विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्यमा -एक वैदिक देवता. आदित्य नांवाच्या देवता समूहांत अर्यमन् देवता येते. ऋग्वेदांत याचा उल्लेख सुमारे १०० वेळा, बहुतेक मित्रावरूणांबरोबर आलेला आहे. अवेस्तांतहि ही देवता सांपडते. ‘अर्यम्ण:पंथा:’ हा ब्राह्मणवाङ्मयांतून आढळणारा शब्द कांहीं पंडितांच्या मतें ‘आकाशगंगा’ तर कांहींच्या मतें ‘ग्रहण’ या अर्थी आहे. विशेष विवेचनासाठीं ज्ञानकोश वि. २ “वेदविद्या” यामधील दैवतेतिहास” पहा.