विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलंबुष - (१) बकासुराचा बंधु दुर्योधनपक्षीय राक्षस. ( भार. उद्योग. १६७ ) हा भारतीय युध्दांत घटोत्कचाच्या हातून मृत्यू पावला ( भार. द्रोण अ. १०९.) (२) जटासुराचा पुत्र, हा दुर्योधनपक्षाकडून पित्यास मामानें मारल्याचें वैर स्मरून, युध्द करीत असतां, रात्री घटोत्कचानेंच यांस मारिलें (भार. द्रोण. अ. १७४).
(३)-दुर्योधनपक्षीय राजा, यास सात्यकीनें मारिलें (भार, द्रोण. अ. १४०)
वरील प्रत्येकाच्या वधाचें वर्णन करण्याकरितां द्रोणपर्वांतील एक एक अध्याय दिला आहे