प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

अलेक्झांडर दि ग्रेटच्या मृत्यूनंतर ग्रीकांचीं जीं नवीन राज्यें झालीं त्यांचे उल्लेख मागें ग्रीक संस्कृतीची व्यापकता दाखवितांना आणि तिचा इजिप्त, इराण, हिंदुस्थान, तुर्कस्थान, इत्यादि भागांत प्रवेश वर्णन करतांना आलाच आहे. तसाच ग्रीकांच्या रोमन लोकांनीं केलेल्या सत्ताविध्वंसाचाहि उल्लेख केलाच आहे. परंतु त्यांत राजकीय घडामोडीचें कथासूत्र नीट येत नाहीं म्हणून तिकडे प्रथम वळलें पाहिजे. रोमन साम्राज्य वाढत चाललें असतां त्याचें ग्रीस हेंच मुख्य निवासस्थान झालें. तसेंच ख्रिस्ती संप्रदायाची यूरोपास ओळख झाली ती बहुतांशीं ग्रीस मार्फतच झाली आणि ख्रिस्ती संप्रदायाच्या शासनसंस्थेस जरी बळकटी ग्रीसच्या भूमीवर आली नाहीं तरी साध्या नैतिक उपदेशांत विचारमयता शिरून तो संप्रदाय विद्वानांसहि विचारार्ह झाला. हा इतिहास ग्रीसचा उत्तरकाल वर्णन करतांनाच देणें प्राप्त होतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .