प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

खाल्डियन व भारतीय वेदग्रंथ. - मेसापोटेमियांत तैग्रिस व युफ्रेटिझ नदीच्या मुखाजवळ इ. स. पू. ५००० च्या सुमारास उत्तर आशियांतील एका तुराणियन नांवाच्या जातीचे लोक वस्ती करून राहिले होते. तेथें त्यांची बरीच सुधारणा झाली. त्यांनीं आपलीं धर्ममतें व आचारविचार यांविषयीं विटांवर खोदून ठेवलेले लेख अलीकडे उपलब्ध झालेले आहेत. त्यांच्या प्राचीनत्वामुळें त्यांनां 'खाल्डियन वेद' असें मानण्यांत येतें. या खाल्डियन लोकांच्या संस्कृतीच्या साहाय्यानेंच पुढें असुरियन लोक सुसंस्कृत बनले व म्हणून खाल्डियन संस्कृति असुरियन संस्कृतीची जननी होय. ही असुरियन संस्कृति इ. स. पू. २०००च्या सुमारास भरभराटींत होती. वरील सनानंतर हिंदू लोकांचा असुरियन लोकांशी संबंध आला असें मानतात.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .