प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ६ वें
प्राचीन यूरोपीय संस्कृती.

यूरोपमध्यें स्वतंत्रपणें विकास पावणाऱ्या भिन्न संस्कृती म्हटल्या म्हणजे ग्रीक, रोमन, टयूटन व स्कँडिनेव्हियन या होत. या संस्कृतीची विकसित अवस्था आपणांस युद्धपूर्व कालांत दृष्टीस पडत नाहीं. तेव्हां या संस्कृतीचे सविस्तर विवचेन करण्याचें स्थान या विभागांत नसून बुद्धोत्तर जग या विभागांतच योग्य होईल. तथापि या संस्कृतीचा उगम जरी अल्प प्रमाणावर असला तरी तो बुद्धपूर्व कालांत झालेला असल्यामुळें आपणांस त्यांचा निर्देश करणें भाग आहे.

वर ज्या चार भिन्न संस्कृती दाखविल्या त्या जरी भिन्न प्रदेशांत व भिन्न काळांत विकास पावत असल्या तरी त्यांचा परस्पराशीं थोडाफार संबंध आलेला असावा, एवढेंच नव्हे तर ग्रीक व टयूटन या इंडोयूरोपीय अथवा मूलगृहकालीन आर्यन संस्कृतीच्याच शाखा असाव्या असा संशोधकांचा सिद्धांत आहे. रोमन संस्कृति तर बहुतांशी ग्रीक संस्कृतीचीच उत्तरावस्था म्हणतां येईल म्हणून तिचे वर्णन पूर्णपणें चवथ्या विभागांतच दिले आहे. स्कँडिनेव्हियन संस्कृतीची प्रगति तर स्त्रि.पू.५०० पर्यंत फक्त आयसयुगापर्यंत झाली होती. तेव्हा तिची पूर्वावस्था या विभागांत वर्णन केली आहे.
 
टयूटन संस्कृति ही तिच्यापेक्षां अधिक प्रगत दिसतें पण ग्रीक संस्कृति स्त्रि.पू.५०० च्या सुमारास बरीच प्रगत झालेली असावी असें होमर वगैरे ग्रंथावरून दिसते. या संस्कृतीने इंजियन संस्कृतीपासून बऱ्याच गोष्टी उचलल्या होत्या व जरी इंजियन संस्कृतीची प्रगति कांहीं कारणामुळें कुंठित झाली तरी तिची परंपरा ग्रीक संस्कृतीमार्फत कायम राहिली. यामुळें ग्रीक संस्कृतीचें महत्त्व अधिक आहे.

इजिअन संस्कृतीच्या अंमलाखालील प्रदेशापैकी आशियामायनर हा एक भाग असल्यामुळें इजियन संस्कृतीचा परिणाम आशियामायनरवर कांही प्रमाणांत झाला तसाच तो पश्चिमेकडे ग्रीस वगैरे देशांवरहि झाला. त्या परिणामाची व त्याच्या पुढील संस्कृतीची कल्पना मिळवावयाची झाल्यास अत्यंत प्राचीन काळचा ग्रीक लेख म्हणजे जें होमरचें काव्य त्यांतील विधानें घेऊन पाठीमागल्या कालाविषयी अनुमानें काढीत बसावयाचें या प्रकारचा उद्योग करावा लागतो. असा उद्योग करून ग्रीक लोकांच्या उपासनापद्धतीसंबंधानें 'एन्सा यक्लोपीडिआ ऑफ रिलिजन अँड एथिक्स' या पुस्तकांत खालीलप्रमाणें माहिती दिली आहे. ही माहिती (वैदिक वाङ्मयाशीं तुलना करून) हिंदुस्थानाचा यूरोपाशी दुवा जोडणाऱ्या कालावर प्रकाश पाडण्यास उपयोगी आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .