प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

(जामदग्न्य) चतूरात्र.- प्रजा, पशू आणि धन यांनां पोष किंवा पोषणकारक असें म्हणतात. या पोषणकर तिन्ही संपत्ती प्राप्त करून घेणें याचें नांव पुष्टि. अशी पुष्टि प्राप्त होण्यासाठीं प्रथमत: जमदग्नीनें चतूरात्र नामक यज्ञ केला व त्यानें पूर्वोक्त पुष्टि मिळविली. पुष्टिमार्गाचा आद्य प्रवर्तक हा जामदग्न्यच असल्यामुळें या जामदग्न्याच्या वंशांत उत्पन्न झालेले कोणचेहि पितापुत्र पुष्टिरहित अर्थात् दारिद्य्रादिकांनीं पछाडलेले कधींहि आढळत नाहींत.

अत्रिऋषींनीं चतूरात्र यज्ञाच्या बसविलेल्या कल्पनेहून जमदग्नीच्या चतूरात्र यज्ञांतील प्रयोगकल्पनेंत थोडासा फरक आहे, तो असा:- या यागाच्या अंगभूत 'उपसद्' नामक इष्टी सहादिवसांत रोज २ प्रमाणें बारा कराव्या आणि त्या इष्टीमध्यें प्रधान देवतेचा याग प्रकृतिभूत अग्निष्टोमांतील उपसदेप्रमाणें आज्यानें न करतां क्रमानें आग्नेयादि वैश्वदेवांत १२ देवतांचे पुरोडाशद्रव्यानें याग करावे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .