विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलख बुलाखी - हा कवि जातीचा साठोदरा गुजराथी ब्राह्मण अमदाबाद येथें रहात असें. हा शांकरमतानुयायी होता. याची मान्यतां लोकांत चांगली असल्यामुळें लोक याच्या पादुकांची पूजा करितात. यानें गुजराथी भाषेंत पदें वगैरे कविता पुष्कळ केलेली आहे व हा शालिवाहन १७६० मध्यें होता अशा विषयीं चांगला पुरावा आहे (भ. ख. अ. कोश).