प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

जैनवाङ्मय.
बौद्ध व जैन संप्रदाय. - बौद्ध धर्मग्रंथांमध्ये गौतम बुद्धाचा एक प्रतिस्पर्धी म्हणून ''नीगंठनातपुत्त'' या नांवाचा वारंवार उल्लेख आला आहे. अर्थात् हा उल्लेख सुप्रसिद्ध महावीर या जैनधर्मसंस्थापकाचा होय, याविषयीं बिलकुल संदेह नाहीं. गौतमाच्या पूर्वी थोडेच दिवस ''नीगंठ'' (पाशरहित) ह्या नांवाच्या एका बर्‍याच जुन्या संप्रदायांतून ''वर्धमान महावीर'' याच्या धुरीगत्वाखालीं हा जैन संप्रदाय उदयास आला. जैन संप्रदायाचें बौद्ध संप्रदायाशीं इतके साम्य आहे कीं, जैन संप्रदाय. हा बौद्ध संप्रदायांतीलच पोटभाग होय ही समजूत बराच कालपर्यंत रूढ होती. तथापि बौद्ध संप्रदायापेक्षां ह्या जैन संप्रदायांतील कांहीं तत्त्वें इतकी भिन्न आहेत. की त्यामुळें जैन संप्रदाय अगदीं स्वतंत्र आहे असें मानणें भाग पडलें. उदाहरणार्थ बौद्ध संप्रदायापेक्षां जैन संप्रदायामध्यें तापसवृति व इतर संप्रदायिक आचार यांजवर फारच भर देण्यांत आला आहे. इतकेच नव्हे तर गौतम बुद्धच्या उलट, महावीर यानें पण विकास पावलेल्या आत्मतस्वाच्या अस्तित्वासंबंधीं विवेचन केलें आहे. दोन्ही संप्रदायांनां सामान्यपणें लागू असणाऱ्या गोष्टी म्हणजे प्राचीन भारतीयांत प्रचलित असलेली तापसवृत्ति व तत्ससंबंधी नीतिकल्पना ह्या होत. बौद्ध व जैन संप्रदायाचें साम्य या बाबतींत दाखवितां येण्यासारखें आहे, इतकेंच नव्हे तर सर्वसामान्य भारतीय विरक्तिपर काव्यवाङ्मयात अशाच प्रकारचें वातावरण भरून राहिलें आहे हें दाखवितां येईल.

ह्या दोन संप्रदायांमध्यें मुख्य भेद असा आहे की, जैन संप्रदाय हा सर्वकाल पूर्ण भारतीयच राहिला, परंतु बौद्ध संप्रदाय मात्र अधिक व्यापक झाला व ह्यामुळेच बौद्ध वाङ्मयास विशेषच महत्त्व प्राप्त झालें आहे. ह्या दृष्टीनें पा. ता अंतर्गत विषयांमध्यें देखील जैन वाङ्मयाची बौद्ध वाङ्मयाशीं तुलना करता येणार नाहीं. जैनाचें मूळ धर्मग्रंथ रुक्ष अशा उपदेशाच्या पद्धतींत लिहिले गेले असल्यामुळें बौध धर्मग्रंथात अनेक ठिकाणीं आढळून येणारें सामान्य मानवातीच्या हिताच्या दृष्टीनें केलेले विवेचन ह्या जैन ग्रंथात मुळीच आढळून येत नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .