प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

रुडॉल्फ हान इहेरिंगचें विधान - इहेरिंगचें विधान असें आहे कीं, आर्यन् लोक मूळ मध्यआशियांत राहणारे होते व त्या वेळीं ते पूर्ण रानटी स्थितींत असून टोळ्या करून हिंडत असत. त्या वेळीं त्यांना शेतकी, कालवे करणें, दगडी घरे बांधणें, धातूंचे जिन्नस बनविणें, नाण्यांचा व्यवहार, लिपी वगैरे सुधारणेच्या कालांतील साध्या गोष्टींचें सुद्धां ज्ञान नव्हतें. पण नंतर हे आर्यन् लोक मध्यआशियामधून बाबिलोनियांत उतरले व तेथें त्यांचा सुधारलेल्या असुरियन लोकांशीं संबंध येऊन सुधारणेच्या वरील सर्व बाबी त्यांनीं असुरियन लोकांपासून घेतल्या.

हें इहेरिंगचें विधान अनेक पंडितांनां अतिशयोक्तीचें वाटत आहे. तरी पण जादूचे व इतर मंत्र, सृष्ट्युत्पत्ति व सृष्टिरचना यांविषयींच्या कल्पना, ज्योतिषशास्त्रीय माहिती तसेंच कालमापन व पंचांगपद्धति या बाबतीची माहिती आर्यन् लोकांनीं बाबिलोनियन लोकांपासूनच घेतलेली आहे व ती इ. स. पू. २००० नंतर दोघांचें दळणवळण सुरू झाल्यावर घेतली आहे असें पुष्कळांचे मत आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .