत्पन्न होण्याकरितां, आपल्या वांटणीचें द्रव्य आपला दायाद देत नसेल तर तें मिळावें म्हणून, राज्यावरुन खालीं झाला असल्यास अथवा राज्यावरुन खालीं होण्याचा प्रसंग आला असल्यास राजासनावर स्थैर्य येण्याकरितां, ऐश्वर्य मिळावें म्हणून आणि जो कुमार ऐश्वर्यप्राप्तीला योग्य झाला असून सामन्य व्यक्तिसमुदायाबरोबरचा समजला जात असेल त्याला ऐश्वर्य व मोठेपणा मिळण्यासाठीं कराव्या लागणार्‍या इष्टींच्या याज्यापुरोनुवाक्यादेवता: (१) इंद्र अनुवृजु (२) इंद्राणी (३) इंद्रोमन्युमान् (४) इद्रोमन्युमान् (३ च्याच या. पु.) (५) इंद्रोदाता (६) इंद्र: प्रदाता (७) इंद्र: सुत्रामा (८) इंद्र. इष्टिसंख्या (९) हविर्द्रव्यें ९ (८ पुरोडाश १ चरु). याज्या व पुरोनुवाक्या १६ (कारण ३ र्‍या इष्टीच्याच ४ थीला आहेत).

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .