विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्य - या वैदिक शब्दाचे शिष्ट, स्वामी, शत्रू, मालक, वैश्य, नागरिक, गमन करणारा असे अनेक अर्थ आहेत. ऋग्वेदांत हा शब्द कोठ कोठें कोणकोणत्या अर्थानें आला याचें सविस्तर पृथरक्कण ‘बुध्दपूर्व जग’ (ज्ञानकोश प्रस्तावनाखंड विभाग ३ रा) याच्या ३ र्या प्रकरणांत केलेलेंच आहे.) वाजसनेयी सहितेंत आर्य या अर्थी पुष्कळ ठिकाणीं हा शब्द दिसतो. पुढील वाङ्मयांत वैश्य हा याचा अर्थ रूढ झाला असला तरी, प्रथम हा अर्थ स्पष्ट नाहीं.