विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलका - पौराणिक शहर व सरोवर. ही कुबेराची कैलासपर्वतावरील नगरी सर्व सुखांनीं परिपूर्ण अशी आहे. ‘ययाति हा पुरूपासून तारूण्य घेतल्यावर उत्तरस्थ मेरूपर्वतावरील अलका नामक कुबेरनगरींत विषयसुख घेत राहिला असा भारतांत उल्लेख आहे ( म. भारत. १. ८५ ). पुरूरवा उर्वशीसह याच नगरींत होता. ( विष्णु पु. ४. ६ ). भूतेशगिरीवर हें नगर आहे असें भागवतांत ( ४. ६ ) सांगितलें आहे. संस्कृत काव्यांतून या नगराचा मोठ्या गौरवानें उल्लेख केलेला असतो. ‘विभाति यस्यां ललितालकायां मनोहरा वैश्रवणस्य लक्ष्मी:’ ( भामाविलास २.१०. ) असें जगघ्नाथपंडिताचें वर्णन आहे.