प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

प्रो. मॅक्समुल्लरचा विरोध. - 'सचा मना हिरण्यया (ॠग्वेद ७.८, २) या वाक्यांतील 'मना' या शब्दाचें लॅटिनमधील सिना, ग्रीकमधील व्हना व फिनीशियन भाषेमधील मनह या शब्दांशीं साम्य आहे. अर्थात् 'मना' हा शब्द भारतीयांनीं बाबिलोनियन लोकांपासून घेतला असला पाहिजे, व म्हणूनच ॠग्वेद हा ग्रंथ इ. स. पू. २००० नंतरचा असला पाहिजे. ही अनुमानपरंपरा प्रो. मॅक्समुल्लर यांस मान्य नाहीं. मॅक्समुल्लरचें म्हणणें असें कीं, मना हा शब्द मूळ आर्यनच असावा व सायणानें दिलेल्याप्रमाणें त्याचा अर्थ 'अलंकार' किंवा 'सुंदर भूषणें' असा असावा. कारण वेदांपैकीं सर्वांत जुन्या ॠग्वेदाचा काल इ. स. पू. २००० नंतरचा असणें शक्य नाहीं असें सदरहू प्रोफेसरांचें ठाम मत आहे व तेंच बरोबर आहे. शिवाय मना हा शब्द बाबिलोनियन भाषेपेक्षांहि जुन्या असलेल्या अकेडियन भाषेमध्येंहि आहे. पण या गोष्टीचें महत्त्व मॅक्समुल्लरच्या लक्षांत आलें नाहिंसें दिसतें. कारण अकेडियन भाषा अधिक जुनी असल्यामुळें मना हा शब्द (कानडी व मराठी मण व इंग्रजी माँड) परभाषेंतून ॠग्वेदांत घेतलेला असला तरीहि ॠग्वेदाचा काल इ. स. पू. २००० च्या अलीकडे ओढण्याचें कारण नाहीं.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .