प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

मध्य आफ्रिकेंतील इस्लामधर्म. - महंमदी धर्म हा मध्यआफ्रिकेमध्यें तीन मार्गांनीं आला (१) नील व तिला मिळणा-या नद्या यांच्याजवळील मुलखांतून- म्हणजे इजिप्त मधून, (२) घडॅमीसपासून तिक्तूला जाण्याच्या मार्गांतून म्हणजे त्रिपोलीमधून व (३) वार्ग्लाला जाणास लागणा-या मार्गांतून म्हणजे अलजीरीयामधून बार्थ नांवाच्या प्रवाशानें निरनिराळ्या जातींमध्यें केव्हां व कसा या धर्माचा प्रवेश झाला याबद्दलची माहिती दिली आहे. ख्रिस्तीशकाच्या दहाव्या शतकाच्या अखेरीस इस्लामीधर्माचा सोंगामध्यें प्रवेश झाला. अकराव्या शतकाच्या अखेरीस कॅनेममध्यें प्रवेश झाला. सन १५०० च्या सुमारास बॅघिमींमध्यें त्याचा प्रवेश झाला व थोडक्याच काळानंतर कॅटसेनामध्यें झाला. १९ व्या शतकाच्या आरंभीं लॉगनमध्यें त्याचा प्रवेश झाला. सन १९०० मध्यें ब्रिटिश मध्यआफ्रिकेंतील मुसुलमान रहिवाश्यांची संख्या ५०,००० होती. कांहीं ठिकाणी इस्लामी धर्माचा प्रवेश कांहीं प्रसिद्ध व्यक्तींकडून झालेला आढळतो. मध्यनीग्रोलंडमध्यें १५०० सालीं याचा प्रवेश महंमद अब्दअल करीम मॅघिली याच्या द्वारें झाला.

मध्यआफ्रिकेंतील मुसुलमानी धर्म मालिकाइट पंथाचा आढळून येतो. त्या धर्माचें वाङ्मय जरी पुष्कळ आहे तरी सध्यां आपल्याला फार थोडी माहिती उपलब्ध आहे. 'रेव्हूडु माँडे मुसुलमान' १२ भाग (१९१०) मध्यें इश्मेल हॅमेटनें महंमद अल मुखतारच्या किताब अल तारा इफ या ग्रंथाची त्रोटक माहिती दिली आहे. हा प्रसिद्ध गृहस्थ आपला ग्रंथ संपल्यावर वीस वर्षांनीं म्हणजे १८२६ सालीं वारला. या ग्रंथांत त्यानें आपल्या मातापितरांची समग्र हकीकत दिली आहे. 'रेव्हूडु माँडे मुसुलमान' यांत हँमेटनें महंमद अल यद्दाली (१७५२) याच्या ब-याच पुराण ग्रंथांतील उतारे दिले आहेत. व याच ग्रंथकारानें महंमद पैगंबराच्या स्तुतिपर केलेली कविता मॅसिंग्नॉननें छापली आहे (१९०९). अशाच प्रकारच्या तत्कालीन कविता बार्थनें प्रसिद्ध केल्या आहेत. तसेंच मॅसिंग्नाँननें मध्यआफ्रिकेंतील सरदार शेखसीदिया यांच्या ग्रंथसंग्रहाची यादी प्रसिद्ध केली. या यादींत तत्त्वज्ञानावरील, किमयाशास्त्रावरील व गायनशास्त्रावरील ग्रंथांची यादी नाहीं, असा संपादकांनीं शेरा मारला आहे. बाकीच्या सर्व पुस्तकांची यादी इतर इस्लाम धर्माच्या ग्रंथांच्या यादीप्रमाणें आहे. फक्त वरील शास्त्रावरील ग्रंथ कांहीं कारणामुळें या यादींतून गळले असण्याचा संभव आहे.

येथपर्यंत जगांतील निरनिराळ्या भागांत महंमदी संप्रदायाची स्थिति कोणत्या प्रकारची आहे त्याचें वर्णन केलें. आतां ब्रिटिश साम्राज्यांत व जगाच्या इतर भागांत निरनिराळ्या ठिकाणीं मुसुलमानांची लोकसंख्या किती आहे ते पुढील कोष्टकांत दाखविलें आहे व मधून मधून कांहीं माहितीच्या टीपा दिल्या आहेत.

 जगांतील मुसुलमानी लोकवस्ती दाखविणारें कोष्टक

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .