प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १३ वें.
वेदकालीन इतिहास-यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास

यज्ञसंस्थेचा स्थूल इतिहास मागें दिलाच आहे. यज्ञसंस्थेच्या मुळाशीं जी दैवतविषयक कल्पना असते ती कल्पना जितकी अधिक स्पष्ट होईल तितका दैवतेतिहासहि अधिक समजेल म्हणून दैवतेतिहास मध्येंच दिला आहे. आतां यज्ञसंस्थेच्या इतिहासाकडे पुन्हां वळूं.

यज्ञसंस्था पौराणिक धर्मांच्या उद्गमापासून लयास जाऊं लागल्या. पौराणिकांची वृत्ति यज्ञसंस्थेस विघातक, पण यज्ञांचा आदरपूर्वक उल्लेख करण्याची दिसून येते. पुराणांत कवींनीं अनेक जुन्या यज्ञांचा इतिहास दिला आहे व त्याबरोबर सृष्टयुत्पत्तिविषयक अनेक रूपकेंहि दिलीं आहेत. कांहींतरी अपूर्व फलनिष्पत्तीसाठीं यज्ञ होत असत तथापि यज्ञमार्ग मोठा कठिण आहे असें दाखविण्याचा प्रयत्न त्यांत दृष्टीस पडतो. महाभारत आणि पद्म, अग्नि, ब्रह्म, विष्णु, सौर आणि वायु या पुराणांमधील यज्ञविषयक उल्लेख येथें प्रथम देतों, आणि नंतर रुक्ष ऐतिहासिक पद्धतीनें यज्ञेतिहास देण्याकडे वळतों. पौराणिक साहित्याचा ऐतिहासिकदृष्ट्या फारसा उपयोग नाहीं, कां कीं यज्ञसंस्थेशीं अपरिचितपणा त्यांच्या विधानांत दिसून येतो (पृष्ठ २२५ पहा). त्यामुळें केवळ उल्लेख देऊन टाकले म्हणजे आम्हीं मोकळे झालों.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .