विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलनम्यो - (ब्रह्मदेश) श्येम्टयो जिल्ह्यांतील म्येड विभागाचें मुख्य ठाणें. इरावती नदीच्या पूर्वतीरावर वसलेलें आहे. उ. अ. १९ ० २२’ व पू. रे.९५० १३’ इ. स. १९०१ मधील लोकवस्ती १०२७. इ. स. १८५४ सालीं बर्मी किल्ला म्येड याच्या दक्षिणेस मेजर अँलननें जी सरहद्दीची रेषा आंखली होती त्याच रेषेवर हें गांव वसलें आहे. ब्रह्मदेश खालसा होईपर्यंत हें सरहद्दीवरील गांव असल्यामुळें फार महत्त्वाचें होतें. हल्लीं येथें कापसाचा व्यापार मोठा आहे व सरकींच्या तेलापासून साबण करण्याचा कारखाना येथे आहे. ( इं. गॅ. ५-१९०८).