विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्यंकावू - ( मद्रास इलाखा,) त्रावणकोरसंस्थानांत या नांवाचें एक गांव, मार्ग व देवस्थान, शेनकोट्टातालूक्यामध्यें आहे. उ. अ. ८० ५९’ व पू. रे. ७७० ९’ त्रिवेंद्रमपासून ५४ मैलांवर व तिनेवेल्ली पासून सुमारें ५० मैलांवर, एका वर्तुलाकार दरीमध्यें हें गांव वसलेलें आहे. लोकसंख्या सुमारें १००० चहाकाफीच्या लागवडीमुळें या गांवाला बरेंच महत्त्व आलें आहे. ह्या ठिकाणीं सास्थाचें एक मोठें जुनें देऊळ आहे. हें देऊळ परशुरामानें बांधिलें असें सांगतात. येथील वनशोभा पहाण्यासारखी आहे. ( इं. गॅ. ६-१९०८ )