प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

बुद्धोत्तर जगाच्या इतिहासाचें कथन करीत असतां चीनच्या बाबतींत चौ घराण्यापासून आपण इतिहाससूत्र यूरोपीय स्पर्शापर्यंत ओढीत नेलें असतां फारसें वावगें होणार नाहीं. चीनच्या बाबतींत आपणांस एका मोठ्या साम्राज्याचा इतिहास दिला पाहिजे. त्या इतिहासाचें साहित्यहि विपुल आहे. या गोष्टी जरी ख-या आहेत तरी त्या साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास आज अत्यंत प्राथमिक् स्थितीत आहे असें म्हटलें तरी वावगे होणार नाही. बुद्धाच्या जन्मकालापूर्वी अनेक शतकें चौ घराणें राज्य करीत होतें; आणि त्या घराण्याचें राज्य शुंगाच्या कालापर्यंत टिकलें आणि त्यानंतर त्सिन घराण्याचें राज्य चालूं झालें. पुढेंहि अनेक राजघराणी झाली.

चीनचा हिंदुस्थानाच्या इतिहासाशीं संबंध थोडा थोडका नाहीं. नेपाळ, सिकीम इत्यादि संस्थानांशीं चीनचे झगडे परवांपर्यंत चालू होते. ब्रह्मदेश हें जोंपर्यंत स्वतंत्र राष्ट्र होतें तोंपर्यंत चीनशीं त्याला झगडावें लागलेंच होतें. हा अर्वाचीन इतिहास होय. चीनचे उल्लेख प्राचीन संस्कृत ग्रंथांत थोडे बहुत येतात; पण ते उल्लेख राजकीय संबंधाचे फारसे द्योतक नाहींत. विजयानगरच्या राज्याची वकीलात चीनमध्यें गेल्याचा उल्लेख आहे एवढेंच. मुसुलमानी काळांत चेंगीजखान हा चीन, हिंदुस्थान व यूरोप यांचा सामान्य पीडक होता हा एक दुवा सापडतो. महंमद तघलख यानें एक अपेशी फौज चीनकडे पाठविली होती असेंहि कळतें. पेशवाईचा चीनशीं संबंध होता किंवा नव्हता, असल्यास कितपत होता, हे स्पष्ट झालें नाहीं. चीनचा इतिहास देतांना एका साम्राज्याची घडामोड आणि त्याबरोबर भारते. तर हिंदुस्थानावर झालेले परिणाम द्यावे लागतील असें म्हणण्यास हरकत नाहीं. अरबी संस्कृति आणि भारतीय संस्कृति यांची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीं चिनी संस्कृति ही भारतीय संस्कृतीशीं स्पर्धा कशी करीत होती; आणि संस्कृतीचें सातत्य राखण्यांत ती भारतीयांपेक्षा अधिक यशस्वी कशी झाली हें पहिल्या विभागांत दिलेंच आहे.

चीनशी भारतीयांचा संबंध बुद्धसंप्रदायमूलक, वैचारिक आणि वैज्ञानिक बाबतींत बराच आहे. आणि तत्संबद्ध प्रचारकांची नोंदहि पहिल्या विभागांत दिली आहे. चौ घराण्यापूर्वींचा इतिहास तिस-या विभागांत दिला आहे. येथें (१) चौ घराण्यापासून १७९८ पर्यंत म्हणजे इंग्रजी वकीलात चीनमध्यें जाईपर्यंतचें कथासूत्र व (२) चीनचे ब्रह्मदेश, नेपाळ सिक्किमादि भारतीय संस्थानांशीं संबंध दिले आहेत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .