प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

पूर्व आणि पश्चिम यांचा संबंध जोडणारा महत्त्वाचा दुवा जें इराणी साम्राज्य त्याची सविस्तर हकीकत मागील प्रकरणांत दिलीच आहे. पूर्व आणि पश्चिम यांचा अत्यंत निकट संबंध अलेक्झांडरच्या दिग्विजयामुळें आला असल्यानें त्या दिग्विजयाचाच तेवढा वेगळा इतिहास थोडक्यांत पुढें दिला आहे. पूर्वेशीं संबंध जसा ग्रीसचा आला तसा पश्चिमेशीं व बर्‍याच अंशीं पूर्वेशीं संबंध रोमचा आला. परंतु रोमन लोकांस इराणनें पूर्वेकडे फिरकूं दिलें नाहीं हें मागें दाखविलें आहेच.

अलेक्झांडरनें जो दिग्विजय केला त्यांतील इराणी भाग आणि त्या दिग्विजयामुळें इराणवर झालेले परिणाम आतांच वर्णन केले आहेत. ते वगळून बाकीचा इतिहास पुढें दिला आहे. ग्रीसचा संबंध इतिहास येथें देण्याचें कारण नाहीं, पण ग्रीक लोकांचा कार्यव्याप अलेक्झांडरच्या पूर्वीपासून असल्यामुळें ग्रीकांच्या कार्याची थोडीशी माहिती देणें अवश्य आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .