प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्धमागधी , एक प्राकृत भाषा.-जैनसूत्रें ज्या भाषेंत लिहिलेलीं आहेत, त्या भाषेला अर्धमागधी असें नांव आहे. हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषाप्रदेशांच्या मध्यें अर्धमागधी भाषाप्रदेश होता. म्हणजे हल्लींचा अयोध्या प्रांत व त्याच्या दक्षिणेकडील प्रदेश यांत अर्धमागधी प्रचारांत होती.

पाली ज्याप्रमाणें हीनयान बौध्दसंप्रदायाशीं निगडित झाली त्याप्रमाणें श्वेतांबर संप्रदायाचा अर्धमागधीशीं संबंध उत्पन्न झाला. श्वेतांबर जैन लोकांचे धार्मिक ग्रंथ अर्धमागधी भाषेंत लिहिले आहेत, त्याबद्दलची सविस्तर माहिती वेबरनें ( इं. स्टू १६. २११-४७९;१७.१-९० यांमध्यें ) दिलेली आहे. अर्धमागधी ग्रंथज्ञानामध्यें वेबरनें बर्लिनमधील रॉयल लायब्ररीमधील संस्कृत व प्राकृत भाषेंतील हस्तलेखांचा जो कॅटलॉग आहे, त्यांत जे मौल्यवान् उतारे दिलेले आहेत, त्यामुळें फार चांगली भर पडली आहे व तेथें त्या कॅटलॉगांतच हिंदुस्थानांत व यूरोपांत मिळून आतांपर्यंत ज्या कांहीं त्या ग्रंथाच्या आवृत्ती निघाल्या आहेत, त्याचीहि नांवनिशी दिलेली आहे. व्याकरणग्रंथरचनेच्या कामीं आतांपर्यंत जेवढें म्हणून वाङ्‌मय प्रसिध्द झालेलें आहे, त्या सर्वांचा उपयोग करून घेतलेला आहे. दुर्दैंवानें अद्यापपर्येंत त्या ग्रंथांच्या चिकित्सात्मक दृष्टीनें तयार केलेल्या अशा आवृत्ती मुळींच निघालेल्या नाहींत. कांहीं जे मूळ ग्रंथ नुसते प्रसिध्द झालेले आहेत, ते व्याकरणविषयक दृष्टीनें अगदीं कुचकामाचे आहेत. त्यांतल्या त्यांत भाषाशास्त्राच्या दृष्टीनें गद्य भाषेसंबंधानें अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे प्रथम अंगआयारंगसुत्त हा होय. यांतील भाषा सर्वांत अगदी जुनी अशी आहे. नंतर दुसरें अंग सूयगडगसुत्त हें विशेष विचारांत घेण्यासारकें आहें. यांतील पहिलें खंड बहुतेक पद्यात्मक असून आयारंगसुत्त ज्याप्रमाणें भाषेच्या दृष्टीनें  उपयुक्त त्याप्रमाणे हें खंड पद्यात्मक भाषेच्या दृष्टीनें तितकेंच उपयुक्त आहे. चवथें अंग समवायांग, हें संख्यावाचक शब्दांची माहिती होण्यास उपयोगी आहे. सहावें नायाधम्मकहाओ, सातवें उवासगदसाओ. अकरावें विवागासुय आणि पांचवें विवाहपन्नत्ती यांतील निरनिराळे भाग. यांमध्ये सारख्या कथाच सांगितलेल्या असून इतरांपेक्षां या अंगांचा विभक्तिविचार व क्रियापदविचार या व्याकरणाच्या भागांवर प्रकाश पडण्यास त्याचा अधिक उपयोग होण्यासारखा आहे. त्याप्रमाणें ओववाइयसुत्त आणि निरयावलियाओ आणि छेदसूत्रांमध्ये कप्पसूय याचा पहिला भाग या उपांगांचाहि त्याच दृष्टीनें उपयोग होण्यासारखा आहे. मूलसूत्रामध्यें महत्त्वाच्या दृष्टीनें अत्यंत श्रेष्ठ म्हणजे उत्तरज्झयणसुत्त हें होय. हें बहुतेक सर्व पद्यांत लिहिलेलें आहे व त्यांत जुनीं व चमत्कारिक अशीं शब्दांचीं रूपें पुष्कळ उपयुक्त आलेलीं आहेत. याशिवाय महत्त्वाचें असें दसवेयालियसुत्त हें आहे; परंतु यांतील भाषा बर्‍याच ठिकाणीं अपभ्रष्ट झालेली दिसते. तेच तेच शब्द व अलंकार पुन:अनेक वेळां आलेले दिसतात. तथापि एवढ्या ग्रंथांवरूनच अर्धमागधी भाषेबद्दल स्पष्ट व बरोबर कल्पना होण्यासारखी आहे व त्यावरून अर्धमागधी हीच बरींच महत्त्वाची भाषा असें दिसतें. कारण ती परंपरागत उत्तम चालत आलेली आणि इतर सर्व प्राकृत भाषांपेक्षा ती अधिक संपन्न दिसते. अर्धमागधीची अगदीं प्रथम माहिती-फार अपुरी व पुष्कळ ठिकाणीं चुकीची अशी स्टीव्हेन्सन यानें कल्पसूत्र, ( पा. १३१ पासून पुढें ) याच्याद्वारें दिली. पुढें आणखी थोडी अधिक माहिती होफरनें दिली ( ३.३६४ पासून पुढें ) व त्याबरोबरच होफरनें यश्रुति अर्धस्वर व ‘क’ चा ‘ग’ असा होणारा फरक या महत्त्वाच्या विशेष गोष्टींपैकीं थोड्या गोष्टी चांगल्या तर्‍हेनें इतरांच्या नजरेस आणून दिल्या. या बाबतींत अगदीं मूलभूत प्राथमिक माहिती देणारा ग्रंथ म्हटला म्हणजे वेबरचा ( यूबेरीन फ्रॅगमेंट डर भगवती भाग १,२ ( बर्लिन १८६६-१८६७)=  बर्लिन १८६५ मधील के.जी. एल. अकेडमी डर विस्सेश्चेफ्टनचे निबंध पा. ३६७-४४४; १८६६ पा. १५५-३५२). या निबंधांत जैन हस्तलिखितांतील लिहिण्याच्या विलक्षम पध्दतीसंबंधांनें वेबरनेच प्रथम चर्चा केलेली आहे. शिवाय त्याच निबंधांत कांहीं अक्षरांचें ध्वनिशास्त्रदृष्ट्या महत्त्व ठरविण्याचा ( कित्येक ठिकाणीं चुकीचा ) प्रयत्‍न केला आहे व तसेंच त्या भाषेच्या व्याकरणांची सामान्य रूपरेषा दिलेली आहे, ती मात्र अद्यापपर्येंतहि उपयुक्त होण्यासारखी आहे. शिवाय भाषेंतील उदाहरणेंहि दिलेलीं आहेत. येथें हें लक्षांत घेतलें पाहिजे कीं, भगवती म्हणजेच वर सागितलेलें पांचवें अंग होय, आणि त्याचें धर्मग्रंथातील नांव विवाहपन्नत्ति असें आहे व त्याच नांवानें त्या व्याकरणांत त्यांतील उतारे दिलेले आहेत आणि भगवती हें नांव जेथें वेबरच्या निबंधाचा उल्लेख आलेला आहे, तेथेंच फक्त योजिलें आहे. इ. मुल्लरच्या “जैनप्राकृत भाषेच्या व्याकरणाविषयीं माहिती” ( बर्लिन १८७६ ) या ग्रंथावरून वेबरनें दिलेल्या माहितीपेक्षां अधिक माहिती मिळत नाहीं, मात्र त्यांत उच्चारांच्या नियमासंबंधाने कांहीं अधिक चांगली माहिती दिलेली आहे. याकोबीनें आयारं.भा. ८-१४ यांत व्याकरणाविषयीं त्रोटक माहिती देऊन पालीभाषेशीं तुलना केली आहे. सध्यां इंदूर येथें अर्धमागधी कोश छापण्याचें काम श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सतर्फें चालू आहे. [ शिवाय ‘प्राकृत’ पहा ].

आर्ष भाषा व अर्धमागधी. - महाराष्ट्री भाषेशीं ज्या दुसर्‍या दोन भाषांचा अत्यंत निकट संबंध नेहमीं लावण्यांत येतो; त्या भाषा म्हणजे जैन लोकांच्या बोलण्यांत असलेल्या व याकोबीनें ज्यांना जैनमहाराष्ट्री व जैनप्राकृत अशीं निरनिराळीं नांवें दिलेलीं आहेत या होत. त्यांपैकीं जैनमहाराष्ट्री भाषा म्हणजे जी भाषा भाष्यकार व कवी यांनीं वापरलेली आहे; ती आणि जैनप्राकृत म्हणजे जैनलोकांच्या धर्मशास्त्राच्या जुन्या सूत्रग्रंथांतून वापरलेली भाषा होय. जैनप्राकृत हें भाषेला दिलेलें नांव जरी इ. मुल्लरनेंहि मान्य केलें आहे, तरी ही नांवाची योजना अत्यंत अप्रयोजक आहे. शिवाय ही जैन प्राकृतभाषा म्हणजे जुनी किंवा प्राचीन महाराष्ट्री भाषा होय, हें म्हणणेंहि चुकीचें आहे. हिंदु व्याकरणकारांनीं या जुन्या जैनसूत्राच्या भाषेला आर्षम् म्ह. “ऋषींची भाषा” असें बहूतकरून नांव दिलेले आढळतें. हेमचंद्र असें स्पष्ट म्हणतो ( १. ३ ) कीं, माझ्या व्याकरणांत दिलेल्या नियमांनां आर्ष भाषेंत पुष्कळ अपवाद आहेत, आणि ( २. १७४ ) पूर्वी जे नियम दिलेले आहेत ते आर्ष भाषेला लागू नाहींत; उलट त्यांत काय वाटेल तें करण्याला परवानगी आहे. त्रिविकम यानेंहि आपल्या व्याकरणग्रंथांतून आर्ष व देश्य या दोन्ही भाषा वगळल्या आहेत, आणि त्यांचे कारण ( रूढत्वात् ) असें कीं, त्या भाषांचा उगम अगदीं स्वतंत्र निराळा आहे. म्हणजे संस्कृतपासून न निघालेल्या आणि बहुतेक स्वत:चे नियम असलेल्या त्या भाषा आहेत ( स्वतंत्रत्वाच्च भूयसा ). दंडीच्या काव्यादर्शांत ( १. ३३ ) प्रेमचंद्र तर्क वागीशानें दिलेल्या उतार्‍यांत दोन प्रकारच्या स्वतंत्र प्राकृत भाषा सांगितलेल्या असून त्यांपैकीं एक आर्ष भाषेंतून निघालेली आहे व दुसरी आर्ष भाषेसारखी आहे ( आर्षोत्थं आर्षतुल्यं च द्विविधं प्राकृतं विदुः ) नमि साधु,रूद्रट काव्यालंकारामध्यें, (२.१२) म्हणतो कीं, प्राकृत हें नांव पडण्याचें कारण असें की, प्राकृत  भाषेचा मूळ पाया उर्फ प्रकृति म्हणजे सर्व लोकांची रोजची बोलण्याची साधी भाषा होय; तिला व्याकरणाचे नियम वगैरे कांहीं लागू नसतात. व याप्रमाणें तिची उपपत्ति असल्यामुळें किंवा लोकांच्या बोलण्यांतीलच ही भाषा असल्यामुळें तिला प्राकृत असें नांव पडलें. उलट कोणी म्हणतात प्राकृत म्हणजे प्राक्+कृत, म्हणजे “जुन्या काळीं झालेली ( पूर्वं );” कारण असें म्हणतात कीं, आर्ष धर्मशास्त्रग्रंथांतील जी प्राकृतभाषा म्हणजेच अर्धमागधी ती देवांची भाषा आहे. ( आरिसवयणे सिध्दं देवाणं अध्दमागद्दा वाणी ) तेव्हां प्राकृत भाषा म्हणजे जी बायकामुलांनां वगैरे सहज समजते ती भाषा; आणि तीच इतर सर्व भाषांचा मूळ पाया आहे. पावसाच्या पाण्याप्रमाणें ती मूळ सर्व एकच प्रकारची होती, पण पुढें देशभिन्नत्वामुळें आणि व्याकरणविषयक शुध्दाशुध्दांसंबंधीच्या नियमांमुळे तिच्यांत भिन्नत्व उत्पन्न होऊन व विभाग पडून तिच्यापासून संस्कृत व रूद्रट ( २.१२ ) मध्यें सांगितलेल्या इतर भाषा उत्पन्न झाल्या. याप्रमाणें येथें प्राकृत भाषेलाच संस्कृत भाषेची मूळ जननी असें म्हटलें आहे. याचें कारण येवढेंच दिसतें कीं, ज्याप्रमाणें बौध्द लोक म्हणतात कीं, मागधी ही मूळची मुख्य भाषा असून तिच्यांतूनच इतर सर्व भाषा निघाल्या, त्याप्रमाणेंच जैन पंडीतांनां वाटतें कीं, अर्धमागधीपासून म्हणजे व्याकरणकार जिला आर्ष भाषा म्हणतात तिच्यापासून सर्व भाषा निघाल्या; कारण जैनधर्मसंस्थापक जो महावीर त्यानें या भाषेच्याद्वारें आपलें धर्मोपदेशाचें काम केलें असें म्हणतात. कारण समवायंगसुत्त ( ९८ ) मध्यें असें म्हटलें आहे, “गुरूनें धर्मनियम अर्धमागधी भाषेंत सांगितले आहेत. आणि ही अर्धमागधी भाषा जेव्हां बोलण्यांत वापरूं लागले तेव्हां ती थोडी फार बदलून सर्वप्राण्यांची बोलण्याची भाषा बनली, व तिच्या द्वारेंच प्रत्येकाला मोक्ष, सुख व आनंद मिळतो; व तीच आर्य व अनार्य, द्विपाद व चतुष्पाद, गृहपशू व वनपशू, पक्षी व सर्प यांची भाषा आहे.” वाग्भट अलंकारतिलक ( १. १ ) मध्यें म्हणतो, “आम्ही येथें फक्त भाषेचा ( वाक् ) विचार करणार आहों, ती भाषा म्हणजे फक्त अर्धमागधी, तिच्यापासून फरक होऊन इतर सर्व भाषा निघाल्या; तीच सर्वश्रेष्ठ व सर्वगामी भाषा आहे.” पष्ण वणासुत्त ( ५९ पासून पुढें ) यामध्यें लोकांचे एकंदर नऊ वर्ग सांगितलेले असून त्यांतला सहावा वर्ग भाषारिया म्हणजे “भाषानुसार झालेले आर्य लोक” यांच्या संबंधानें अशी व्याख्या केली आहे; “भाषानुसार आर्य लोक म्हणजे काय ? भाषानुसार झालेले आर्य लोक म्हणजे जे लोक अर्धमागधी भाषा बोलतात व ब्राह्मी लिपी वापरतात. ते लोक.” महावीरानें आपल्या जैन धर्माचा उपदेश अर्धमागधी भाषेच्या द्वारें केला, या म्हणण्याला आधार म्हणून वर समवायंग सुत्तामधून एक उतारा दिलेला आहेच, व शिवाय ओववाइयसुत्त ( प्यारा ६ ) यामध्येंहि तसाच उल्लेख आहे.

ह्यालाच उद्देशून अभयदेवानें उवासगदसाओ ( पा. ४६ ) मध्यें व मलयगिरीनें सूरियपन्नत्ति [ वेबरच्या भवगती २, २४५ ) मध्यें लिहिलें आहे. शिवाय हेमचंद्र, ( अभिधान चिंतांमणी ) ५९ सटीक, पहा. हेमचंद्र ४, २८७ ] मधील आलेल्या उतार्‍यांत असें म्हटलें आहे कीं, जुनी सुत्तें अर्धमागधी भाषेंत केलेलीं आहेत. आतां यासंबंधानें हेमचंद्र असें म्हणतो कीं, जून्या लोकांत जरी अशी परंपरा असली तरी अर्धमागधी भाषेचें बहुतेक नियम अगदीं स्वतंत्र आहेत. मागधी भाषेसंबंधानें जे नियम आहेत ते अर्धमागधीला लागू पडत नाहींत. त्यानें दुसरें उदाहरण दिलें आहे तें, “से तारिसे दु:खसहे यिंदिओ” असें होय ( दसवेयालियसुत्त ६३३, १९; ) हेंच मागधीभाषेंत “शे तालिशे दु:खशहे यिदिंदिओ” असें होईल.

सारांश आर्ष आणि अर्धमागधी या अगदीं एक असून परंपरागत मत असें कीं, जुन्या जैनसुत्तांची भाषा अर्धमागधी आहे; आणि शिवाय हेमचंद्रानें दिलेल्या दसवेयालियसुत्तांतल्या उतार्‍यावरून असें सिध्द होतें कीं, अर्धमागधीभाषा ग्रंथांतून आहे इतकेंच नव्हे तर पद्यग्रंथांतहि तीच आहे. तथापि गद्य ग्रंथांतील भाषा व पद्यग्रंथांतील भाषा यांच्यामध्यें सारखेपणा पुष्कळ असला तरी फरकहि बराच आहे. मागधी भाषेंतील विशिष्ट प्रकारांपैकीं एक प्रकार असा आहे कीं, र चा ल होतो, स चा श होतो आणि अकारांत पुल्लिंगी प्रथमाविभक्तीच्या एकवचनीं ओ बद्दल ए होतो. उदा. रामो याचें लामे असें रूप होतें.

संस्कृत व अर्धमागधी यांचीं विभक्तीचीं व वर्तमानकाळचीं रूपें कशी होतात ते पुढील रूपांवरून दिसेल.

अर्धमागधी भाषेंत र व श कायम राहातात परंतु प्रथमेचें रूप ए होतें. आणि अभयदेव यानें (समवा. पा. ९८ व उवास पा. १६ मध्यें)या भाषेला अर्धमागधी असें नांव पडण्याच्या कारणाचा या गोष्टींशीं संबंध लावला आहे. स्टिव्हनसननें पूवाच म्हटलें आहे आणि वेबरनें तर सविस्तर सिध्द केलें आहे कीं, अर्धमागधी व मागधी यांच्यामधील संबंध इतका फारसा निकट नाहीं.

शिवाय जर मागधीभषेचे अवशेष आणखी बरेच उपलब्ध असते व त्यांचें वर्णोंतर अधिक चांगल्या रीतीनें करण्यांत येतें तर हे परस्परांतील संबंधांविषयीचे मुद्दे अधिक दाखवितां आले असते यांत शंका नाहीं. आतां यांत सहजासहजीं आलेलीं साम्यें बरीच आढळतील. उदाहरणार्थ अर्धमागधी उसिण=संस्कृत उष्ण यांचें साम्य मागधी कोशिण=कोष्ण याच्यांशीं आहे; शिवाय हीहि मोठी लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे कीं मागधी व अर्धमागधी या दोन्ही भाषांत संस्कृतमधील षष्ठीच्या एकवचनाचें रूप जें तव तें उपयोगांत आणलें आहे; पण हें इतर भाषांमध्यें कोठेहि आढळत नाहीं.

कवितांमध्यें अर्धमागधी भाषेंत प्रथमेच्या एकवचनी रूपांनां ए च्या ऐवजीं ओच पुष्कळ वेळां लागतो; ग्रंथांतून दोन्हीं प्रकारचीं रूपें अनेक वेळां शेजारीशेजारीं आलेलीं आढळतात. उदाहरणार्थ आयारंग पा. ४१-१ अभिवायमीणे, परंतु २ हयपुव्वो, ३ लूसियपुव्वो; पा. ४५ १९ नाओ, परंतु पा.२० से महावीरे, पुन्हां पा. २२ अलध्दपुव्व व गामो; पा.४६,-३ दु:खसहे, अपडिन्ने, ४ सूरो, ५ संवुडे, ६ पडिसेवमाणो, ७ अचले, १४ अपुठ्ठे, १५ पुठ्ठो. अपुठ्ठो. असल्या उदाहरणांत वर्णोंतर करतांना चूकहि होत असते व ती छापणारांनीं दुरूस्त करण्यासारखीहि असते. कलकत्त्याच्या एका प्रतींत ४५, २२-गामे ४६, ६-पडिसेवमाणे असें आहे, इतर ठिकाणीं ओ हि आहे. परंतु खरोखर या सर्व ठिकाणीं-ए अशी दुरूस्ती करावयास पाहिजे. परंतु इतर पद्यग्रंथांमध्यें प्रथमेचें रूप मूळचें ओ असेच आहे. उदा. आयारं. पान १२७ पासून पुढें मउडेच्या एवजीं, ( पा. १२८, ३ ) मउडो असें लिहावयास पाहिजे. असेंच पद्यमय सर्व लेखांत आलेलें आहे; उ. सूयगडंग सुत्तांत, उत्तरज्झयण सुत्तांत, दसवेयालियसुत्तांत इत्यादि.

प द्य भा षा.-हींत ध्वनी व रूपें यांच्या उपपत्तींत गद्यमय भाषेपेक्षां बरेच महत्त्वाचे फरक दिसून येतात . आणि त्यांचें महाराष्ट्रीशीं व जैन महाराष्ट्रीशीं फार साम्य आहे; परंतु त्या दोन्ही सर्वस्वी सारख्या मात्र नाहींत. उदा.संस्कृतांतला म्लेच्छ शब्द अर्धमागधींतील गद्यग्रंथांत मिलक्खू असा आहे, परंतु पद्यांमध्यें सुध्दां महाराष्ट्री, जैनमहाराष्ट्री यांतल्याप्रमाणें मेच्छ असा शब्द आहे. अर्धमागधींतील पद्यांत महाराष्ट्रींत व जैनमहाराष्ट्रीप्रमाणें कृ याचें कुणई असें रूप येतें; आणि नेहमीं नाहीं तरी पुष्कळ वेळां अर्धमागधींत, महाराष्ट्रींत व जैनमहाराष्ट्रींत असलेलें,-तूण मधील-उण सारखें रूप फक्त पद्यांमध्येंच येतें संधिनियम,विभक्ति व शब्दसंग्रह या तिन्ही बाबतींत पद्यमय ग्रंथ गद्यग्रंथाहून स्पष्टपणें निराळे असलेले दिसतात. दसव, उत्तर. व सूयगयांतच फक्त पाहिलें तरी व्याकरणासंबंधाच्या कितीतरी गोष्टी विशेष स्पष्टपणें व्यक्त होतील. क्रमदीश्वरानें केलेलें विवेचन ( ५. ९८ ) पद्यमय भाषेला बहुतेक अंशीं लागू आहे; तो म्हणतो त्याप्रमाणें ती भाषा महाराष्ट्री व मागधी यांचें मिश्रण आहे. तिला ‘महाराष्ट्रीमिश्र अर्धमागधी’ असें नांव बरें पडेल. तेव्हां जैन लोकांतील ही तिसरी स्वतंत्र भाषा म्हणून मानण्यास हरकत नाहीं. पण तसें नि:संशय विधान करतां येत नाहीं. पांली भाषेमध्येंहि पद्यग्रंथांत गद्यग्रंथांतल्याहून अगदीं निराळीं अशीं जुनीं व चमत्कारिक रूपें येतात; परंतु तेवढ्यावरून त्या दोन स्वतंत्र भाषा असल्याचें ठरत नाहीं. आणि ज्याअर्थी त्या पद्यांतल्या भाषेचें गद्यग्रंथांतील भाषेशीं मुख्य मुख्य बाबतींत नि:संशय साम्य आहे, त्याअर्थी त्या दोन्ही गद्यपद्यांतल्या भाषांनां अर्धमागधी हें परंपरागत चालत आलेलें नांव पिशेलनें दिलेलें आहे. भारतीय नाट्यशास्त्रांत (१७, ४८) मागधी, आवंती, प्राच्य, शूरसेनी, बाहूलीका व दाक्षिणात्य या भाषांबरोबरच अर्धमागधी ही सातवी भाषा म्हणून दिलेली आहे; ( १७, ५०, ) तसेंच साहित्यदर्पण ( पा. १७३, ३) यांत म्हटलें आहे कीं, नाटकांत चाकर, राजपुत्र, शेटसावकार व व्यापारी यांच्या तोंडीं अर्धमागधी भाषा घालावी ( चेटानां राजपुत्राणां श्रेष्ठीनां चार्धमागधी ). आज उपलब्ध असलेल्या नाटकांत हा नियम पाळलेला दिसत नाहीं. नाटकांमध्यें जेथें जेथें जैन लोक येतात तेथें तेथें त्यांच्या तोंडीं अर्धमागधी भाषा असेल असें साहजिक वाटतें. लासेननें ( इं. आ. पा. ४१० पासून पुढें, ) प्रबोधचंद्रोदय व मुद्राराक्षस या नाटकांवरूत अर्धमागधी भाषेंतल्या विशेष गोष्टी पुढें मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे; आणि धूर्तांपैकी जो न्हावी त्याची भाषा अर्धमागधी आहे असें तो म्हणतो. मुद्राराक्षस नाटकांत ( पा. १७४-१७८; १८३-१७८, १९०-१९४ या ठिकाणीं ) एक भिक्षा मागणारा भिक्षु ( क्षपणक ) जीवसिध्दि म्हणून जो आहे त्याच्याबद्दल धुंडिराज नांवाच्या टीकाकारानें पा. ४० वर असें स्पष्ट म्हटलें आहे कीं, “क्षपणिको जैनाकृति:” अर्थमागधी भाषेंतल्याप्रमाणेंच त्याच्या तोंडच्या भाषेंतहि प्रथमेच्या एकवचनांत शेवटीं ए येतो. उ. कुविदे, भदन्ते (१७८. ४); त्याचप्रमाणें नपुंसकलिंगी रूपांत, उ. अदक्खिणे, नक्खत्ते ( दुसरा पाठ हख १७६, १, २ ); शिवाय दुसरा फरक म्हणजे ‘क’ चा ‘ग’ होतो, उदा. ‘शावगाबम्’ (१७५. १; १८५. १; १९०. १०); सप्तमीच्या एकवचनांत ‘शावगा’ ( १७५. ३; १७७. २; १८३. ५ वगैरे ), शिवाय या ठिकाणीं शेवटचा दीर्घ उच्चारहि पाहण्यासारखा आहे; प्रथमेच्या एकवचनीं ‘शावगे ( १७८. २; १९३. १; याप्रमाणें वाचावयाचें ), आणि हगे,=अहक: शिवाय ही भाषाहि मागधी आहे, कारण हेमचंद्रानें ( ४, ३०२ ) तींतून मागधी भाषेचीं उदाहरणें म्हणून दिलेलीं आहेत. प्रबोधचंद्रोदय नाटकांत ( पा. ४६-६४ ) एक क्षपणक आलेला असून त्याला दिगंबर असें नांव दिलेलें आहे. त्याच्या तोंडची भाषाहि मागधी आहे असें रामदासानें म्हटलें आहे तें बरोबर आहे. आणि रामदास असेंहि म्हणतो कीं, ही मागधी भाषा भिक्षु, क्षपणक, राक्षस व अन्तर्गृहांतील चाकरलोक बोलतात. दुसरा एक दिगंबर लटकमेलकांमध्यें ( पा. १२-१५; २५-२८ ) आलेला आहे व त्याच्या तोंडीं मागधी भाषाच आहे. तथापि दिगंबरलोक जेथें जेथें येतात, जेथें त्यांच्या तोंडची भाषा श्वेतांबरलोकांच्या भाषेहून पुष्कळ निराळी असते, आणि एका ध्वनिशास्त्राच्या नियमाच्या बाबतींत मागधी भाषेशीं तिचें साम्य आहे; या गोष्टीकडे दुर्लक्ष करतां कामा नये. नाटकग्रंथांत अर्धमागधी भाषेचा कोठेंहि मागमूस लागत नाहीं.

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .